Home » मुलांना घरात एकटे सोडण्याआधी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

मुलांना घरात एकटे सोडण्याआधी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

आजकलच्या धावपळीच्या आणि बदललेल्या लाइफस्टाइलमध्ये बहुतांश पालक हे नोकरी मध्ये अधिक व्यस्त असल्याने घरात फार कमी वेळ देतात. अशातच आपल्या मुलाकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही.

by Team Gajawaja
0 comment
Positive Thinking in Children
Share

Parenting Tips : आजकलच्या धावपळीच्या आणि बदललेल्या लाइफस्टाइलमध्ये बहुतांश पालक हे नोकरी मध्ये अधिक व्यस्त असल्याने घरात फार कमी वेळ देतात. अशातच आपल्या मुलाकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यांना घरात एकटे सोडून जावे लागते. पण असे जरी असले तरीही कामावर गेल्यावर ही मुलांची काळजी पालकांना असतेच. पण जर तुम्ही सुद्धा मुलांना घरी एकटे सोडत असाल तर आधी हे वाचा. जेणेकरुन त्यांची काळजी करण्यासह ते घरात सुरक्षित ही राहतील. त्यासाठी पुढील काही टीप्स तुम्ही फॉलो करु शकता. 

इलेक्ट्रिक बोर्डावर टेप चिकटवा
काही वेळा लहान मुलं विजेच्या बोर्डात हात घालण्याचा प्रयत्न करतात. अशातच त्यांना करंट लागू शकतो. त्यामुळे मुलांना घरात एकटे सोडणार असाल तर विजेच्या बोर्डावर टेप लावा. जेणेकरुन मुलं घरात पूर्णपणे सुरक्षित राहतील.

किचन सेफ्टी टीप्स फॉलो करा
मुलांना थोड्या वेळासाठी का होईना एकटे सोडणार असाल तर सर्वात प्रथम किचनमध्ये लक्ष द्या. आपले मुलं गॅस पासून दूर राहील याकडे पहा. त्याचसोबत गॅसचा रॅग्युलेटर बंद करुन ठेवा. या व्यतिरिक्त घरातून निघताना किचन गॅस संबंधित सर्व स्विच सुद्धा बंद करण्यास विसरु नका.

भीती वाटून घेऊ नका
काही वेळेस मुलांना घरात एकटे सोडण्याची फार भीती वाटत राहते. त्यामुळेच मुलांना घरात एकटे सोडण्याची भीती सारखी असते. पण मुलांना जर तुम्ही तुमच्याजवळ बसवून नीट समजावून सांगितल्यास तर त्याच्यासह तुमची ही भीती दूर होऊ शकते. मुलांना भीतीच्या विरोधात लढण्यास शिकवा.

धोकादायक वस्तूंपासून दूर ठेवा
घरात मुलांना एकटे सोडताना धारदार आणि टोकदार वस्तूंपासून दूर ठेवा. जेणेकरुन त्यांना इजा होणार नाही. जसे की, चाकू, सुई, कैची सारख्या गोष्टी त्यांच्या हाती लागणार नाही याची काळजी घ्या. अथवा या गोष्टी एखाद्या उंच ठिकाणी ठेवा जेथे त्यांचा हात पोहचणार नाही. (Parenting Tips)

पाळीव प्राण्यापासून दूर ठेवा
घरात काही वेळेस आपण पाळीव प्राणी ठेवतो. जसे की मांजर, कुत्रा. परंतु घरात मुलाला एकटे सोडून जाताना पाळीव प्राण्यापासून आपले मुल दूर राहिल याची काळजी घ्या. त्यासाठी तुम्ही पाळीव प्राण्याला एका खोलीत बंद करुन जाऊ शकता.


आणखी वाचा : 
नोकरीसाठी इंटरव्यू देण्यासाठी चिंता सतावतेय? या ट्रिक वापरुन राहा टेंन्शन फ्री
रिलेशनशिपमध्ये प्रेमच नव्हे तर ‘या’ गोष्टींनाही द्या महत्त्व
सोलो ट्रॅव्हलिंगआधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.