Home » अमेरिकेत भाजीसारखी खरेदी करता येते बंदूक…

अमेरिकेत भाजीसारखी खरेदी करता येते बंदूक…

by Team Gajawaja
0 comment
Gun control debate in US
Share

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये गेल्या आठवड्यात अवघ्या अठरा वर्षाच्या युवकाने प्राथमिक शाळेत गोळीबार केला. या गोळीबारात अठरा लहानग्यांचा बळी गेला. शाळेच्या शिक्षीकाही या गोळीबाराच्या बळी ठरल्या.  हे कृत्य करणारा सल्‍वाडोर रामोस हा त्याच शाळेचा विद्यार्थी होता. 

वयाची अठरा वर्ष पूर्ण केल्यावर रामोसनं प्रथम एक बंदूक खरेदी केली. पहिली गोळी आपल्या आजीच्या छातीत मारुन तो थेट शाळेत दाखल झाला आणि हे हत्याकांड केले. या सर्वांत रामोसचाही मृत्यू झाला असला तरी त्यानं केलेल्या हत्याकांडांने अवघी अमेरिका हादरली आहे. ज्या मुलांचा बळी गेलाय, त्या मुलांच्या पालकांची अवस्था अतिशय वाईट आहे. ज्या लहानग्यांनी आपल्या मित्रांना आपल्यासमोर मरताना पाहिलंय, ती मुलंही प्रचंड दडपणाखाली आली आहेत.  

या सर्वाला अमेरिकेची गन लॉबी जबाबदार असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. खुद्द अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी गन कल्चरचा निषेध केलाय. या सर्वांमुळे अमेरिकेतील गन कल्चरची चर्चा जगभरात सुरु झाली आहे.  (Gun control debate in US)

Gun control debate in US and Texas Incident 
Image Credit: Google

आपण भारतात जशी भाजी खरेदी करतो, तशीच अमेरिकेत सहजपणे बंदूक खरेदी करता येते.  अमेरिकेच्या घटनेत 1791 मध्ये एक तरतूद करण्यात आली. त्यानुसार प्रत्येक अमेरिकन नागरिकाला बंदूक खरेदी करण्याचा परवाना देण्यात आला. तत्कालिन परिस्थितीमध्ये तिथे सुरक्षा व्यवस्था आताइतकी सक्षम नव्हती. त्यामुळे नागिरकांच्या सुरक्षेतेसाठी ही तरतूद करण्यात आली.  

आता 230 वर्षानंतर अमेरिकेची सुरक्षा प्रणाली सक्षम झाली असली तरी ही घटनेत करण्यात आलेली तरतूद मात्र कायम आहे. परिणामी येथे प्रत्येक घरात बंदूक असणं सामान्य गोष्ट झाली आहे. सद्यस्थितीत अमेरिकेत जवळपास सगळ्या दुकानात, शॉपिंग सेंटरमध्ये बंदूका मिळतात. दर शनिवारी बंदूकांचे प्रदर्शन भरते. बंदूक घेणाऱ्याची कुठलीही चौकशी होत नाही. फक्त एक साधा फॉर्म भरुन द्यायचा असतो. त्यात त्या व्यक्तीचे नाव, पत्ता, जन्मतारीख आणि अमेरिकन नागरिक असल्याचा पुरावा….बस्स! एवढ्यावरच कुठल्याही प्रकारची बंदूक खरेदी करता येते.  (Gun control debate in US)

‘दि गन कंट्रोल अक्ट’नुसार बंदूक किंवा तस्सम हत्यार खरेदी करण्यासाठी फक्त अठरा वर्ष पूर्ण होणे गरजेचे असते. बंदूक खरेदीसाठी जगात अमेरिकन नागरिकांचा पहिला नंबर लागतो. स्वित्झरलॅंडच्या एका सर्वेनुसार जगभरात असलेल्या 85.7 करोड हत्यांरांपैकी 39.3 हत्यारं एकट्या अमेरिकेच्या नागरिकांकडे आहेत. आणखी एका सर्वेनुसार अमेरिकेतील 44 टक्के ज्येष्ठ नागरिकांडे बंदूक आहे.  

जगात अमेरिका, ग्वाटेमाला आणि मैक्सिको या तीनच देशांमध्ये घटनेनुसार नागरिकांना बंदूक बाळगण्याचा अधिकार आहे. त्यापैकी मैक्सिकोमध्ये तर बंदूक खरेदीसाठी संपूर्ण देशात फक्त एकच दुकान उपलब्ध आहे आणि त्याचेही नियंत्रण आर्मीकडे आहे. मात्र अमेरिकेत अगदी नाक्यानाक्यावरच्या दुकानात अनेक प्रकारच्या बंदूक-पिस्तूल उपलब्ध असतात. त्यामुळे 33 करोड लोकसंख्या असलेल्या अमेरिकेत 44 करोड नागरिकांकडे बंदूक आहेत.  (Gun control debate in US)

Gun control debate in US
Image Credit: Google

या गन कल्चरमुळे अमेरिकेत गेल्या 50 वर्षात 15 लाखाहून अधिक लोकांचे प्राण गेले आहेत. सीएनएनच्या अहवालानुसार वैयक्तिक बंदूकीच्या सहाय्याने गोळीबार करणे आणि त्यात कोणाचाही बळी घेणे, ही घटना अमेरिकेत अगदी नित्याची झाली आहे. याशिवाय आत्महत्येच्याही घटनांमध्ये वाढ झाली आहे. स्वतःच्या बंदुकीच्या आधारे आत्महत्या करण्यातही अमेरिका अग्रेसर असल्याची माहिती आहे.  

आता टेक्सास येथील घटनेनंतर अमेरिकेतच गन कल्चर या विषयावर दोन गट पडल्याचे जाणवते. आत्तापर्यंत या गन कल्चरचे समर्थन मोठ्या पदावरील राजकीय व्यक्तींनीही केले आहे. यात थियोडेर रुजवेल्ट, फ्रैंकलिन डी रुजवेल्ट, जिमी कार्टर, जॉर्ज बुश सिनीअर, जॉर्ज हब्ल्यू बुश आणि डोनाल्ड ट्रंम्प या राष्ट्राध्यक्षांचाही समावेश आहे. याबरोबरच हत्यारं तयार करणाऱ्या  कंपन्यांचं जाळं आणि त्यातून होणारे आर्थिक फायदे हा सुद्धा एक धागा या सर्वात आहे.  (Gun control debate in US)

ही गन लॉबी राजकीय मेळावे आणि सभांनाही देणग्या देत असल्याची नोंद आहे. त्यामुळे गन कल्चरबाबत कडक नियम करण्याची चर्चा झाली तरी त्याला कोणताही पक्ष विरोध करतो. त्यातून हत्यारं बाळगण्याबाबत कोणताही कायदा झाला तरी तो फार काळ टीकत नाही. 2021 मध्येच टेक्सास राज्यात लायसन्स आणि ट्रेनिंग शिवाय हँडगन ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती.  

गेल्या काही वर्षात अमेरिकेत बंदूक निर्मितीचे कारखानेही वाढले आहेत. सन 2020 मध्ये एक करोड पेक्षाही जास्त बंदूंका येथे तयार झाल्या आहेत. अर्थात अधिकृत आकडा आहे. त्याव्यतिरिक्तही काही हत्यारांची निर्मिती होते. त्यांना अमेरिकेत ‘घोस्ट गन’ असे म्हणतात. या घोस्ट गन जवळपास पन्नास हजारांच्या आसपास तयार होऊन त्यांची विक्रीही झाली आहे. (Gun control debate in US)

==========

हे ही वाचा: आर्यन खानला मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने दिली क्लीन चिट

===========
वॉशिंग्टन पोस्टच्या एका बातमीनुसार अमेरिकेत 100 नागरिकांमागे 120.5 बंदुका आहेत. यावरुनच अमेरिकेतील गन कल्चरची मुळं किती खोल गेली आहेत याची जाणीव होते. आता टेक्सास येथील घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्रपती बायडन यांनी या गन कल्चरला आवर घालण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. अर्थात बायडन यांनाही गन लॉबीची ताकद माहिती आहे. त्यामुळे याबाबत कुठलाही निर्णय घेताना प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागेल याची कल्पना आहे. मात्र यात हत्यारं बाळगण्याचा कायद्यावर विचार तरी सुरु झाल्याचं समाधान अमेरिकेतील पालक वर्गांनी व्यक्त केला आहे.  

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.