Home » व्यापार-उद्योगधंद्यात नुकसान आणि घरात सतत वाद होतात? करा ‘हे’ उपाय

व्यापार-उद्योगधंद्यात नुकसान आणि घरात सतत वाद होतात? करा ‘हे’ उपाय

हिंदू समाजात गाईला फार महत्त्व आहे. यामागील मान्यता आहे की, गाईमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो असे म्हटले जाते. याशिवाय असे देखील बोलले जाते की, गाईची सेवा केल्यास तुम्हाला तीर्थयात्रा करण्याची गरज नाही. कारण गाईची सेवा म्हणजे नारायणाची सेवा.

by Team Gajawaja
0 comment
Spiritual Tips
Share

Spiritual Tips : हिंदू समाजात गाईला फार महत्त्व आहे. यामागील मान्यता आहे की, गाईमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो असे म्हटले जाते. याशिवाय असे देखील बोलले जाते की, गाईची सेवा केल्यास तुम्हाला तीर्थयात्रा करण्याची गरज नाही. कारण गाईची सेवा म्हणजे नारायणाची सेवा.

खरंतर, गाईला दररोज चारा खायला दिल्यास घरात सुख-समृद्धी येते. पण प्रत्येक आठवड्याच्या बुधवारी गाईला चारा दिल्याने व्यक्तीवरील संकटे दूर होतात. अशातच तुम्हाला व्यापार-उद्योगधंद्यात येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी गाईला बुधवारी-शुक्रवारी हिरवा चारा खायला द्या.

घरात सुख-समृद्धी टिकून राहिल
बहुतांशवेळा पाहिले जाते की, लहान-लहान गोष्टीवरुन घरात वाद होतात. याशिवाय व्यापारात देखील नुकसान होते. अशातच बुधवारी-शुक्रवारी गाईला हिरवा चारा खायला द्या. यामुळे घरात सुख-समृद्धी टिकून राहण्यासह परिवारातील सर्वजण आनंदी राहतील.

Cow Dung- A Hindu Sacred Yantra. A childhood question that would be… | by  Ayush Sultania | Medium

गाईला चारा खायला दिल्याने देवी अन्नपुर्णा आणि देवी लक्ष्मीचा मिळतो आशीर्वाद
दररोज स्नान केल्यानंतर देवाची पूजा-प्रार्थना करण्याचे फार महत्त्व आहे. त्याचप्रमाणे स्नान केल्यानंतर गाईची पूजा देखील करावी. गाईची दररोज पूजा केल्याने तुम्हाला सर्व देवी-देवतांचे आशीर्वाद मिळतात. घरात दररोज जेवण तयार केल्यानंतर पहिली पोळी गाईसाठी काढून ठेवा.

धार्मिक मान्यतांनुसार, जी लोक दररोज गाईची पूजा करतात त्यांना देवी लक्ष्मी आणि देवी अन्नपुर्णा यांचा आशीर्वाद मिळतात. गाईला चारा दिल्याने घरात सुख-समजद्धी येते.

गाईला पोळी-गुळ खायला दिल्याने पितृदोष दूर होतो
व्यक्तीला पितृदोष असल्यास गाईला दररोज किंवा अमावस्येला पोळी-गुळ खायला द्यावे. याशिवाय गाईची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊ तुम्हाला मानसिक शांती आणि आयुष्यात सुख येते. (Spiritual Tips)

(टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.)


आणखी वाचा :

घरात अशाप्रकारे ठेवा शंख, देवी लक्ष्मी होईल प्रसन्न

मोनालिसाच्या चित्रात अनेक गुढ संदेश असल्याची चर्चा

जगातील मोठी हिंदू मंदिरे, जाणून घ्या खास गोष्टी


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.