Home » जगातील मोठी हिंदू मंदिरे, जाणून घ्या खास गोष्टी

जगातील मोठी हिंदू मंदिरे, जाणून घ्या खास गोष्टी

भारताला मंदिरांचा देश मानला जातो. येथे देवी-देवतांची असंख्य मंदिरे आहेत. भारतातील मंदिरांना भेट देण्यासाठी परदेशातील पर्यटकही येतात.

by Team Gajawaja
0 comment
World Biggest Hindu Temples
Share

World Biggest Hindu Temples : हिंदू धर्मात मंदिरांचे खास महत्त्व आहे. यामुळेच भारताला मंदिरांचे देश मानले जाते. भारतासह जगात अशी काही भव्य हिंदू मंदिरे आहेत ज्यांची खासियत आहे. याबद्दलच जाणून घेऊया अधिक….

अंकोरवाट मंदिर
अंकोरवाट मंदिर हे जगातील सर्वाधिक मोठे मंदिर मानले जाते. हे मंदिर कंबोडियातील अंकोर येथे आहे. याची निर्मिती सम्राट सूर्यवर्मन द्वितीय (1112-53 ई॰) च्या शासनकाळात झाली होती. हे मंदिर भगवान विष्णूंना समर्पित आहे. या मंदिराला कंबोडियातील राष्ट्रध्वजावरही स्थान देण्यात आले आहे.

श्रीरंगनाथ स्वामी मंदिर
श्रीरंगनाथ स्वामी मंदिर तमिळनाडू येथे आहे. हे मंदिर भगवान विष्णूंच्या एका रुपाला समर्पित आहे. या मंदिरात भगवान विष्णू शेषानागाच्या शैय्येवर विराजमान आहेत. हे मंदिर जगातील सर्वाधिक मोठ्या मंदिरांपैकी एक आहे.

अंकोरवाट मंदिर - विकिपीडिया

अयोध्या राम मंदिर
अयोध्येतील राम मंदिराची नुकतीच प्राणप्रतिष्ठा झाली. या मंदिरात रामललांचे दर्शन घेण्यासाठी सध्या भाविकांची फार मोठी गर्दी होत आहे. या मंदिराचे तळघर पूर्णपणे उभारून तयार आहे.

अक्षरधाम मंदिर
नवी दिल्लीतील स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर भगवान स्वामीनारायण यांना समर्पित आहे. हे मंदिर भगवान स्वामीनारायण यांच्या पुण्य स्मृतीमध्ये बनवण्यात आले होते. या मंदिराचे नाव जगातील सर्वाधिक मोठे हिंदू असल्याचे 26 डिसेंबर 2007 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आहे. (World Biggest Hindu Temples)

नटराज मंदिर
तमिळनाडूमधील चिदंबरम येथील नटराज मंदिर भगवान शंकरांना समर्पित आहे. या मंदिराच्या प्रत्येक शिलेवर आणि खांब्यावर भरतनाट्य नृत्याच्या कलांचे दर्शन तुम्हाला होचे. या मंदिराची खासियत अशी की, नटराज यांची रत्नजडीत मूर्ती.


आणखी वाचा :
घरात शनी देवांची मूर्ती न ठेवण्यामागे हे आहे कारण
प्राणप्रतिष्ठेआधी मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी का बांधतात? सांगितले जाते हे रहस्य
पाकिस्तानमधील राम मंदिर आता चर्चेत

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.