Home » पुतीन यांनी दिला ‘बचके रेहना रे बाबा..’ असा इशारा

पुतीन यांनी दिला ‘बचके रेहना रे बाबा..’ असा इशारा

by Team Gajawaja
0 comment
Vladimir Putin
Share

रशियाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून व्लादिमीर पुतिन पाचव्यांदा रशियाचे अध्यक्ष झाले आहेत. आता ते या स्थानावर 2030 पर्यंत राहणार आहेत.  मात्र आपल्या पहिल्याच अध्यक्षीय भाषणार पुतीन (Vladimir Putin) यांनी ही पुढची वर्ष कशी असतील याची चुणूक दाखवून दिली आहे. आपल्या विरोधकांचा पुतीन कसा काटा करतात, या घटनांची चर्चा सुरु झाली असतांना पुतिन यांनी थेट अमेरिकेच्या लोकशाहीची थट्टा उडवत, तिस-या महायुद्धाचा इशारा दिला आहे.  यापेक्षा गंभीर म्हणजे, भविष्यात अणुयुद्धासाठी तयार असल्याचेही पुतीन यांनी सांगत अवघ्या जगाला आपल्यापासून बचके रहना रे बाबा असा इशाराच दिला आहे.  

रशियामध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी 87.8% मत मिळवत विजय मिळवला आहे. निकाल जाहीर झाल्यावर आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी या पाचव्या अध्यक्षपदाची कारकीर्द कशी असेल याची झलक सादर केली आहे.  जग तिसऱ्या महायुद्धापासून फक्त एक पाऊल दूर असल्याचे सांगून त्यांनी अमेरिकेला गंभीर इशारा दिला आहे. 

त्यांच्या या इशा-यामागे युक्रेन येथील नाटोचे सैनिक आहेत. युक्रेनला नाटोचे सैन्य मदत करत आहे.  शिवाय युक्रेनकडून इंग्लिश आणि फ्रेंच सैनिकही लढत असल्याबद्दल पुतीन यांनी काही दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त केली होती. यासर्वांचा परिणाम म्हणजे, तिसरे महायुद्ध असून आम्ही वेळप्रसंगी अणूबॉम्बचा वापरही करु शकतो, असा इशाराही पुतीन (Vladimir Putin) यांनी दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.  याशिवाय पुतीन यांनी अमेरिकेच्या लोकशाहीची थट्टा केली. अमेरिकेमध्ये ट्रम्प यांच्या विरोधात सर्व शासनव्यवस्था तैनात केल्याच आरोपही त्यांनी केला आहे.  पुतीन यांच्या या अध्यक्षीय भाषणानं आता खळबळ उडवून दिली आहे. रशियाच्या अध्यक्षपदी पुतीन 2030 पर्यंत विराजमान राहणार आहेत.  

अर्थातच या निवडणुकीत 71 वर्षीय पुतीनच विजयी होतील हे स्पष्ट होते.  पण यावेळी त्यांना मिळालेली मतेही उल्लेखनीय आहेत. 18 वर्षापेक्षा जास्त वयाचा कोणताही रशियन नागरिक या निवडणुकीत मतदान करू शकतो.  यावेळी त्यांना सर्वाधिक तरुणांनी मत दिल्याचे स्पष्ट झाले आहे.  रशियात गेल्या 24 वर्षांपासून पुतीन यांची सत्ता आहे. पुतीन यांचे बहुतांश विरोधक सध्या तुरुंगात आहेत किंवा निवडणूक आयोगाने त्यांना निवडणुकीसाठी अपात्र घोषित केले आहे.  यानंतर होणा-या निवडणुकीतही पुतीनच अध्यक्षपदी राहतील याचीही तरतूद त्यांनी 2021 मध्ये केली आहे.  तेव्हाच केलेल्या कायद्यानुसार पुतीन 2036 पर्यंत रशियाचे राष्ट्राध्यक्ष राहणार आहेत. 

यावेळी रशियाचा निवडणुकीवर युक्रेन युद्धाची छाया होती. शिवाय पुतीन यांच्या विरोधकांचे एकापाठोपाठ होणारे मृत्यू आणि त्यामागे येणारे पुतीन यांचे नाव, या चर्चांचाही निवडणुकीवर प्रभाव पडेल अशी शक्यता वर्तवण्य़ात आली होती. मात्र प्रत्यक्षात हे सर्व मुद्दे बाजुला पडले.  रशियात 11.23 कोटी मतदार आहेत. यामध्ये रशियन-व्याप्त युक्रेनियन प्रदेशातील नागरिकांचाही समावेश आहे.(Vladimir Putin)

याशिवाय सुमारे 19 लाख मतदार देशाबाहेर राहतात. त्यांना ऑनलाईन मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती.  पुतीन यांच्याशिवाय आणखी 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.  कम्युनिस्ट पक्षाचे निकोलाई खारिटोनोव्ह, लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे लिओनिड स्लटस्की आणि न्यू पीपल्स पार्टीचे व्लादिस्लाव डव्हान्कोव्ह हे तिघंही पुतीन यांच्या विरोधात उभे असले तरी तो पुतीन यांच्या एका खेळीचा भाग असल्याची चर्चा होती.  कारण हे तिघेही पुतीन यांच्या धोरणांचे आणि युक्रेनविरुद्धच्या युद्धाचे समर्थक आहेत.  

==========

हे देखील वाचा : देवनार वृक्षांनी वेढलेलं हाट कालिका मंदिर

==========

पुतीन यांचा रशियातील सर्वात मोठा विरोधक आणि प्रतिस्पर्धी म्हणून अलेक्सी नवलनी यांना ओळखले जात होते.  मात्र 16 फेब्रुवारी रोजी त्यांचा संशयास्पद परिस्थितीत तुरुंगात मृत्यू झाला.  नवलनी यांना 2021 मध्ये 19 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. रशियातील सर्वाधिक थंड प्रांतात असलेल्या तुंरुगात नवलनी आपली शिक्षा भोगत होते.  याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  मात्र पुतीन (Vladimir Putin) यांचे विरोधक हा मृत्यू नसून हत्या असल्याचे सांगतात. 

या निवडणुकीआधी रशियावर अमेरिकेतून टीका झाली होती.  वॉशिंग्टनमधील सेंटर फॉर युरोपियन पॉलिसी ॲनालिसिस येथील डेमोक्रॅटिक रेजिलियन्सचे संचालक सॅम ग्रीन यांनी रशियाची निवडणूक म्हणजे एक लबाडी असल्याचे जाहीर कार्यक्रमात सांगितले होते.  त्याचा बदला घेण्यासाठीच पुतीन (Vladimir Putin) यांनी आपल्या निवडणुकीच्या पहिल्या भाषणात अमेरिकेच्या लोकशाहीचीच खिल्ली उडवली आणि थेट अणुहल्ला करण्याचा इशारा दिला आहे.  एकूण पुतीन यांचा स्वभाव बघता, पुढच्या काही काळासाठी तरी बचके रहना हे धोरणच महत्त्वाचे ठरणार आहे.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.