Home » यामुळे राजकुमारी केट गायब झाली होती…

यामुळे राजकुमारी केट गायब झाली होती…

by Team Gajawaja
0 comment
Kate middleton
Share

ब्रिटनची लोकप्रिय राजकुमारी कॅथरीन अर्थात केट मिडलटन (Kate middleton) गायब झाली आहे, की प्रिन्स विल्यमच्या प्रेमप्रकरणाला कंटाळून ती वेगळी झाली आहे, या चर्चांना आता खुद्द ब्रिटनमध्येही उधाण आले आहे. फारकाय केट मिटलटन ज्या राजवाड्यात राहत आहे, तेथील कर्मचा-यांनीही केटला ब-याच दिवसात बघितले नाही, असे सांगून या चर्चांना खतपाणी घातले आहे.  डिसेंबर महिन्यात ख्रिसमसच्यावेळी केट जनतेसमोर आली होती.  तिच्या पोटावर जानेवारीमध्ये शस्त्रक्रीया करण्यात आली.  तेव्हापासून आरामाच्या नावावर केटने कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेतलेला नाही. 

42 वर्षीय केटचा नुकताच एक फोटो तिच्या तीन मुलांसह सोशल मिडियावर शेअर करण्यात आला होता.  मात्र या फोटोमध्ये एडिटींग केल्याची ओरड करण्यात आली.  शिवाय केटच्या हातात लग्नाची अंगठीही नव्हती.  त्यामुळे राजघराण्यावर एवढी नाराजी व्यक्त झाली की हा फोटो, सोशल मिडियामधून मागे घेण्यात आला.

त्यानंतर केट (Kate middleton) आणि विल्यममधील नाते दुरावल्याच्या चर्चा वाढल्या आहेत.  केटच्याच एका मैत्रिणीसोबत विल्यमचे प्रेमसंबंध आहेत, आणि त्यामुळे दुखावलेली केट वेगळी झाल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. या सर्वांमुळे ब्रिटनच्या राजघराण्यावर प्रचंड टीका करण्यात येत आहे.  प्रिन्स विल्यम हा आपले पिता राजा चार्ल्स यांच्या पावलावर पाऊल टाकत पत्नीची फसवणूक करीत असल्याची टीका आता प्रिन्स विल्यमवर होत आहे.  

 

वेल्सची राजकुमारी, कॅथरीन,  म्हणजेच केट मिडलटन ही ब्रिटीश जनतेची लाडकी राजकुमारी आहे.  29 एप्रिल 2011 रोजी तिचे आणि प्रिन्स विल्यम यांचे लग्न झाले. या शाही जोडप्याला जॉर्ज, शार्लोट आणि लुईस अशी तीन मुले आहेत. राजघराण्यातील सर्वात आदर्श जोडपं आणि कुटुंब म्हणून त्यांच्याकडे बघण्यात येतं.  मात्र आता याच आदर्श जोडप्यामध्ये तिसरं कोणीतरी आलं आहे की काय ? अशा दबक्या चर्चा सुरु झाल्या आहेत.  

कारण आता खुद्द केटच (Kate middleton) गायब असल्याची चर्चा सुरु झाली आहे. केन्सिंग्टन पॅलेसमध्ये प्रिन्स विल्यम आणि प्रिंसेस केट मिडलटन त्यांच्या तीन मुलांसह राहतात.  पोटाच्या शस्त्रक्रियेनंतर केट मिडलटन केन्सिंग्टन पॅलेसमध्येच विश्रांती घेत असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र या पॅलेसच्या कर्मचा-यांनी केटला अनेक दिवस पाहिले नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळेच ब्रिटिश राजघराण्याची सून आणि वेल्सची राजकुमारी केट मिडलटन हिच्या सभोवतालचे गूढ अधिकच वाढले आहे. 

केटला अनेक दिवस बघितले नसल्याचा दावा ती राहत असलेल्या राजवाड्यातील कर्मचारी करीत आहेत. शस्त्रक्रीयेनंतर केटबरोबर कुठलाही संवाद झाला नसल्याचे येथील काही कर्मचा-यांचे म्हणणे आहे.  यापूर्वी काहींनी केट मिडलटन कोमात असल्याचेही सांगितले होते. त्यानंतर मदर्स डेच्या निमित्ताने, केनसिंग्टन पॅलेसने केट मिडलटनचे तिच्या मुलांसोबतचे छायाचित्र प्रसिद्ध केले. या फोटोसोबत मदर्स डे च्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्यामात्र हा फोटो क्रॉप करण्यात आला होता. केटच्या हातात एंगेजमेंट रिंग नसल्याचेही स्पष्ट झाले.  या फोटोमुळे केटबाबत आणखीनच चर्चा सुरु झाल्या.  त्यामुळे केन्सिंग्टन पॅलेसने हा फोटो सोशल मिडियातून मागे घेतला.  

ख्रिसमसपासून केट मिडलटन (Kate middleton) सार्वजनिक ठिकाणी दिसली नाही.  पोटाच्या शस्त्रक्रियेनंतर केट 29 जानेवारी रोजी विंडसर पॅलेसमध्ये परत आली.  तेव्हापासून तिचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले.  मार्च अखेर ती पुन्हा सक्रीय होईल असे सांगण्यात आले.  पण आता केटच्या आरोग्याबाबत अनेक शंका व्यक्त करण्यात येत आहेत.  42 वर्षीय केट राजघराणे सोडून गेली अशी चर्चा सुरु असतांना आता प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन यांचा धाकटा मुलगा, प्रिन्स लुईस यांचा एक नवीन कौटुंबिक फोटो 23 एप्रिल 2024 रोजी, प्रिन्स लुईसच्या 6 व्या वाढदिवसाला प्रदर्शित होईल असे सांगण्यात आले आहे. या सर्वात एक तिसरी बाजूही चर्चेत आली आहे. 

=============

हे देखील वाचा : पुतीन यांनी दिला ‘बचके रेहना रे बाबा..’ असा इशारा

============

त्यानुसार प्रिन्स विल्यमचे त्याची पत्नी केट मिडलटनची (Kate middleton) मैत्रिण लेडी रोज हॅनबरीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याची चर्चा सुरु झाली आहे. प्रिन्स आणि हॅनबरीच्या अफेअरच्या बातम्या येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2019 मध्येही त्यांच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत होत्या. त्यादरम्यान प्रिन्स विल्यमने हॅनबरीसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा केल्याची बातमी चर्चेत होती.  गेल्या वर्षी, हॅनबरी किंग चार्ल्सच्या राज्याभिषेकाला उपस्थित होती.  मात्र मैत्रिण असूनही तिचे  केटसोबतचे कोणतेही फोटो समोर आले नाहीत, त्यामुळे या चर्चेला अधिक उधाण आले. आता या सर्व प्रश्नांची उत्तरे खुद्द केट मिडलटनच देऊ शकणार आहे.  ती तिच्या आजारपणातून कधी बाहेर येईल, याचीच प्रतीक्षा तिच्या चाहत्यांना आहे.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.