Home » चीनी नागरिक करतायत ‘जिमी, जिमी’ गाण्याच्या माध्यमातून लॉकडाउनचा विरोध

चीनी नागरिक करतायत ‘जिमी, जिमी’ गाण्याच्या माध्यमातून लॉकडाउनचा विरोध

by Team Gajawaja
0 comment
China Lockdown
Share

बॉलिवूड स्टार मिथून चक्रवर्ती यांचा सिनेमा ‘डिस्को डांसर’ मधील बप्पी लहरी यांचे प्रसिद्ध गाणे ‘जिमी, जिमी’ सध्या चीन मध्ये फार ट्रेंन्ड होत आहे. यामागील कारण ही थोडे वेगळे आहे. खरंतर चीन मधील कोरोनाच्या संकटामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधांना विरोध करण्यासाठी हे गाणे वापरले जात आहे. तर चीन मधील सोशल मीडिया साइट ‘दोयूयिन’ (टिकटॉक) आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशा पद्धतीचे काही व्हिडिओ व्हायरल झआले आहेत, ज्यामध्ये खुप लोक कोविड निर्बंधांचा या गाण्याच्या माध्यमातून विरोध करत आहेत. (China Lockdown)

बप्पी लहरी यांच्या द्वारे लिहिण्यात आलेले आणि पार्वती खान यांनी गायलेल्या या गाण्याच्या आधारावर चीन मध्ये मंडारिन भाषेत एक गाणे लिहिण्यात आले आहे. ते म्हणजे ‘जी मिल, जी मिल’ त्याचा अर्थ असा होतो की, मला भात द्या, भात द्या’. व्हिडिओ मध्ये लोक रिकामी भांडी दाखवत असून त्यामधून लॉकडाऊनच्या कारणास्तव खाण्यापिण्यासह अन्य गरजेच्या वस्तूंपासून वंचित असल्याचे दर्शवत आहेत. लोक सरकारच्या कठोर कोविड निर्बंधांना हटवण्याची मागणी करत आहेत. दुसऱ्या बाजूला सरकार कडून तत्काळ अशा पद्धतीचे व्हिडिओ हटवले जात आहेत.

China Lockdown
China Lockdown

दरम्यान, चीन मध्ये भारतीय सिनेमांची नेहमीच क्रेज दिसून येते. १९५०-६० च्या दशकात राजकपूर यांचे सिनेमे ते ‘३ इडियट्स’, ‘सीक्रेट सुपरस्टार’, ‘हिंदी मीडियम’, ‘दंगल’ आणि ‘अंधाधुंद’ सिनेमा सुद्धा येथील प्रेक्षकांच्या पसंदीस पडला होता. पर्यवेक्षकांचे असे म्हणणे आहे की, चीनच्या लोकांनी ‘जि मी, जि मी’ चा वापर करुन आंदोलन करण्याची पद्धत शोधून काढण्यात आली आहे. याच्या माध्यमातून झिरो-कोविडच्या नीतिच्या कारणास्तव जनतेला होणाऱ्या समस्यांबद्दल सांगितले जात आहे.

गेल्या महिन्यात चीनमधील सत्तारुढ कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी अशा गोष्टीचे संकेत दिले होते की, झिरो-कोविड नीतित कोणत्याही प्रकारची सूट दिली जाणार नाही. त्यांनी या वायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे म्हटले होते. चीन मध्ये नुकताच २०० ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आला. यामध्ये काही झोन ही बनवण्यात आले आहेत. ज्याला प्रभावित क्षेत्र म्हणून ओळखण्यासाठी काही चिन्ह सुद्धा दिली गेली आहेत. विविध झोनसाठी विविध नियम काढण्यात आले आहेत. (China Lockdown)

हे देखील वाचा- एकाच नावाची चक्क १७८ लोक पोहचली मंचावर, प्रेक्षक झाले हैराण

गेल्या काही दिवसात चीन मध्ये मोठ्या संख्येने प्रवासी श्रमिकांनी लॉकडाऊनच्या स्थितीत पळ काढण्यासह आपल्या घरी परतण्याचा प्रयत्न केला होता. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका ऑनलाईन फोटोत अॅप्पलची सर्वाधिक मोठी असेंबलिंग साइट झेंग्झौ मध्ये मोठ्या संख्येने श्रमिक झिरो-कोविड नीति अंतर्गत लॉकडाउनचा विरोध करत घरी परतले होते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.