Home » लग्नात वधूला रडावेच लागते! नाहीतर उडवली जाते खिल्ली, ‘या’ गावाची आहे अचब प्रथा

लग्नात वधूला रडावेच लागते! नाहीतर उडवली जाते खिल्ली, ‘या’ गावाची आहे अचब प्रथा

by Team Gajawaja
0 comment
Wedding Tradition in China
Share

भारतात लग्नाच्या वेळी जेव्हा वधू आपल्या सासरी जाण्यासाठी निघते तेव्हा ती रडते. त्यावेळी ती आपल्या घरातून दुसऱ्या घरात प्रवेश करणार असल्याने तिला रडू आवरत नाही. मात्र तुम्हाला माहिती आहे का की, अशीच पद्धत चीन मध्ये सुद्धा आहे. पण येथे त्यासाठी थोडी विचित्र पद्धत आहे. कारण यामध्ये वधूंना लग्नाच्या वेळी रडावे लागते आणि त्यांना रडू आले नाही तर त्यांना रडण्यासाठी मारले जाते. (Wedding Tradition in China)

चीनच्या दक्षिण पश्चिम प्रांत सिचुआन मध्ये तूजिया जनजातिचे लोक हजारो वर्षांपासून राहत आहेत. त्यांच्या येथे एक विचित्र परंपरेचे पालन केले जाते. ज्यामध्ये वधूला लग्नात रडणे गरजेचे असते. ऑडिटी सेंट्रल वेबसाइटच्या एका रिपोर्ट्सनुसार, ही परंपरा १७व्या शतकापासून सुरु झाली होती आणि १९११ मध्ये किंग साम्राज्याच्या पर्यंत त्याचे पालन केले जात होते. दरम्यान, वेळेनुसार ही परंपरा संपुष्टात होत आहे. जाणकरांनुसार, ही परंपरा ४७५ बीसी पासून २२१ बीसीच्या दरम्यान सुरु झाली होती. जेव्हा जाओ स्टेटची राजकुमारीचे लग्न यैन राज्यात झाली होती. तेव्हा जाते वेळी तिची आई जोरजोरत रडू लागली होती आणि मुलीला लवकर घरी परतण्यास तिने सांगितले होते.

Wedding Tradition in China
Wedding Tradition in China

वधू रडली नाही तर वाईट मानले जाते
असे मानले जाते की, जर वधू रडली नाही तर तिची थट्टा उडवली जाते आणि लोक त्याला परिवाराची वाईट पिढी मानले जाते. अशा काही कार्यक्रमांच्यावेळी जर वधू रडली नाही तर तिची आई आपल्या मुलीला मारुन रडवते. जेथे एका बाजूला दक्षिण पश्चिम प्रांतात फक्त वधू रडते अशी प्रथा आहे. तर पश्चिम प्रांतात ही पद्धत थोडी वेगळी आहे. येथे त्याला जुओ टांग असे म्हटले जाते. याचा अर्थ असा होतो की, हॉल मध्ये बसणे. लग्नाच्या एका महिन्यापूर्वी रात्रीच्या वेळी वधूला एका मोठ्या हॉलमध्ये जाते आणि तेथे ती एक तास तरी रडते. त्यानंतर १० दिवसानंतर तिची आई सुद्धा त्यामध्ये सहभागी होते. नंतर १० दिवस आजी-बहिण, मावशी- आत्या असे सगळे जण एकत्रित रडतात. रडण्यासह एक खास गाणे सुद्धा वाजवले जाते आणि त्यावर ही सगळेजण रडणे सुरु करतात. याला ‘क्राइंग मॅरेज सॉन्ग’ असे म्हटले जाते. (Wedding Tradition in China)

हे देखील वाचा- पुष्कर मेळाव्यामध्ये उंट मेळाव्याचे दर्शन

वधूसह अन्य महिला रडतात त्यामागे आहे हे कारण
ऑडिटी सेंट्रलच्या रिपोर्टमध्ये असे सांगितले गेले आहे की, आधीच्या वेळी वधू रडण्यासह ती अशा अपशब्दांचा वापर करायची ज्यांनी तिचे लग्न ठरवले आहे. या सर्वामागे एक कारण ही सांगितले आहे. त्यानुसार त्यावेळी महिलांना आपला पार्टनर निवडण्याची परवानगी नसायची. तसेच लग्नासंदर्भात त्या काही बोलू शकत होत्या. लग्नानंतर त्यांना रडावे लागू नये म्हणून त्या आधीच रडायच्या. त्याचसोबत परिवारातील दुसऱ्या महिलांना रडताना पाहून त्यांना असे सांगितले जायचे की, त्यांच्यासोबत सुद्धा असेच झाले आहे. यामुळे तू नव्या आयुष्याची सुरुवात शांत आणि स्वच्छ मानने करु शकते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.