Home » ‘या’ कारणास्तव घरात पैसा टिकत नाही

‘या’ कारणास्तव घरात पैसा टिकत नाही

आपल्या सर्वांच्या आयुष्यात पैसा हा फार महत्त्वाची भुमिका बजावतो. पैशांशिवाय कोणतेही काम पूर्ण केले जाऊ शकत नाही.

by Team Gajawaja
0 comment
Vastu tips for money
Share

आपल्या सर्वांच्या आयुष्यात पैसा हा फार महत्त्वाची भुमिका बजावतो. पैशांशिवाय कोणतेही काम पूर्ण केले जाऊ शकत नाही. पैसे कमावण्यासाठी प्रत्येक व्यक्ती फार मेहनत करतो. मात्र कधीकधी असे होते की, पैसे कमावतो पण त्याची बचत होत नाही. घरात अधिक पैसे आले तरीही ते टिकत नाहीत. जेव्हा व्यक्तीचे पैसे अनावश्यक रुपात खर्च होऊ लागतात तेव्हा तो टेंन्शनमध्ये येतो. त्याला कळत नाही की काय करावे आणि काय करू नये. याचा व्यक्तीवर शारीरिक आणि मानसिक रूपात परिणाम होतो. (Vastu tips for money)

वास्तु शास्रानुसार घरातील असलेल्या वास्तु दोषामुळे व्यक्तीच्या पैशांची हानी होते. कधीकधी काही चुका अशा असतात ज्या दिसायला अत्यंत साधारण असतात, मात्र त्यामुळे व्यक्तीला आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच तुमच्या घरात सुद्धा पैसा टिकत नसेल तर घरातील काही वस्तूंकडे आवश्यक लक्ष द्या.

पाण्याचा अपव्यय
तुमच्या घरात भले बाथरुम किंवा किचन मधील नळातून पाणी टपकत असेल. मात्र वास्तु शास्रानुसार हा एक दोष आहे. नळातून पाणी वाहत राहिल्याने ही घरातील पैशांची हानी होते. तर तुमच्या घरात सुद्धा असे होत असेल तर घरातील नळ ठीक करुन घ्या.

घरात सुकलेली झाडे
वास्तुनुसार जर तुमच्या घरात किंवा आजूबाजूला एखादे सुकलेले झाड असेल तर यामुळे सुद्धा निगेटिव्हिटी वाढली जाते. अशातच सकारात्मक उर्जा घरात येत नाही. घरातील वातावरण ही बिघडले जाते. त्यामुळे घरी जर झाडं लावणार असाल तर त्याची योग्य ती काळजी घ्या. जर एखाद्या कारणास्तव झाडं सुकत असेल तर ते काढून टाका अथवा नवे झाडं लावा.

पुढील उपाय जरुर करुन शकता- 

दक्षिणावर्ती शंख ठेवा
जर घरात सातत्याने पैशांची हानि होत असेल तर घरातील देव्हाऱ्याच्या ठिकाणी दक्षिणावर्ती शंख ठेवा. हा शंख ठेवल्याने देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची कृपा तुमच्यावर राहिल.

घर स्वच्छ ठेवा
ज्या घरात अस्वच्छता असते तेथे दारिद्र्याचा वास असतो. घरात लक्ष्मीचा वास असावा म्हणून घर, बाथरुम, किचन स्वच्छ ठेवा. यामुळे घरात सकारत्मकता ही वाढली जाते. (Vastu tips for money)

नियमित पूजा करा
जर तुमच्या घरी पूजा होत नसेल तर ती करण्यास सुरुवात करा. वास्तुनुसार ज्या घरात पूजा-पाठ होत नाही त्या घरात निगेटिव्हिटी येते. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ पूजा जरूर करा.

हेही वाचा- हनुनानाच्या काळ्या रंगातील मुर्तीची पूजा करण्यामागील ‘ही’ आहे पौराणिक कथा

तिजोरी उत्तर दिशेला खुलणारी हवी
उत्तर दिशा ही कुबेराची मानली जाते. तुमच्या घरात धनाची कमतरता येऊ नये म्हणून तिजोरी अशा प्रकारे ठेवा की, त्याचे मुख उत्तर दिशेला उघडले जाईल.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.