Home » सौदी अरेबियामध्ये दारू पिण्याविरुद्ध कडक कायदे

सौदी अरेबियामध्ये दारू पिण्याविरुद्ध कडक कायदे

by Team Gajawaja
0 comment
Saudi Arabia
Share

सौदी अरेबियामधील (Saudi Arabia) कडक कायदे हे अनेकवेळा वादाचा विषय झाले आहेत.  या देशात कायदेशीर व्यवस्था शरीरावर आधारित आहे.  परिणामी येथे दारु पिणे आणि विकणे हा अपराध मानला जातो.  सौदी अरेबियामध्ये पर्यटनासाठी जाणा-या पर्यटकांनाही या कायद्याला मानावे लागले.  तसेच हे पर्यटक दोषी आढळल्यास त्यांना कडक शिक्षाही देण्यात येते.  मात्र आता हाच सौदी अरेबिया आपले कायदे बदलत आहे.  सौदीमध्ये चक्क दारुचे दुकान सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.  सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये पहिले दारु विक्रीचे दुकान चालू करण्यात येणार आहे. 

सौदी अरेबियाचे (Saudi Arabia) प्रिन्स सलमानने यांनी दारुची मोठ्या प्रमाणात होणारी तस्करी रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.  शिवाय गेल्या काही वर्षापासून प्रिन्स सलमान परदेशी पर्यटकांना सौदीकडे आकर्षित करण्यासाठी विविध योजना राबवित आहेत,  त्यातूनच ही दारु दुकानाला परवानगी दिली असल्याची चर्चा आहे.  यापैकी कोणतेही कारण असले तरी सौदी अरेबियाच्या या निर्णयानं तेथील परदेशी राजनैतिक अधिका-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  

सौदी अरेबियामध्ये 1952 नंतर प्रथमच पहिले दारु विक्रीचे दुकान उघडण्यात येणार आहे.  हे दुकान रियाधच्या डिप्लोमॅटिक क्वार्टरच्या मधोमध चालू होणार आहे.  याच भागात अनेक देशांचे अनेक देशांचे दूतावास आहेत  शिवाय अनेक परदेशी राजनैतिक अधिकारी या भागात  राहतात. या अधिकाऱ्यांना आता उघडपणे या दारुच्या दुकानातून दारु खरेदी करता येणार आहे.  सौदी अरेबियामध्ये प्रिन्स सलमान यांचा हा निर्णय देशातील कायद्यांचे उदात्तीकरण करण्यासाठी उचललेले पाऊल म्हणून पाहिले जात आहे.(Saudi Arabia) 

सौदीमध्ये दारू विक्री आणि दारु पिण्याबाबत अतिशय कडक कायदे आहेत.  1952 नंतर प्रथमच सौदी अरेबियामध्ये मद्यविक्रीसाठी दुकान उघडले आहे.  सध्या या दुकानातून फक्त बिगर मुस्लिम मुत्सद्दीच मद्य, बिअर किंवा वाईन खरेदी करू शकतील, हे स्पष्ट करण्यात आले आहे.   तसेच वाईन खरेदी करण्यासाठी आलेल्या अधिका-यांना त्यांचे ओळखपत्र दाखवावे लागेल.  याशिवाय ही मद्यविक्री करणा-यालाही दुकान कायद्याच्या चौकटीतच चालवावे लागणार आहे.  या दुकानदाराकडेही स्वतःचे ओळखपत्र असणे गरजेचे आहे.  शिवाय दिवसाला किती मद्याचा साठा केला आहे, हे स्पष्ट करावे लागणार आहे.  

सौदी अरेबियामध्ये 1951 मध्ये झालेल्या एका घटनेनंतर येथे दारु विक्रीचे नियम अत्यंत कडक करण्यात आले.  1951 मध्ये सौदीचे राजे अब्दुल अजीझ यांच्या मुलाने एका पार्टीत दारूच्या नशेत ब्रिटीश राजनैतिक अधिका-यावर गोळ्या झाडल्या.  यात तो ब्रिटिश अधिकारी मरण पावला.  या घटनेनंतर राजकुमारावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.  2000 साली त्यांचेही निधन झाले. मात्र ही घटना घडल्यापासून सौदीमधील दारु विक्रीचे आणि दारु सेवनाचे कायदे अत्यंत कडक करण्यात आले.  आता येथे दारु विक्रीचे दुकान सुरु झाले असले तरी त्यातून गैर-मुस्लिम व्यक्तीच खरेदी करू शकणार आहेत.  (Saudi Arabia)

सौदी अरेबियातील बहुतांश लोकसंख्या इस्लामची अनुयायी आहेत.  येथेच  इस्लामची काबा, आणि  मक्का ही पवित्र स्थाने आहेत. त्यामुळे दारुबंदी होती.  मात्र असे असले तरी गेल्या काही वर्षात सौदीमध्ये दारूची तस्करी वाढल्याच्या घटनांची नोंद झाली होती.  त्यामध्ये विदेशी दुतावासातील अधिका-यांचाही समावेश होता.  

============

हे देखील वाचा : मोनालिसाच्या चित्रात अनेक गुढ संदेश असल्याची चर्चा

============

विदेशी दूतावास आणि सौदी सरकारसोबतच्या विशिष्ट करारानुसार अल्कोहोल आयात होऊ शकते.  याचा आधार घेत  दारूच्या बाटल्यांचा काळाबाजार होऊ लागला.  सौदीमध्ये कोणत्या दूतावासात दारू विकतात याची उघड चर्चा होत होती.  काहींनी तर दारु विक्रीचा साईड बिझनेस सुरु केल्याचीही चर्चा होती.  दूतावासांमध्ये आलेली दारु  काळ्या बाजारात विक्री होत असे, यासंदर्भातील भक्कम पुरावे हाती आल्यावर सौदीचे क्राऊन प्रिन्स सलमान यांनी याच दुतावासांच्या भागात दारु विक्रीचे दुकान चालू करण्याची परवानगी दिली आहे.  त्यातून ही तस्करी थांबेल असा अंदाज आहे.   

प्रिन्सच्या या निर्णयामागे जास्तीत जास्त पर्यटकांना सौदीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न म्हणूनही पाहिले जाते.  या निर्णयाचा संबंध क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी घेतलेल्या सुधारणांशी जोडला जात आहे.  या निर्णयामुळे सौदी अरेबियाला (Saudi Arabia) परंपरावादी मुस्लिम देशाचे लेबल हटवायचे आहे, असे मानले जात आहे. सौदी अरेबियामध्ये दारू पिण्याविरुद्ध कडक कायदे आहेत. दारू पिणाऱ्याला येथे फटके मारण्याची शिक्षा दिली जाते. मात्र, आता त्याची जागा तुरुंगवासाने घेतली आहे.

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.