Home » फ्लाइट रद्द झाल्यानंतर रिफंड मिळलेच पण ‘या’ गोष्टींसाठीही आहात हकदार

फ्लाइट रद्द झाल्यानंतर रिफंड मिळलेच पण ‘या’ गोष्टींसाठीही आहात हकदार

तुम्ही फ्लाइटचे तिकिट बुकिंग केले आहे आणि कंपनीकडून ते रद्द केल्यास अथवा उशिराने सुटणार असल्यास डीजीसीएच्या नियमांबद्दल जाणून घ्या.

by Team Gajawaja
0 comment
Flight Passenger Rights
Share

फ्लाइटमधून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण जर तुम्ही फ्लाइटचे तिकिट बुकिंग केले असेल आणि विमान कंपनीने फ्लाइट रद्द केल्यास अथवा उशिराने उड्डाण करणार असल्यास त्यासंबंधित डीजीसीएच्या नियमाबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. खरंतर या नियमाबद्दलची माहिती नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल वीके सिंह यांनी दिली आहे. (Flight Passenger Rights)

वीके सिंह यांच्यानुसार फ्लाइट रद्दा झाल्यास विमान कंपनी पर्यायी फ्लाइट उपलब्ध करून देईल अथवा तिकिटाचे पूर्ण रिफंड देईल. एवढेच नव्हे तर विमान कंपनी प्रवाशांना अतिरिक्त नुकसान भरपाईही देईल. याशिवाय विमान कंपनी मूळ उड्डाणासाठी आलेल्या प्रवाशांना पर्यायी उड्डाणाच्या प्रतीक्षेदरम्यान खाण्यापिण्याची देखील सुविधा देईलय

अशा प्रकारे उड्डाणासाठी उशिर झाल्याप्रकरणी विमान कंपनीला जेवण आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करावीच लागणार आहे. प्रवाशाला ऑप्शनल उड्डाण अथवा तिकिटाचे संपूर्ण रिफंड किंवा थांबण्यासाठी हॉटेल बुकिंग करून देणे आवश्यक आहे.

आणखी एक नियम म्हणजे, विमान कंपनीच्या नियंत्रणाबाहेरील असाधारण परिस्थितीमुळे फ्लाइट रद्द करत असल्यास अथवा उशिराने उडणार असल्यास, त्या स्थितीत विमान कंपनी नुकसान भरपाई देण्यास बांधील राहणार नाही. उड्डाणासाठी उशिर अथवा रद्द झाल्याने प्रभावित प्रवाशांना दिली जाणारी सुविधा मंत्रालयाच्या वेबसाइटवर जारी करण्यात आल्या आहेत.

Your Rights When There's a Flight Delay

विमानतळावर सामान हरवल्यास काय कराल?
विमानतळावर तुमचे एखादे सामान हरवल्यास अथवा फाटल्यास कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास या स्थितीत तातडीने एअरलाइन्सला लेखी तक्रार द्यावी. याशिवाय तुम्हाला संपत्ती अनियमितता रिपोर्ट (PRI) घेणे गरजेचे आहे. (Flight Passenger Rights)

सामानचे नुकसान झाल्यास, एअरलाइन्स तुम्हाला सामान दुरूस्तीसाठी पेमेंट करू शकते. अथवा त्या बॅगेएवजी दुसरी बॅग अथवा सुटकेस उपलब्ध करून देऊ शकते. सामान हरवल्यास एअरलाइन्सने प्रवाशाला द कॅरेज बाय एअर अॅक्ट, 1972 अंतर्गत नुकसान भरपाई द्यावी.

या गोष्टीही ठेवा लक्षात
-प्रवाशाने आपल्या सामानाची काळजी स्वत: घ्यावी.
-फ्लाइटमध्ये कधीच धुम्रपान करू नये
-कॉकपिटमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नये
-उड्डाणावेळी नेहमीच केबिन क्रू द्वारे देण्यात येणाऱ्या घोषणांकडे लक्ष द्या


हेही वाचा: Year Ender 2023: यंदाच्या वर्षात या व्यायसायिकांना बसला सर्वाधिक आर्थिक फटका, संपत्तीही झाली घट


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.