Home » ओरछाच्या जंगलात पुरातन मंदिराचे अवशेष

ओरछाच्या जंगलात पुरातन मंदिराचे अवशेष

by Team Gajawaja
0 comment
Orchha Forest
Share

हा खजिना पैशाच्या स्वरुपात नसून हा खजिना वास्तूच्या स्वरुपात मिळाला आहे. या ओरछामधील एका भागात जवळपास 22 जुन्या वाड्यांचे अवशेष सापडले आहेत. आतापर्यतची ही सर्वात मोठी घटना असून या सर्व वास्तू 500 वर्ष जुन्या असल्याचे इतिहासतज्ञांनी स्पष्ट केले आहे. उत्खननात 22 वाड्यांचे अवशेष आणि दरबारी वसाहतींच्या वास्तूंसह पुरातन काळातील अनेक भांडी आणि अन्य सामग्रीही सापडली आहे. यामुळे या सर्व भागात पुरतत्व विभागाचे अधिकारी अधिक बारकाईनं खोदकाम करत असून हा भाग पूर्वी अयोध्या नगरीचा महत्त्वाचा भाग असल्याची माहिती आहे. (Orchha Forest)

ओरछा (Orchha Forest) या ऐतिहासिक शहरातील बेटवा नदीच्या उत्तरेकडील काठावर घनदाट जंगलाच्या मध्यभागी कच-याचे ढिग होते.  याच कच-याच्या ढिगाखालून एक जुने शहरच इतिहासकारांना सापडले आहे. या सर्व जागेची शास्त्रोक्त पद्धतीने साफसफाई केली असता सुमारे 500 वर्षे जुन्या 22 वास्तू येथे समोर आल्या आहेत. 15 एकरमध्ये पसरलेल्या या वास्तू एखाद्या लहानशा शहरासारख्या आहेत. या ठिकाणी सापडलेल्या सर्व वास्तूचा पाया हा भक्कम असून सर्वांना तळघराचा भाग आहे. जंगल स्वच्छता मोहिमेअंतर्गत हा शोध लागला. यामुळे मध्यप्रदेशचे महत्त्व वाढले असून हा सर्व भाग संरक्षित करण्यात आला आहे. हा मोठा शोध हाती लागल्यावर याबाबत एक समिती नेमण्यात आली आहे. या प्रकल्पाचे नेतृत्व पुरातत्वतज्ज्ञ डॉ. रमेश कुमार यादव करीत आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, या जागी कच-याचे मोठे ढिगारे होते. ते काढून टाकल्यावर 22 वास्तूंचे अवशेष सापडले. हे पुरातन काळातील राजवाडे असल्याचे स्पष्ट झाले आहे. ओरछा(Orchha Forest) शहराची स्थापना 16-17 व्या शतकात बुंदेला राजा भारती चंद यांनी केली होती. त्यांचे वंशज मधुकर शाह यांनी 17 व्या शतकात येथे राम राजा सरकार आणि जगप्रसिद्ध चतुर्भुज मंदिराची स्थापना केली होती.  त्याच काळातील हे अवशेष आहेत का, याचा शोध आता घेण्यात येत आहे.  ओरछा (Orchha Forest) हे राजे आणि सम्राटांचे शहर होते.  आताही येथे काही राजवंशातील कुटुंबे राहतात. या ओरछाच्या जंगलात आता हा पुरातन खजिना मिळाला आहे. येथे खोदकाम करताना घरांमध्ये वापरलेली मातीची भांडी,  दगडाची चक्की, स्वयंपाकघर, धान्य ठेवण्यासाठीची भांडी, लहान मुलांची मातीची खेळणी, विहिरी आणि मंदिराचे अवशेष सापडले आहेत. नेहमीची वापरात येणारी ही सर्व भांडी अतिशय मजबूत होती.  यावरुन या भागात सुनियोजीत  पद्धतीचं एक शहर असावं असा अंदाज व्यक्त होत आहे. इतिहासकारांच्या मते हा भाग म्हणजे, राजाच्या कर्मचा-यांची वस्तीस्थान असावे. त्यातील मिळालेल्या वस्तू आणि सामग्री पाहून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.(Orchha Forest)

सुरुवातीला घनदाट अरण्यातील कचरा साफ करताना काही विटा हाती लागल्या. मग हे प्रमाण वाढल्यामुळे संबंधित खात्याबरोबर संपर्क साधण्यात आला. त्यावेळी पुरातत्व खात्यानं या सर्व भागाचे काळजीपूर्वक उत्खलन सुरु केले आणि येथून किमान 22 वाड्यांचे अवशेष सापडले. उत्खननात मिळालेले वाडे एकेकाळी अतिशय संपन्न असल्याच्या खुणा आहेत. याशिवाय त्या काळातील मातीच्या आणि टेराकोटाच्या भांड्यांबरोबरच इतर वस्तूही येथे सापडल्या आहेत. या शोधानंतर ओरछा किल्ला संकुलाच्या 800 मीटरपेक्षा जास्त परिसरात उत्खनन आणि साफसफाईचे काम चालू करण्यात आले आहे.  या शोधामुळेस 500 वर्षांपूर्वी, 15 व्या शतकात, ओरछा हे सर्वात विकसित संस्थानांपैकी एक होते, हे स्पष्ट झाले आहे.(Orchha Forest)  

======

हे देखील वाचा : मृत्यूनंतर चोरला होता आइंस्टाइन यांचा मेंदू

=====

सात ते आठ महिन्यापूर्वी ज्या भागात घनदाट जंगल होते तेथे 500 वर्षे जुन्या 22 वास्तू सापडल्या आहेत. 80 एकरांवर पसरलेल्या अशा वास्तू एखाद्या लहानशा शहरासारख्या आहेत. या सर्वांचे जतन करणे आता सर्वात मोठे आव्हान आहे. पुरातत्व विभाग या भागात अजून काही महिने शोध मोहीम राबवणार आहे. मुळात या सर्व वस्तू जिथे सापडल्या आहेत, तिथेच त्या मांडून ठेवण्यात येणार आहेत. भविष्यात या सर्व वास्तू पर्यटकांना पाहता येतील अशीही व्यवस्था करण्याचा पुरातत्व विभागाचा मानस आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.