Home » अमेरिकेच्या ‘या’ शहरात अनेकदा पडतो माशांचा पाऊस, जाणून घ्या विचित्र कारण

अमेरिकेच्या ‘या’ शहरात अनेकदा पडतो माशांचा पाऊस, जाणून घ्या विचित्र कारण

0 comment
Share

अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आकाशातून माशांचा पाऊस सुरू झाला आणि ते पाहून लोक थक्क झाले. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये पाऊस पडत असताना, लोकांनी त्यांच्या छतावर अँकोव्ही नावाचे छोटे मासे पाहिले. हे मासे सामान्यत: समुद्राच्या पाण्यात आढळतात. परंतु यावेळी हे मासे सॅन फ्रान्सिस्कोमध्ये लोकांची छते आणि उद्यानांव्यतिरिक्त कारवरही पाहायला मिळाले, ज्यामुळे लोक खूप आश्चर्यचकित झाली आहेत. (rain of fish)

याआधी ही घटना अमेरिकेतील टेक्सास आणि आर्कान्सा दरम्यान असलेल्या टेक्सर्काना नावाच्या ठिकाणी घडली होती. हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले होते. ते घर सोडून रस्त्यावर आले, तेव्हा त्यांना आजूबाजूला मासे पडलेले दिसले. लोकांनी या घटनेशी संबंधित फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. (rain of fish)

एवढेच नाही, तर काही लोकांनी संधीचा फायदा घेत मासे गोळा करून घरी नेले. नंतर शहराच्या अधिकृत फेसबुक पेजवरून सांगण्यात आले की, ही जादू नाही. या दुर्मिळ घटनेला विज्ञानात ‘ऍनिमल रेन’ म्हणतात. (rain of fish)

हे देखील वाचा: विचित्र गाव! जिथे जन्मल्यानंतर अंध होतात माणसांपासून ते जनावरापर्यंतची मुलं

खरं तर हे चक्रीवादळामुळे होते. चक्रीवादळ शक्तिशाली बनले की ते प्राण्यांना आपल्या कवेत घेते. त्यानंतर हे वादळासह जमिनीकडे सरकते. जेव्हा वादळ कमकुवत होते, तेव्हा चक्रीवादळात उपस्थित प्राणी हवेतून जमिनीवर पडू लागतात. आणि जणू आकाशातून जीवांचा वर्षाव होत आहे, असे वाटते. (rain of fish)

यावेळी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्येही हे दृश्य पाहायला मिळाले. मात्र यावेळी सीगल्स, पेलिकनसारखे काही मोठे पक्षीही यामागे असल्याचे सांगितले जात आहे. सॅन फ्रान्सिस्को हे सागरी क्षेत्र असून येथे अँकोव्ही माशांची संख्या खूप जास्त आहे. त्यांना सीगल्स आणि पेलिकन नावाचे पक्षी खातात. जेव्हा या पक्ष्यांना मोठ्या प्रमाणात मासे मिळतात, तेव्हा ते नवीन मासे पकडण्याच्या प्रक्रियेत जुने मासे खाण्याऐवजी कोणत्याही ठिकाणी टाकतात. (rain of fish)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.