Home » खाकी: द बिहार चॅप्टर ही वेबसिरीज चर्चेत

खाकी: द बिहार चॅप्टर ही वेबसिरीज चर्चेत

by Team Gajawaja
0 comment
Web Series Launched
Share

2016 मध्ये किंगफिशर तर्फे झालेल्या सुपरमॉडेल स्पर्धेत एक बिहारी मुलगी विजेती ठरली होती.  पुढे ही मुलगी किंगफिशर कॅलेंडर गर्ल म्हणून ओळखली गेली.  तिनं फॅशनच्या दुनियेत पाऊल ठेवलं.  मॉडेल म्हणून ती ओळखली जाऊ लागली.  आता 2022 मध्ये पुन्हा ही मुलगी चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. त्याला निमित्त झालं आहे ओटीटी प्लॅटफॉर्म, नेटफ्लिक्सवर प्रदर्शित(Web Series Launched) झालेल्या खाकी: द बिहार चॅप्टर या सिरीजचे.  या सिरिजमध्ये डोक्यावर पदर घेतलेल्या मीतादेवीनं आपल्या अभिनयाचा आणि सौदर्याचा ठसा उमटवला आहे.  ही मीतादेवी म्हणजे बिहार गर्ल म्हणून ओळख असलेली ऐश्वर्या सुष्मिता.  दिल्लीमध्ये शिकलेली ऐश्वर्या बॅडमिंटनपटू आहे.  मात्र दिल्लीत कॉलेजमध्ये असतांना तिची निवड मॉडेल म्हणून झाली आणि ऐश्वर्या या चंदेरी दुनियेत आली.  याआधीही काही वेबसिरीजमध्ये ऐश्वर्या होती. पण खाकी: द बिहार चॅप्टरमध्ये तिनं साकारलेल्या मीतादेवीमुळे ऐश्वर्याची चर्चा सुरु झाली आहे.  

ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर काही दिवसांपूर्वी खाकी: द बिहार चॅप्टर ही वेबसिरीज प्रदर्शित(Web Series Launched) झाली आहे. या सिरीजमध्ये बिहारमधील गुंडाराजचे चित्रण आहे.  मात्र त्यासोबत मुळ बिहारची असलेल्या ऐश्वर्याच्या अभिनयामुळे ही वेबसिरीज चर्चेत आली आहे. मालिकेत ऐश्वर्या सुष्मिताने  एका साध्या खेड्यातील स्त्रीची, मीतादेवीची भूमिका साकारली आहे.  ग्लॅमरस असणारी ऐश्वर्या या सिरिजमध्ये साधी साडी आणि डोक्यावर पदर अशा वेशात दिसली आहे.  यातही तिचे सौदर्य आणि अभिनय हा सरस ठरलाय.  त्यामुळेच ही ऐर्श्वया सुष्मिता नेमकी कोण हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.  ऐश्वर्याचे फोटोही सोशल मिडीयामध्ये लाखो लाईक मिळवत आहेत.  

खाकी द बिहार चॅप्टर या वेबसिरीजची स्टार ठरलेली ऐश्वर्या बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील रहिवासी आहे. दिल्ली विद्यापीठातून तिनं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे.  या दरम्यान ऐश्वर्यानं अनेक फॅशन शोमध्ये भाग घेतला,  तसेच रॅम्प वॉकमध्येही  ऐश्वर्या दिसली आहे.  ऐश्वर्याने मिस इंडिया स्पर्धेद्वारे फॅशन जगात पाऊल ठेवले. कॅम्पस प्रिन्सेस म्हणूनही तिचा गौरव झाला आहे.  मॉडेलिंगमधील या यशानंतरच ऐश्वर्याने मुंबईला स्थलांतरीत होण्याचा विचार सुरु केला.  महाविद्यालयात असताना सौंदर्य स्पर्धांमध्ये ऐश्वर्या टॉप-लिस्टमध्ये असायची.  त्यामुळे  ऐश्वर्याच्या कुटुंबानेही तिची आवड ओळखली आणि तिला मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी प्रोत्साहित केले. 2016 मध्ये किंगफिशर सुपरमॉडेल 3 जिंकून ऐश्वर्या सुष्मिता किंगफिशर कॅलेंडर गर्ल झाली. ऐश्वर्या सुष्मिता देखील तिच्या कॉलेजच्या दिवसात बॅडमिंटनपटू म्हणूनही प्रसिद्ध होती.  ऐश्वर्या राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटनपटू राहिली आहे. उत्कृष्ठ नृत्यांगना म्हणूनही तिची ओळख आहे.  आताही ऐश्वर्या सोशल मिडीयावर तिचे बेली डान्सचे  व्हिडिओ शेअर करत असते. 

========

हे देखील वाचा : आजच्या काळात सुद्धा या ठिकाणी महिलेचे असतात काही नवरे, महाराभारताच्या काळापासून सुरु आहे परंपरा

========

बॉलिवूडमध्ये आल्यावर ऐश्वर्याने अनेक ठिकाणी ऑडीशन दिल्या.  अखेर तिला दिग्दर्शक नीरज पांडे यांनी पहिली संधी दिली.  शल ऑप्स 1.5 या वेब सीरिजमधून ऐश्वर्या पहिल्यांदा छोट्या पडद्यावर आली. या मालिकेतील तिच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले.  आता ऐश्वर्या नीरज पांडेच्या खाकी द बिहार चॅप्टर या वेब सीरिजमध्ये करण ठक्कर आणि अविनाश तिवारीसोबत काम करत आहे.  तिनं या सिरीजमध्ये मीताबाई नावाच्या गावातील महिलेची भूमिका केली आहे.  बिहारमध्ये गुंडाराज असतांना सर्वात जास्त होरपळ झाली ती महिलांचीच.  मीताबाईच्या या भूमिकेतून ऐश्वर्याने हिच होरपळ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.  खाकी: द बिहार चॅप्टरमध्ये गँगस्टर चंदन महतो आणि आयपीएस अमित लोढा यांच्यातील युद्ध दाखवण्यात आले आहे.  मात्र या दोघांमध्ये वादाला तोंड फोडते ती मीरादेवी.  मीरादेवीचा प्रवेश होताच  या वेब सीरिजला वेगळे वळण मिळते.अतिशय साध्या आणि शांत चेह-याच्या मीता देवींचा प्रभाव इतका आहे की गुंड आणि पोलिस यांच्यात सुरू असलेल्या लढाईतही प्रेक्षक तिलाच महत्त्व देतात.  त्यामुळेच मीता देवी या वेब सीरिजचा टर्निंग पॉइंट ठरल्याचे मत अनेकांनी नोंदवले आहे.  ऐश्वर्या सुष्मिताच्या अभिनयाचे अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे.  नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली खाकी: द बिहार चॅप्टर ही वेब सिरीज आयपीएस अधिकारी अमित लोढा यांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित आहे(Web Series Launched). यामध्ये त्यांनी बिहारमधील पोस्टिंग दरम्यान घडलेल्या घटनांची संपूर्ण सत्यता सांगितली आहे. अतिशय रंजक असलेल्या या वेबसिरीजमध्ये तत्कालिन बिहारची सत्यपरिस्थिती मांडण्यात आली आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.