Home » जपानच्या शिस्तीने वाचवले प्राण ?

जपानच्या शिस्तीने वाचवले प्राण ?

by Team Gajawaja
0 comment
Japan Earthquake
Share

भूकंपाने उद्ध्वस्त झालेल्या जपानमध्ये मोठी दुर्घटना घडली. जपानच्या (Japan Earthquake) टोकियोमधील हानेडा विमानतळावर कोस्ट गार्डच्या विमानाला टक्कर दिल्यानंतर जपान एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली.  या विमानात 350 हून अधिक प्रवासी होते.  या दुर्घटनेत  पाच क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे.  विमानातील 367 प्रवासी आणि 12 क्रू सदस्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.  हानेडा विमानतळ हे जपानमधील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. 

आधीच भुकंपामुळे झालेल्या नुकसानीच्या धक्यात असलेल्या जपानच्या (Japan Earthquake) नागरिकांवर या विमान अपघातानं दुहेरी वार केला.  सर्वच सोशल मिडियावर रनवेवरुन धावणारे जपानचे जळते विमान दाखवले गेले.  ही दृश्य मनाला विचलीत करणारी होती.  मात्र या भयंकर दुर्घटनेनंतरही अगदी मोजक्या व्यक्तींचा मृत्यू झाला.  सर्व प्रवाशी यातून वाचले, हा एक चमत्कार आहे, अशी चर्चा सुरु झाली. 

कारण 19 ऑगस्ट 1980 रोजी सौदी अरेबियातील रियाधमध्ये असाच अपघात झाला होता.  यात 310 प्रवाशांचा मृत्यू झाला.  जपानमधील जळणारे विमान बघितल्यावर अनेकांना याच अपघाताची आठवण झाली.  मात्र जपानमधील नागरिक सुखरूप आहेत.  त्यांचे प्राण वाचले हा एक चमत्कारच मानण्यात आला. पण हा चमत्कार नव्हता तर या सर्व प्रवाशांचे प्राण वाचले, ते जपानमधील प्रचंड शिस्तिमुळे.  जपान हा शिस्तप्रिय देश मानला जोतो.  या देशात सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे, याचे काही अलिखित पण सक्तीचे नियम आहेत.  टोकियोमधील विमान अपघातातील प्रवाशांना याच अलिखित नियमांनी वाचवल्याचे आता स्पष्ट झाले आहे.  (Japan Earthquake)

जपान (Japan Earthquake) हा अनेक अलिखित नियम असलेला देश आहे. येथील लोक या नियमांसह वाढतात.  पिढ्यान पिढ्या, हे नियम जपण्यात आले आहेत.  एका पिढीनं दुस-या पिढीला न शिकवताही फक्त अवलोकन करत हे नियम जपानमध्ये पाळले गेले आहेत.  जपानमध्ये शिष्टाचारांना अत्यंत महत्त्व दिले जाते. अगदी रोजच्या जेवणात वापरल्या जाणा-या चॉपिस्टीक ते पोशाख, रस्त्यावर चालण्याचे नियम, सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्याचे नियम, असे अनेक नियम येथील जनतेनं स्वतःवर लादून घेतले आहेत.  या नियमांचे जपानमधील लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्व पालन करतात.  त्यामुळेच जपानमधील समाज हा शांतताप्रिय समाज म्हणून ओळखला जातो.  

===============

हे देखील वाचा :  पाकिस्तानमधील राम मंदिर आता चर्चेत

==============

जपानमध्ये फिरत असतांना अन्न खाणे चुकीचे मानले जाते.  जपानी (Japan Earthquake) नागरिक घरातूनच न्याहरी करुन बाहेर पडतात.  बाहेर पदार्थ विकत घेतले तर ते त्याच जागी बसून संपवतात.  तेथील डस्टबिनचा वापर करुन शिल्लक कचरा त्यात टाकतात आणि मार्गस्थ होतात.  शिवाय सार्वजनिक ठिकाणी खात असतील तर जपानी नागरिक बोलणेही टाळतात.  पोशाखाच्या बाबतीतही जपानी नागरिक कमालीची काळजी घेतात.  


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.