Home » ‘पुतिनशाही’ विरोधात तिचा संघर्ष

‘पुतिनशाही’ विरोधात तिचा संघर्ष

by Team Gajawaja
0 comment
Alexei Navalny
Share

रशियामधील विरोधी पक्ष नेते अलेक्सई नवलनी(Alexei Navalny) यांचा मृत्यू झाला आहे. वास्तविक हा मृत्यू की हत्या यावर रशियामध्ये वाद सुरु आहे. नवलनी यांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनीच मारल्याचा आरोप नवनली यांच्या पत्नीनं केला आहे. युलिया नवलनी यांनी आपल्या पतीच्या निधनानंतर पुतिन यांच्याविरोधात आंदोलन सुरु केले आहे. युलिया यांचे हे पाऊल खूप हिंमतीचे आहे. कारण नवलनी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलेल्या 200 नागरिकांना तेथील पोलीसांनी लगेच अटक करुन तुरुंगात टाकले आहे. अशा परिस्थितीत युलिया नवलनी यांनी पुतिन विरोधात सुरु केलेल्या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली आहे.

युलिया नवलनी यांनी फक्त पुतिनविरोधात आंदोलनाची घोषणा केली नाही तर पुतिनने नवलनीसह मला अर्धवट मारले आहे, मी माझ्या पतीचे काम पुढे नेईन, असा संदेश सांगणारा एक व्हिडिओच सोशल मिडियावर शेअर केला आहे. त्यामुळे आता युलिया नवलनी यांना अटक होणार का, पुतिन यांच्या अन्य विरोधकांप्रमाणे अलेक्सई नवलनी यांचाही संशयास्पद मृत्यू होणार का, अशा चर्चा रशियन समाजमाध्यमात सुरु झाल्या आहेत.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे सर्वात मोठे विरोधक अलेक्सई नवलनी(Alexei Navalny) यांचा तुरुंगात संशयास्पद मृत्यू झाला. नवलनी यांची पत्नी युलिया हिने नवलनी यांच्या मृत्यूसाठी पुतिन यांना जबाबदार धरुन त्यांचे आंदोलन पुढे नेण्याची घोषणा केली आहे. युलिया नवलनीने अलेक्सई नवलनीच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये नवलनीच्या मृत्यूसाठी पुतिनला जबाबदार धरत नवलनीच्या हत्येसोबतच पुतिनने माझा अर्धा नाशही केला आहे. पुतिनने माझे अर्धे हृदय आणि अर्धे आत्म्याचा नाश केला आहे, परंतु माझा अर्धा भाग शिल्लक आहे आणि म्हणतो की आपण हार मानू नये. आता मी माझ्या पतीचे काम पुढे नेईन. मी पुतीन विरोधात नवलनी प्रमाणेच आवाज उठवीन, असे युलियानं जाहीर केले आहे. याबरोबरच यामधील धोक्याचीही युलिया यांना कल्पना आहे. कारण मला माझ्या दोन्ही मुलांनी मुक्तपणे रशियामध्ये राहायचे आहे. ज्या स्वातंत्र्यासाठी नवलनीने आपले जीवन दिले. त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. पण पुतिन यांच्या विरोधात आंदोलनाची घोषणा करणे म्हणजे, किती धोकायदायक आहे, याची कल्पना असल्याचेही युलिया यांनी सांगितले. मी माझ्या मुलींना रशियामध्ये सुरक्षित आयुष्य देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

युलिया यांच्या मनात हे आंदोलन सुरु करतांना भीती आहे, कारण आत्तापर्यंत पुतिन यांच्या विरोधकांची काय अवस्था झाली आहे, हे त्यांनी पाहिले आहे. 2000 मध्ये पुतिन पहिल्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. 2008 साली पुतिन यांचे सर्वात मोठे समर्थक दिमित्री मेदवेदेव राष्ट्राध्यक्ष झाले. 2012 च्या निवडणुकीत पुतिन पुन्हा विजयी झाले आणि सत्तेत परतले. दरम्यान, ज्यांनी पुतीनच्या अधिकाराला आव्हान दिली त्यांची हकालपट्टी झाली, त्यांचा रहस्यमय मृत्यू झाला आहे किंवा त्याना तुरुंगात टाकण्यात आले आहे.

एप्रिल 2003 मध्ये पुतिन यांच्या विरोधी लिबरल रशिया पक्षाचे नेते सर्गेई युशेन्कोव्ह यांची हत्या झाली. युशेव्हकोव्हला त्यांच्या घराबाहेर गोळ्या घालून ठार मारण्यात आले. पुतिन हे त्यांच्या विरोधकांना विष किंवा किरणोत्सर्गी घटकांनी मारण्याच्या पद्धतीसाठी ओळखले जातात. त्यांचा सर्वात पहिला वापर अलेक्झांडर लिटविनेन्कोवर झाला. अलेक्झांडर हे रशियाच्या गुप्तहेर संस्थेच्या एफएसबीसाठी काम करत होते. ते पुतीनच्या सर्वात जवळचे होते. पण या दोघांत काही वाद झाल्यावर अलेक्झांडर लंडनला पळून गेले. पुतिनच्या माणसांनी त्याचा माग काढून त्यांना चहातून किरणोत्सर्गी मूलद्रव्य पोलोनियम-210 दिले. या विषामुळे अलेक्झांडरचा तीन आठवड्यांनंतर मृत्यू झाला.

 

========

ही देखील पहा : प्रिन्स हॅरी इंग्लंडचा राजा होणार….

========

अलेक्झांडरच्या मृत्यूबाबत रशियन मानवाधिकार पत्रकार पॉलिटकोव्स्काया यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांचाही मृत्यू झाला. ऑक्टोबर 2006 मध्ये 48 वर्षीय तरुणीची तिच्या फ्लॅटच्या लिफ्टमध्ये हत्या झाली. ही तरुणीही पुतिन यांच्या जवळची होती. नोव्हेंबर 2009 मध्ये पुतिनच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या सर्गेई मॅग्निटस्कीची तुरुंगात हत्या करण्यात आली. 2013 मध्ये, क्रेमलिनमध्ये काम करणाऱ्या आणि पुतिनचा विरोधक बनलेल्या बोरिस बेरेझोव्स्कीचा मृतदेह घराच्या बाथरूममध्ये सापडला. पुतिन विरोधक, बद्री पाटारकाटशिश्विली , निकोलाई ग्लुश्कोव्ह आणि युरी गोलुबेव्ह यांना फाशी देण्यात आली.

वॅग्नर प्रायव्हेट मिलिटरी कंपनीचे येवगेनी प्रिगोझिन यांनी जूनमध्ये पुतिन यांना आव्हान दिले होते. त्यानंतर दोन महिन्यांनंतर प्रिगोझिन आणि दिमित्री उत्किन यांना घेऊन जाणारे विमान पडले, त्यांत त्यांचा मृत्यू झाला. यापूर्वी 2022 मध्ये, युक्रेनवरील हल्ल्यावर टीका करणाऱ्या रेव्हिल मॅगानोव्हचा हॉस्पिटलच्या सहाव्या मजल्यावरील खिडकीतून पडून मृत्यू झाला. रेव्हिल हे रशियातील दुसरी सर्वात मोठी तेल कंपनी लुकोइलचे अध्यक्ष होते.

आता अलेक्सई नवलनी(Alexei Navalny) यांचाही असाच संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर नवलनी यांची पत्नी युलिया पुतिनविरोधात उतरली आहे. त्यामुळेच भविष्यात युलिया यांची अवस्था इतर पुतिन विरोधकांसारखी होईल का, अशी भीती व्यक्त होत आहे.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.