Home » पाकिस्तानात शिवलिंगावर दूध अर्पण करणारी फातिमा भुट्टो कोण?

पाकिस्तानात शिवलिंगावर दूध अर्पण करणारी फातिमा भुट्टो कोण?

by Team Gajawaja
0 comment
Fatima Bhutto
Share

पाकिस्तानात कट्टरपंथीयांच्या पोटात आता एका नव्या कारणामुळे दुखू लागले आहे. देशाचे माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांची नात आणि माजी पीएम बेनजीर भुट्टो यांची भाजी फातिमा भुट्टो हिने नुकत्याच ख्रिस्ती धर्मातील एका नागरिकाशी लग्न केले. येथ पर्यंत सर्वकाही ठीक आहे. पण आता तिने जे पाऊल उचलले त्यामुळे समाजात तिरस्काराची भावना निर्माण करणाऱ्यांच्या पोटात अधिकच दुखू लागले आहे. (Fatima Bhutto)

काबुलमध्ये जन्मलेली ४० वर्षीय फातिमा एक प्रसिद्ध पत्रकारांपैकी एक आहे. तिने ख्रिस्ती धर्मातील ग्राहम यांनी अत्यंत साध्या पद्धीने लग्न केले. त्यानंतर कराचीतील एका शंकराच्या मंदिरात गेली. तेथे शंकराचा आशीर्वाद घेतला आणि पिंडीवर दूध ही अर्पण केले. असे केल्याने तिला कराचीत राहणाऱ्या सिंधी लोकांनी सन्मान केला. पण काहींनी तिच्या अशा वागण्यावर ताशेरे ओढले आहेत. यामुळेच सोशल मीडियात वाद सुरु झाला आहे.

फातिमा भुट्टो आणि ग्राहम यांनी लग्नसाठी जे ठिकाण निवडले त्याची खुप तारीफ केली जात आहे. दोघांनी माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांच्या ७० क्लिफटन स्थित ऐतिहासिक लायब्रेरीत लग्न केले. याच दरम्यान फातिमाच्या भावाने तिच्या दंडावर आजीची इमाज जामीन बांधला.

Fatima Bhutto
Fatima Bhutto

फातिमाला विश्वास आहे की ती प्रथम मुस्लिम आहे, परंतु सर्व धर्मांचा आदर करते. ती स्वतःला धर्मनिरपेक्ष समजते. अनेक प्रसंगी ती इस्लाम धर्माच्या समर्थनार्थ उभी राहतानाही दिसते. बुरख्याच्या बाजूनेही ती म्हणाली होती की तो परिधान करणे किंवा न घालणे हा महिलांचा अधिकार आहे. (Fatima Bhutto)

प्राचीन काळापासून कराचीमध्ये सिंधी लोकांचे वर्चस्व आहे. त्यांच्या सन्मानार्थ फातिमा तिचा भाऊ आणि पतीसह येथील प्राचीन महादेव मंदिरात गेल्या. अनेक स्थानिक हिंदू नेतेही त्यांच्यासोबत होते. यानंतर त्यांनी शिवलिंगावर दूध अर्पण केले. याला जातीय सलोखा म्हणून पाहून अनेकांनी सोशल मीडियावर कौतुकाचे पूल बांधले. त्याचवेळी काही लोकांनी यावर नाराजी व्यक्त केली. एका व्यक्तीने लिहिले की, या विधीची गरजच काय होती.

हेही वाचा- सोन्याचा देश असलेला सुदान रडतोय…

आजोबा, वडिल, काका आणि आत्याची हत्या
पाकिस्तानच्या राजकारणात भुट्टो घराण्याचे रक्तही सामील आहे. या कुटुंबातील अनेकांनी आपले रक्त सांडले आहे. १९७९ मध्ये लष्करी उठाव झाला आणि हुकूमशहा झिया-उल-हक यांनी झुल्फिकार अली भुट्टो यांना फाशी दिली. 1985 मध्ये काका शाहनवाज भुट्टो यांचा मृतदेह फ्रान्समधील एका अपार्टमेंटमध्ये सापडला होता. 1996 मध्ये वडील मुर्तझा भुट्टो यांनीही फातिमाला सोडले. त्याचे घराबाहेर अतिक्रमण करण्यात आले. बुवा बेनझीर भुट्टो देशाच्या पंतप्रधान झाल्या असल्या तरी डिसेंबर 2007 मध्ये एका रॅलीदरम्यान त्यांचीही हत्या झाली होती.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.