Home » २०२४ चे सूर्यग्रहण दिसणार या शहरात…

२०२४ चे सूर्यग्रहण दिसणार या शहरात…

by Team Gajawaja
0 comment
america
Share

२०२४ सालातील पहिले सूर्यग्रहण ८ एप्रिल रोजी होत आहे. हे संपूर्ण सूर्यग्रहण मेक्सिको, अमेरिका आणि कॅनडामध्ये दिसणार आहे. स्थानिक वेळेनुसार, ग्रहण सकाळी ११.०७ मि. सुरु होणार आहे. यानंतर टेक्सास, ओक्लाहोमा, आर्कान्सा, मिसूरी, इलिनॉय, केंटकी, इंडियाना, ओहायो, पेनसिल्व्हेनिया, न्यूयॉर्क, व्हरमाँट, न्यू हॅम्पशायर आणि मेन या प्रमुख राज्यांमधून हे ग्रहण पाहिले जाणार आहे. अमेरिकेमध्ये (america) या ग्रहणाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. अमेरिकेत हे ग्रहण बघण्यासाठी ५० लाख नागरिक दाखल झाले आहेत. शिवाय अमेरिकेच्या अन्य प्रांतातील नागरिकही ग्रहण जिथून दिसणार आहेत, त्या शहरात दाखल होत आहेत.

मोठी आर्थिक उलाढाल या ग्रहण काळात अमेरिकेत (america) होत आहे. मात्र एकीकडे ग्रहणाबाबत उत्सुकता आणि दुसरीकडे अमेरिकेच्या दोन प्रमुख शहरांमध्ये झालेले भुकंप यामुळे भीतीची सावली अशा दोन टप्प्यात अमेरिका आहे. तीन दिवसांपूर्वी न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी या अमेरिकेच्या प्रमुख शहरांना भुकंपाचा धक्का बसला. हा भुकंप आणि त्यातही स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर पडलेल्या विजेचा फोटो यामुळे अमेरिकेत भीती व्यक्त करण्यात येत आहे. येणा-या ग्रहणामुळे अमेरिकेत अशा घटना होत असल्याची चर्चाही तेथील सोशल मिडियावर आहे. तसेच काहींनी तर हे जगाच्या अंताचे लक्षण असल्याची पोस्ट केली आहे. या चर्चा एवढ्या वाढल्या की अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हे विभागाला पुढे येऊन ग्रहणाचा आणि भूकंपाचा काहीही संबंध नसल्याचे सांगावे लागले आहे.

अमेरिकेतील (america) न्यू जर्सी आणि न्यूयॉर्कमध्ये ४.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. सूर्यग्रहणाच्या तीन दिवस आधी झालेल्या या भूकंपाने अमेरिकेत सोशल मिडियावर एका भविष्यवाणीची चर्चा सुरु झाली. एका जुन्या पुस्तकातील ही भविष्यवाणी असून यात हे जगाच्या अंताचे लक्षण असल्याचे म्हटले आहे. त्यातही अमेरिकेची ओळख असलेल्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यांनी न्यूयॉर्क शहराला बसलेल्या भूकंपाचे धक्के टिपले. या छायाचित्रात स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवरही वीज पडतांना टिपण्यात आले आहे. हे छायाचित्र सोशल मिडियात आले, आणि यापासूनच चर्चांना सुरुवात झाली.

न्यूयॉर्क शहरात झालेल्या भूकंपाच्या वेळी हे आश्चर्यकारक दृश्य दिसले. यात वादळा दरम्यान स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर वीज पडताना दिसत आहे. हे चित्र छायाचित्रकार डॅन मार्टिन यांनी आपल्या कॅमेऱ्यानी टिपले आहे. या छायाचित्रात विजेचा लखलखाट स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या टॉर्चला स्पर्श करताना दिसत आहे. त्यांनी या चित्राची खासीयत ओळखून ते लगेच सोशल मिडियावर शेअर केले. त्यानंतर न्यूयॉर्कचे गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी या भूकंपाचे वर्णन ‘गेल्या शतकातील पूर्व किनारपट्टीवरील सर्वात मोठ्या भूकंपांपैकी एक’ असे केले. या दोन्ही पोस्ट सोशल मिडियावर आल्या आणि अमेरिकेत (america) ग्रहण आणि भूकंप यांचा संबंध जोडण्यात आला. या भूकंपाचा केंद्रबिंदू न्यू यॉर्क शहराच्या पश्चिमेला सुमारे ६४ या भूकंपात कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. फिलाडेल्फिया ते न्यूयॉर्क शहरापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. यापूर्वी २०११ मध्ये व्हर्जिनियामध्ये ५.८ रिश्टर स्केलचा भूकंप आला होता. त्यानंतर हा आलेला सर्वाधिक मोठा भूकंप ठरला.

========

हे देखील पहा : चीनचा भाषिक दहशतवाद

========

ग्रहण जवळ आल्यावर अमेरिकेच्या (america) दोन शहरांवर आलेल्या या भूकंपानं येथील नेत्यानीही सोशल मिडियावर सुरु झालेल्या चर्चांना खतपाणी घातले. जॉर्जियाचे रिपब्लिकन प्रतिनिधी आणि डोनाल्ड ट्रम्प समर्थक मार्जोरी टेलर ग्रीन यांनी सोशल मिडियावर पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी सूर्यग्रहण आणि भूकंप हे दोन्हीही अमेरिकेसाठी वाईट असल्याचे म्हटले आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यावर त्यासंबंधी अनेकांनी प्रश्न विचारले. थोडेथोडके नव्हे तर तब्बल ६० लाखांहून अधिक जणांनी मार्जोरी यांच्या पोस्टवर प्रश्न विचारले आहेत किंवा आपले मत केले आहे.

यावरुन अमेरिकेत (america) ग्रहणावरुन किती चर्चा सुरु आहेत, याची कल्पना येते. अखेर ही चर्चा थांबण्यासाठी अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेचे पॉल अर्ल यांनी पुढाकार घेतला. भूकंपांचा खगोलीय घटनांशी काहीही संबंध नसल्याचे जाहीर केले. तसेच अशाप्रकारच्या कुठल्याही पोस्ट शेअर करु नयेत, असे आवाहन केले. तसेच ग्रहण आणि भूकंपाबद्दल अंधश्रद्धा पसरवू नका असे आवाहनही करण्यात आले आहे.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.