Home » शेवटच्या महिन्यात ‘या’ राशीच्या नशिबात राजयोग ; जाणून घ्या या आठवड्याचे राशिभविष्य

शेवटच्या महिन्यात ‘या’ राशीच्या नशिबात राजयोग ; जाणून घ्या या आठवड्याचे राशिभविष्य

by Team Gajawaja
0 comment
Weekly Horoscope 05 Dec to 11 Dec
Share

प्रत्येकजणाला आपल्या जीवनात पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. मग ते करिअरच्या बाबतीत असो, आरोग्याच्या बाबतीत असो, धन लाभाच्या बाबतीत असो की अगदी प्रेमाच्या बाबतीत… त्यामुळे हा आठवडा बारा राशींसाठी कसा असेल, कोणत्या राशींवर कुठल्या ग्रहांचा प्रभाव असेल हे जाणून घेऊयात… (Weekly Horoscope 05 Dec to 11 Dec)

मेष – आपल्या राशीच्या भाग्यस्थानात नुकताच शुक्र आणि बुधाने प्रवेश केला आहे. राशीतून चंद्राचे तर धनस्थानातून मंगळाचे भ्रमण होत आहे. हे ग्रहमान आपल्या वैयक्तिक उत्कर्षाच्या दृष्टीने अतिशय अनुकूल राहील. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. कवी, कलाकार, गायक, वादक यांना चाहत्यांकडून चांगली दाद मिळेल. लेखकांकडून दर्जेदार लिखाण होईल. कौटुंबिक संख्ये लाभेल. वडील भावंडांचे सहकार्य लाभेल. भाग्यस्थानातून होणारे हे बध- शुक्राचे भ्रमण आपणास सुख समाधान देणारे राहील, विलासी वृत्तीमध्येे वाढ होईल. उत्तरार्धात कौटुंबिक शुभ समारंभात सहभागी व्हाल. आप्तस्वकीयांच्या गाठीभेटीतून आनंद मिळेल.

शुभ दिनांक – 10, 11.

वृषभ – राशीतील मंगळ आपले धाडस, कर्तृत्व वाढवणारा राहील. प्रलंबित कामे मार्गी लागतील. कामानिमित्त घडणारे प्रवास फलदायी ठरतील. राशी स्वामी शुक्र 5 डिसेंबर रोजी आपल्या राशीच्या अष्टमस्थानात प्रवेश करत आहे. तिथे असलेल्या धनेश बुधा बरोबर शुक्राची युती होईल. अष्टमस्थानातील बुध शुक्राचे भ्रमण अनपेक्षित धनप्राप्ती करणारे राहील. वारसा हक्काने धनप्राप्ती अथवा लॉटरी, बक्षीस स्वरूपात लाभ होतील. भागीदारी व्यवसायातून नवीन प्रकल्प हाती घेतले जातील. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल.

शुभ दिनांक – 7, 8

मिथुन – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या लाभस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. तसेच व्ययेश शुक्रा व राशीस्वामी बुध यांचे सप्तम स्थानातून भ्रमण होत आहे. नवीन ओळखीतून कामे मार्गी लागतील. गोड बोलून आपली कामे पूर्ण करून घ्याल. आपली इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील. हाती घेतलेल्या कामात कल्पनाशक्तीच्या जोरावर यश लाभेल. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. विवाहेच्छूक तरुणांना योग्य जोडीदार मिळेल. जोडीदाराच्या उत्कर्षाची वाढता कानी येईल. कुटुंबातील वातावरण, आनंदी उत्साही राहील. कुटुंबात आपल्या मतांचा आदर केला जाईल.

शुभ दिनांक – 9, 10

कर्क – आपल्या राशीच्या कर्मस्थानातून राहू हर्षल वरून चंद्राचे भ्रमण होत आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम कराल. सामाजिक पतप्रतिष्ठाा उंचावेल. लाभस्थानावरील मंगळावरून होणाऱ्या चंद्र भ्रमणामुळे आपल्या समस्यांवर योग्य मार्ग मिळेल, आणि आपण चिंतामुक्त व्हाल. नोकरीत आपले काम वरिष्ठांच्या पसंतीस उतरेल. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगल्या संधी चालून येतील. नोकरी व्यवसायात स्थिरता लाभेल. बढती बदलीचे योग येतील. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल.‌ मित्र परिवाराबरोबर सहलीचे आयोजन कराल. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल.

शुभ दिनांक – 8, 11

सिंह – राशीच्या भाग्यस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. तर धनेश बुधाचे व दशमेश शुक्राचे पंचमस्थानातून भ्रमण होत आहे. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने हा आठवडा आपल्यासाठी अतिशय शुभ फलदायी राहील. अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा व्यवसायात वापर करता येईल. नोकरीत बढतीचे योग आहेत. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी येईल. सरकार दरबारी रेंगाळलेली कामे मध्यस्थीतून मार्गी लागतील. लेखकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल. कवी, कलाकारांना चाहत्यांकडून दाद मिळेल. जनसंपर्कातून मोठे फायदे होतील. आठवड्याच्या उत्तरार्धात भविष्यकाळाच्या दृष्टीने योग्य ठिकाणी गुंतवणूक केली जाईल. आपल्यामुळे घरातील वातावरण उत्साही राहण्यास मदत होईल.

शुभ दिनांक – 9, 10

कन्या – राशीच्या अष्टमस्थानातील राहू, हर्षल वरून चंद्राचे भ्रमण होत असल्यामुळे कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. महत्त्वाच्या कागदपत्रांवर सह्या करण्यापूर्वी योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घ्या. स्वतंत्र व्यावसायिकांना चांगल्या संधी चालून येतील. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल, परंतु घराकडे दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता घ्यावी.‌ नवीन वाहन वास्तूचे योग आहेत. पूर्वनियोजित कामात बदल करावे लागतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून चांगले यश लाभेल. आपल्या गोड बोलण्याने आणि संभाषण चातुर्याने रेंगाळलेली कामे मार्गी लावता येतील. मित्र परिवाराचा सहवास लाभेल. कुटुंबासाठी अनपेक्षित खर्च करावा लागेल.

शुभ दिनांक – 7, 8

तूळ – आपल्या राशीच्या सप्तम स्थानातील राहू वरून चंद्राचे भ्रमण होत आहे. जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. भागीदारी व्यवसायात स्वतः लक्ष घालण्याची गरज आहे, म्हणजे नवनवीन उपक्रम राबवणे शक्य होईल. कामाचा व्याप वाढला तरी प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. पित्त, रक्तदाब, संधिवाताचा त्रास होऊ शकतो. आपले खिसा-पाकीट तसेच मौल्यवान वस्तू सांभाळा. आपला मूळ स्वभाव विचारपूर्वक बोलण्याचा असल्याकारणाने एखादी गोष्ट न पडल्यास तूर्तास त्यावर बोलणे टाळावे. म्हणजे वादंग टळतील. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. अनेकांचे सहकार्य लाभेल. आठवड्याच्या उत्तरार्धात बेरोजगारांना नोकरीच्या चांगल्या संधी चालून येतील.

शुभ दिनांक – 9, 10

वृश्चिक – आपल्या राशीच्या षष्ठस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. राशीतील दशमेश रवी आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी देणारा राहील. आपल्या मतांचा आदर केला जाईल. आपल्या राशीवर असलेली गुरुची दृष्टी अनेक चांगल्या संधी देणारी राहील. तेव्हा अथक परिश्रमातून मिळालेल्या संधीचे सोने करा. व्यवसाय उद्योगातून उत्कर्ष साधता येईल. समाजात आपल्याला नावलौकिक, मानसन्मान मिळेल. आपल्या राशीतील रविवर मंगळ गुरुची असणारी दृष्टी आपणास उत्कर्षाच्या मार्गाकडे नेणारी राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून यश लाभेल. मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. घरात जोडीदाराचे वर्चस्व राहील.

शुभ दिनांक – 5 ते 7

धनु – पंचमस्थानातून राहू हर्षल वरून चंद्राचे भ्रमण होत आहे. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अथक परिश्रम करून यश मिळवावे लागेल. राशीतून बुध शुक्राचे होणारे भ्रमण आपणास उत्कर्ष देणारे राहील. कुटुंबातील वातावरण आनंदी, उत्साही ठेवण्यात आपला मोलाचा वाटा राहील. घरात शुभ समारंभाचे आयोजन केले जाईल. आत्ता स्वकीयांच्या गाठीभेटी होतील कुटुंबातील सदस्यांबाबत सुवाताता कानी येतील. उंची वस्त्रालंकारांची खरेदी कराल. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. गायक, वादक तसेच कलाकारांना चाहत्यांकडून चांगली दाद मिळेल. धाडसी निर्णय घेतले जातील.

शुभ दिनांक – 9, 10

मकर – आपल्या राशीच्या सुखस्थानातील राहू हर्षल वरून चंद्राचे भ्रमण होत आहे. डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर पेरणी केली तरच घरातील वातावरण आनंदी ठेवता येईल. धर्मकर्माच्या अधिपतीचे म्हणजेच बुध शुक्राचे व्ययस्थानातून होणारे भ्रमण कामानिमित्त प्रवास घडवणारे राहील. व्यवसाय उद्योगातील नवीन प्रकल्पात परदेशस्थ व्यक्तींचे सहकार्य लाभेल. संघटन कौशल्य आणि कार्यकुशलता या आपल्या अंगभूत गुणांना चांगला वाव मिळेल. गृह सजावटीसाठी आकर्षक, मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाईल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. मामा मावशीच्या गाठीभेटीतून आनंद द्विगुणित होईल.

शुभ दिनांक – 7, 8, 11

कुंभ – आपल्या राशीच्या पराक्रम स्थानातील राहूवरून चंद्राचे भ्रमणण होत आहे. धाडसी निर्णय घेतले जातील. कामानिमित्त अनपेक्षितपणे प्रवास घडून येतील. भावंडांची सल्लामसलत केली जाईल. प्रियजनांचा सहवास लाभेल. घरातील सुखसुविधा वाढवण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. कुटुंबीयांवर आपली मते लादू नका. कल्पक स्वभाव, स्थिर बुद्धी यामुळे आपल्या कामातून यश मिळवणे सोपे जाईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून यशप्राप्ती होईल. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना यश लाभेल. आठवड्याच्या उत्तरार्धात संसर्गजन्य आजारांपासून त्रास होण्याची शक्यता राहते.

शुभ दिनांक – 7, 8

मीन – व्यवसाय उद्योगात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाली करताना योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा. अनपेक्षित खर्च उद्भवण्याची शक्यता राहते. भावंडांचे चांगले सहकार्य लाभेल. भावंडांच्या प्रगतीच्या वार्ता कानी येतील. आपल्या विरोधकांची मैत्रीचा हात पुढे केला तर कामातील अडथळे दूर होतील. वाहन चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे म्हणजे पुढील धोके टळतील. आपली मते इतरांवर लादू नका. सरकार दरबारी कामासाठी केलेले अर्ज विचारात घेतले जातील. कुटुंबात शुभ समारंभाचे आयोजन केले जाईल. संत सज्जनांचा सहवास लाभेल. आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या पुरस्काराचे मानकरी ठराल.

शुभ दिनांक – 10, 11.

  • श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे 

9011149780 / 8668293104

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.