चंगळ्या बोले कुहूच्या भरघोस यशानंतर मार्केटमध्ये आलाय. आता भैय्या गायकवाडची एखादी तरी रील तुम्ही सुद्धा सोशल मीडियावर पहिली असेल. काहींनी तर भैय्या गायकवाडच्या रीलवर रील बनवल्यात. आणि काहींनी त्याला भयंकर ट्रॉल केलंय. पण हा भैय्या गायकवाड आहे तरी कोण? जो एका फोनवर शिक्षक, MACB वाले आणि अग्निशमन दलाल कामाला लावतो. आणि त्याच्या किंगमेकर ग्रुपचा विषय काय आहे? जाणून घेऊ.
तर नाशिकच्या येवला तालुक्यातील धामोडा गावातील हा तरुण ज्याचं नाव आहे गोरख गायकवाड. त्याची पहिली रील 13 मे 2024 रोजी व्हायरल झाली, ज्यात तो माळेगावला आग लागल्यामुळे अग्निशामक दलाला फोन लावून तिथं पोहचण्यासाठी सांगतोय. एवढंच नाही लवकर गाडी पाठवा, मी येतोय तुमच्या गाडी मागणं असं सुद्धा तो बोलतो. हॅलो भैय्या गायकवाड बोलतोय द किंगमेकर ग्रुप अध्यक्ष येवला आणि नाहीतर मी येतो तिथं ही त्याची दोन वाक्य बरीच फेमस झाली आहेत. या त्याच्या रीलला ७० लाखांपेक्षा जास्त views आहेत. पण भैया इथेच थांबला नाही! तो शाळेच्या मास्तरांनाच विद्यार्थ्याला नापास केलं म्हणून खडसावतानाची रील सुद्धा व्हायरल आहे. अशाच बऱ्याच रील आहेत ज्यात तो लोकांची मदत करण्यासाठी कोणाला ना कोणाला कॉल करतो असतो. आता दिसायला गावाकडचा साधा मुलगा, पण कथितपणे तो फोनवर बऱ्याच जणांना झापतोय त्यामुळे हा काहीतरी नवीनच कोनेटेंट मार्केटमध्ये आला आणि हीट झाला कारण. गोरख गायकवाड म्हणजे भैय्या गायकवाडचे काही दिवसात ५०० वरुन ४५ हजारापेक्षा जास्त फॉलोवर वाढले.
पण भैय्या गायकवाड असलेल्या किंगमेकर ग्रुप काय आहे तर २०१५ मध्ये शुभम नाकोड या तरुणाने शिवशाही पैठणी उद्योगाची सुरुवात केली होती ज्याच्या दुकानाच्या शाखा आज महाराष्ट्रभर आहेत. याच तरुण उद्योजक शुभम नाकोडने २०२४ मध्ये “द किंग मेकर ग्रुप”ची स्थापना केली होती. त्यामागे त्याचा उद्देश हा होता की गुन्हेगारीकडे वळलेल्या तरुण पिढीला उद्योग क्षेत्राकडे वळवण्याची प्रेरणा देणं. त्याने १६ ते २५ वयातील मुलांसाठी ग्रुप तयार केला.
याच शुभम नाकोड यांच्या येवल्यातल्या दुकानात काम करणारा गणेश नागपुरे, जो भैया गायकवाडचा मित्र होता, त्याने भैयाला शुभम नाकोडसोबत भेट घालून दिली. त्यानंतर भैय्या गायकवाडने शुभम नाकोडकडे द किंग मेकर ग्रुप पद मागीतलं आणि त्याला धामोडा गावाचा अध्यक्षपद मिळालं. आणि त्याच्यानंतर भैय्या गायकवाडच्या रील ट्रेंडला आल्या.
पण प्रश्न असा आहे की हा भैय्या गायकवाड हा खरंच लोकांची मदत करतो की ते फक्त रील बनवण्यापुरत असतं. तर zee२४तास ला दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला की, मी खरं लोकांची मदत करतो आणि त्याने त्यांच्यासमोर mscb वाल्यांना फोन लावून सुद्धा दाखवला.
=============
हे देखील वाचा : Ashok Saraf : पद्मश्री मिळाल्यानंतर अशोक सराफ यांना पायलट भाची कडून मिळाले सरप्राइज
=============
त्यामुळे भैय्या गायकवाड खरंच मदत करतो की नाही हे तुम्हीच ठरवा. भैय्या गायकवाडबद्दल आणखी एक गोष्ट सांगायची झाली तर लहानपणीच त्याचे आई वडील वारले तो आता काकांकडे राहतो. त्याच्या काकांसुद्धा त्याच्या या गोष्टीबद्दल माहिती नव्हतं.
आता सोशल मीडिया म्हटलं की ट्रॉलिंग आणि टीका होणारच आणि तेच भैय्या गायकवाडच्याबाबतीत सुद्धा होतंय त्याला प्रचंड ट्रॉल केलं जातंय. पण हेच एका टाइमाला सुरज चव्हाणसोबत सुद्धा व्हायचं आणि तो त्यामुळे आणखी फेमस झाला आणि तेचं म्हणण आहे भैय्या गायकवाडचं ट्रॉलिंगमुळे मी आणखी वर चाललोय… म्हणजे थोडक्यात भैय्या गायकवाड रीलमध्ये वापरतो ते गाणं त्याच्या आयुष्याला परफेक्ट बसतंय, जलेने वालों की दुआ…