Home » ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील बबीताचे शिक्षण माहितेय का?

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील बबीताचे शिक्षण माहितेय का?

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील बबीता अय्यर सध्या चर्चेत आहेत. पण तुम्हाला बबीता म्हणजेच मुनमुन दत्ताचे शिक्षण किती झालेय हे माहितेय का?

by Team Gajawaja
0 comment
Television News
Share

Television News : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील बबीता उर्फ मुनमुन दत्ता आणि कलाकार राज अनादकट यांनी साखपुडा केल्याच्या बातम्या सर्वत्र व्हायरल झाल्या होत्या. खरंतर ती एक अफवा होती. मुनमुन दत्ताला आलिशान पद्धतीने आयुष्य जगण्यास आवडते. मुनमुनचे चाहत्यांची संख्या ऐवढी आहे की, प्रत्येजण तिच्याबद्दलच्या काही गोष्टी जाणून घेण्यास उत्सुक असतात.

वर्ष 2008 मध्ये मुनमुन दत्ताने तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत काम करण्यास सुरूवात केली होती. मुनमुन दत्ताने या मालिकेत बबीताची भुमिका साकारली आहे. पण तुम्हाला मुनमुन दत्ताचे शिक्षण किती आहे हे माहितेय का?

मुनमुन दत्ताचा जन्म 28 सप्टेंबर 1987 रोजी बंगालमध्ये झाला होता. मुनमुन बंगाली आउटफिटमध्ये फार सुंदर दिसते. मुनमुन दत्ताच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाल्यास तिने इंग्रजी लिटरेसीमधून मास्टर डिग्री मिळवली आहे. मुनमुन दत्ताचे आई-वडील दोघेही गायक होते. (Television News)

मुनमुन दत्ताने आपल्या करियरची सुरुवात आकाशवाणी आणि दूरदर्शसाठी चाइल्ड सिंगरच्या रुपात काम केले होते. मुनमुन दत्ताने पुण्यात राहून फॅशन शोमध्ये भाग घेतला होता. काही काळानंतर मुनमुन दत्ता मुंबईत आली आणि जी.टीव्हीच्या 2004 मधील मालिका ‘हम सब बाराती’मध्ये अभिनयाला सुरूवात केली होती. मुनमुनने कमल हस यांचा सिनेमा ‘मुंबई एक्सप्रेस’ मध्ये काम केले होते. यानंतर वर्ष 2006 मध्ये ‘हॉलिडे’ सिनेमात काम केले होते.


आणखी वाचा :
OTT प्लॅटफॉर्म, वेबसाइट आणि अॅपवरील अश्लील कंटेट अशा प्रकारे सरकारकडून तपासून पाहिला जातो
28 वर्षांपूर्वी वीर सावरकर यांच्या भुमिकेसाठी ‘या’ अभिनेत्याने घेतली नाही फी
Netflix वर इंटरनेटशिवाय ‘या’ ट्रिकने पाहता येतील सिनेमे, वेब सीरिज

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.