Home » खेळाडूसोबत त्यांची जर्सी का रिटायर केली जाते?

खेळाडूसोबत त्यांची जर्सी का रिटायर केली जाते?

by Team Gajawaja
0 comment
Jersey Retired
Share

एखाद्या खेळात एखाद्या खेळाडूचं कर्तुत्व एवढं मोठं असत की, त्यांनी त्या खेळात मैदानावर अन मैदानाबाहेर देखील ज्या गोष्टी केल्या, ज्या वस्तू वापरल्या त्या त्यांच्या नावापुढे कायमच्या चिकटून राहतात. खेळाडूंनी केलेले विक्रम, मैदानावर गाजवलेले पराक्रम जसे लक्षात राहतात तसेच खेळतांना खेळाडूंनी परिधान केलेली जर्सी, त्यांनी वापरलेल्या बॅट्स अशा अनेक विध गोष्टीदेखील चाहत्यांच्या लक्षात राहतात. बऱ्याच वेळा एखादा मोठा खेळाडू निवृत्त होतो तेव्हा जनभावना लक्षात घेत त्यांच्या वस्तू जस की जर्सी निवृत्त होत असते. त्या नंबरची जर्सी त्या त्या देशातील खेळाडूंना वापरण्यास मुभा नसते. इतिहासात प्रत्येक खेळात अनेक महान खेळाडू होऊन गेले आहेत. महान खेळाडू खेळाला अलविदा म्हणतांना बऱ्याचदा त्यांच्या जर्सीने देखील मैदान सोडलं आहे. (Jersey Retired)

क्रिकेट रसिकांसाठी दैवत असणाऱ्या सचिन तेंडूलकरची १० नंबरची जर्सी भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने निवृत्त केली आहे. एकदिवसीय आणि ट्वेंटी ट्वेंटीमध्ये सचिन ही जर्सी परिधान करून खेळायचा. भारतीय चाहत्यांनी तब्बल २४ वर्षे सचिनला या १० नंबरच्या जर्सीमध्ये खेळतांना बघितले आहे. १० नंबरच्या या जर्सीसोबत चाहत्यांचे एवढ्या वर्षात भावनिक बंध निर्माण झाले आहेत. मध्यंतरी शार्दुल ठाकूर १० नंबरची जर्सी परिधान करून जेव्हा मैदानावर उतरला होता तेव्हा त्याला रोषाला सामोरे जावे लागले होते. अखेर बीसीसीआयने ही जर्सी निवृत्त करण्यचा निर्णय घेतला. (Jersey Retired)

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फील ह्युजेस याला मैदानावर डोक्यात बॉल लागल्यामुळे आपल्या प्राणास मुकावे लागले. क्रिकेट ऑस्ट्रेलियावर या घटनेने शोककळा पसरली होती. ह्यूजचा सहकारी आणि मित्र असलेल्या मायकल क्लार्कने ह्यूजची जर्सी निवृत्त करण्याची विनंती क्रिकेट ऑस्ट्रेलियाला केली. ह्यूजच्या सन्मानार्थ त्याची ६४ नंबरची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला. (Jersey Retired)

अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना १० नंबरची जर्सी घालून खेळत असत. आपल्या खेळातून त्यांनी जगभरातील खेळाडूंना प्रोत्साहित केलं. १९९७ साली त्यांनी फूटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर पुढे चार वर्षांनी २००१ साली अर्जेंटिना फूटबॉल असोसियशनने त्यांच्या सन्मानार्थ त्यांची १० नंबरची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काही वर्षानंतर मॅराडोना यांनी लिओनेल मेस्सीला आपली जर्सी प्रदान करण्याचा निर्णय घेतला. मेस्सी आता १० नंबरची जर्सी घालून खेळतो. (Jersey Retired)

========

हे देखील वाचा : आयपीएलमध्ये ‘या’ खेळाडूंनी जिंकले अवार्ड्स!

=======

अमेरिकेचे महान बास्केटबॉल खेळाडू मायकल जॉर्डन १० क्रमाकांची जर्सी घालून खेळत असत. त्यांची अन त्यांच्या १० नंबरच्या जर्सीची जगभरात तुफान लोकप्रियता होती. १९९३ साली मायकल जॉर्डन यांनी खेळातून निवृत्ती जाहीर केली. परंतु दोन वर्षानंतर त्यांनी पुन्हा पुनरागमन केले. शिकागो बुल्सकडून त्यांनी खेळायला सुरुवात केली. ते २३ नंबरची जर्सी परिधान करून खेळायचे. ते निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या सन्मानार्थ त्यांची ही जर्सीदेखील निवृत्त करण्यात आली. अशाप्रकारे खेळाडूंचा मान म्हणून बऱ्याच वेळा त्यांची जर्सीदेखील त्यांच्यासोबत निवृत्त केली जाते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.