प्रत्येकजणला आपल्या जीवनात पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. मग ते करिअरच्या बाबतीत असो, आरोग्याच्या बाबतीत असो, धन लाभाच्या बाबतीत असो की अगदी प्रेमाच्या बाबतीत… त्यामुळे हा आठवडा बारा राशींसाठी कसा असेल, कोणत्या राशींवर कुठल्या ग्रहांचा प्रभाव असेल हे जाणून घेऊयात…(Weekly Horoscope 27 Mar to 02 Apr)
मेष – आपल्या राशीतील ग्रहाधिक्य व द्वितीय स्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण आपणास अनेक सुसंधी देणारे राहील. अनेक विद्यामार्गांनी अर्थार्जण करणे शक्य होईल. पण त्याचबरोबर मौल्यवान वस्तूंची खरेदी देखील होईल. दीर्घकाळासाठी गुंतवणूक केली जाईल. पराक्रमस्थानातून होणारे चंद्र – मंगळाचे भ्रमण धाडसी निर्णय घेण्यास प्रवृत्त करेल. भावंडांचे सुसंवाद साधाल. शुक्र हर्षल च्या योगातून कलाकारांना मिळालेल्या संधीचे सोने करता येईल. प्रवासातून कार्यसिद्धी होईल. उच्च शिक्षणासाठी अथवा नोकरी निमित्त तरुणांना परदेशगमनाच्या संधी लाभतील. कोर्ट कचेरीच्या प्रकरणातून आपल्या बाजूने निकाल लागण्याच्या दृष्टीने योग्य सल्लागार भेटतील.
शुभ दिनांक – 28 ते 30
वृषभ – वेळेस स्थानातील ग्रहाधिक्यामुळे आणि विशेषतः बुध शुक्राच्या योगामुळे मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाईल. गृह सजावटीसाठी शोभेच्या वस्तूंची खरेदी कराल. तसेच घरातील सुख सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिकच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. कामानिमित्त प्रवास घडतील. संगीत तसेच कलाक्षेत्रात चाहत्यांकडून चांगली दाद मिळेल. आपला आत्मविश्वास वाढेल. कुटुंबात आपल्या मतांचा आदर केला जाईल. मात्र कुटुंबियांवर आपली मते लागू नका. धनस्थानातील मंगळ परदेशातून आवक वाढवणारा राहील. इम्पोर्ट एक्स्पोर्टचे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांसाठी हा आठवडा अनुकूल फलदायी ठरेल. मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाली केल्या जातील.
शुभ दिनांक – 27, 28
मिथुन – लाभस्थानातील बुध, शुक्र, राहू, हर्षल यामुळे अनपेक्षित लाभ होतील मग ते नोकरी व्यवसायाच्या संदर्भातील, अथवा पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतील असतील किंवा लेखक, कलाकारांना त्यांच्या कौशल्याबद्दल पुरस्कार मिळण्याची शक्यता राहते. राशीतील मंगळामुळे आपला आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. रेंगाळलेली सरकारी कामे मित्र-परिवाराच्या सहकार्याने अथवा सल्ल्याने पूर्ण होतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी येईल. सामाजिक, राजकीय क्षेत्रातून नावलौकिक वाढेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून यश मिळेल. शैक्षणिक प्रगती चांगली होईल. नोकरीतून बढती बदलीचे योग येतील.
शुभ दिनांक – 31, 1
कर्क – आपल्या राशीच्या दशमस्थानातून बुध, शुक्र, राहू आणि हर्षल तर लाभस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. नोकरी व्यवसायात मिळालेल्या संधीचे सोने कराल. नवीन वाहन वास्तूचे योग येतील. एखाद्या कामासाठी लोनची सहज रीतीने सोय होईल. सरकारी कामातून फायदा होईल. लेखकांनी केलेल्या दर्जेदार लिखाणास पुरस्कार प्राप्त होतील. वाचनातून आनंद मिळेल. स्वतःसाठी वेळ काढाल. जीवनात आनंदाची बहार येईल. आठवड्याच्या उत्तरार्धात जुनी येणी वसूल होतील. कुटुंबीयांसोबत सहलीचे आयोजन कराल. सामाजिक कार्यातून नावलौकिक लाभेल.
शुभ दिनांक – 31 ते 2
सिंह – आपल्या राशीच्या भाग्येश स्थानातून बुध, शुक्राचे होणारे भ्रमण लेखक कलाकारांना अनुकूल फलदायी ठरेल. मनोरंजनाच्या कार्यक्रमातून आनंद घ्याल. वाचनाची आवड निर्माण होईल. कुटुंबीयांसमवेत सहलीत सहभागी व्हाल. धार्मिक स्थळांना भेटी दिल्या जातील, अध्यात्मिक प्रगती होईल. दशामातील चंद्रामुळे नोकरी व्यवसायात चांगल्या संधी चालून येतील. व्यवसायातील जुनी आणि वसूल होतील. परंतु अनपेक्षित खर्च उद्भवल्यामुळे आर्थिक चणचण भासण्याची शक्यता राहते. मित्र परिवाराचे सहकार्य लाभेल. उत्तरार्धात आपली इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील. या आठवड्यात घेतलेल्या काही निर्णयांचा भविष्यात आपणास फायदा होईल.
शुभ दिनांक – 27 ते 29
कन्या – आपल्या राशीच्या सप्तमस्थानात रवी, गुरु तर अष्टमस्थानात बुध, शुक्र, राहू, हर्षल आहेत आणि भाग्यस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. विवाहेच्छूक तरुणांना मनापासून जोडीदार मिळेल. आजवर रेंगाळलेली सरकारी कामे मार्गी लागतील. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. अति आत्मविश्वासाने एखादे चुकीचे पाऊल उचलू नका. कोणतेही काम करताना, अथवा महत्त्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावेत. तसेच महत्त्वाच्या कागदपत्रांवर सह्या करण्यापूर्वी योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा, नाहीतर फसवणूक होण्याची शक्यता राहते. सर्दी खोकला अथवा संसर्गजन्य विकारांचा त्रास होऊ शकतो. नोकरीत पदोन्नती होईल. आपल्या मेहनतीला वरिष्ठांकडून योग्य न्याय मिळेल.
शुभ दिनांक – 28 ते 30
तूळ – आपल्या राशीतून केतू तर सप्तम स्थानातून बुध, शुक्र, राहू, हर्षल आणि अष्टमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. आयुष्यातील चढ-उतार संपून आता अनेक चांगले आनंददायी प्रसंग घडणार आहेत. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. तसेच जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. अनपेक्षित धनप्राप्ती होईल. मनस्वास्थ लाभेल. प्रवास योग घडतील. प्रवासात अनोळखी व्यक्तीशी संवाद साधू नका. प्रवासातून कार्यसिद्धी होईल. जुनी येणी वसूल होतील. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. नवीन व्यावसायिक कार्यारंभ केले जातील. भागीदारी व्यवसायातून लाभ होतील. तरुणांना नोकरीच्या नवीन संधी चालून येतील. विवाहेच्छूक तरुणांना मनपासंत जोडीदार मिळेल. उत्तरार्धात स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातून फायदा होईल.
शुभ दिनांक – 31 ते 2
वृश्चिक – पंचमस्थानातील रवी, गुरुमुळे विद्यार्थ्यांना मनाजोग्या शैक्षणिक शाखेत प्रवेश घेता येईल. शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल. स्पर्धा परीक्षातून यश मिळेल. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना चांगल्या संधी चालून येतील. षष्ठस्थानातील बुध, शुक्रामुळे नोकरीत स्त्री वर्गाकडून सहकार्य लाभेल. चांगले वक्तृत्व व उत्तम ग्रहण शक्ती यामुळे फायदा होईल, समाजकार्यात सक्रिय सहभाग घ्याल. खोटे बोलून कोणतेही काम करू नका. उष्णतेचे विकार, नेत्र विकार तसेच अपचनाचा त्रास संभवतो. आठवड्याच्या उत्तरार्धात वाहन चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. कोणालाही आपले मत पटवून देताना वाद घालू नका. कामानिमित्त प्रवास घडून येतील. नोकरीत बढती बदलीचे योग संभवतात.
शुभ दिनांक – 27 आणि 1
धनु – राशीच्या पंचमस्थानातून बुध शुक्राचे तर षष्ठस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. आपले छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. मनोरंजनाच्या कार्यक्रमातून आनंद घ्याल. लेखकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल. तरुणांना नोकरीच्या संधी चालून येतील. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना योग्य विचार करूनच घ्यावे नाहीतर मनस्ताप होण्याची शक्यता राहते. जोडीदाराचे सहकार्य लाभेल तसेच जोडीदाराचे वर्चस्व राहील. कुटुंबीयांसमवेत वेळ घालवाल. उत्तरार्धात कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार करू नयेत. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. धार्मिक स्थळांना भेटी द्याल.
शुभ दिनांक – 28 ते 30
मकर – आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातून रवी, गुरुचे सुखस्थानात बुध, शुक्र, राहू आणि हर्षलचे तर पंचमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. स्वतंत्र वृत्तीने आणि मोठ्या आत्मविश्वासाने महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. मातृ सौख्य लाभेल आर्थिक स्थिती उत्तम राहील. घरातील सुख सुविधा वाढवण्यासाठी गृहोपयोगी तसेच चैनीच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. कुटुंबात शुभ समारंभाचे आयोजन केले जाईल. पाहुण्यांची वर्दळ राहील. आप्तस्वकियांच्या गाठीभेटीतून आनंद मिळेल. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. स्थावरमालमत्तेसंबंधीची कामे मार्गी लागतील.
शुभ दिनांक – 1
कुंभ – राशीतील शनीमुळे आपण शांत संयमी आहात. तसेच गुंतवणुकीचे नवे मार्ग या काळात आपणास उपलब्ध होतील. धनस्थानातील रवि गुरूमुळे अर्थार्जन चांगले होईल. पराक्रमस्थानातील बुध, शुक्रामुळे भावंडांचे सहकार्य लाभेल. सुखस्थानातील चंद्र सुख, समाधान व मनस्वास्थ्य देणारा राहील. मातृसंख्य लाभेल. खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात पुरस्कार प्राप्त होतील. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगले यश लाभेल. नोकरीत बढती बदलीचे योग संभवतात. भाजणे, कापणे, पित्त विकार तसेच संधिवाताचा त्रास संभवू शकतो. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. उत्तरार्धात महत्त्वाच्या कामात जोडीदाराचे सहकार्य लाभेल.
शुभ दिनांक – 31, 2
मीन – राशीतील रवि गुरूमुळे आपला आत्मविश्वास वाढून अनेक रेंगाळलेल्या कामांना गती मिळेल. वैयक्तिक उत्कर्षाच्या दृष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. धनस्थानातील बुध, शुक्र आपली आर्थिक बाजू भक्कम करतील. आपल्या संभाषण चातुर्याच्या जोरावर अनेक कामे मार्गी लावाल. कामानिमित्त प्रवास घडतील. भावंड सौख्य लाभेल. वाहन, वास्तूचे योग संभवतात. इलेक्ट्रॉनिकच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. कुटुंबातील वातावरण शांत राहील याकडे विशेष लक्ष द्यावे. कुटुंबीयांवर आपली मते लागू नका. आठवड्याच्या उत्तरार्धात विद्यार्थ्यांसाठी अनुकूल ग्रहमान राहील. स्पर्धा परीक्षातून चांगले यश संपादन केले जाईल.
शुभ दिनांक – 28 ते 30
- श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे
9011149780 / 8668293104
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.