दिवाळीच्या मंगलमय वातावरणाची सुरुवात झाली आहे. हे वातावरण तुमच्यासाठी कसे असेल आणि या आठवड्याची सुरुवात कशी असेल हे जाणून घेऊ. (Weekly Horoscope 24 Oct to 30 Oct)

मेष – दिवाळीच्या मंगलमय वातावरणात या आठवड्याची सुरुवात होत आहे. आपल्या राशीच्या कर्मस्थानाचा अधिपती शनि आता मार्गी झाल्यामुळे चांगल्या संधी चालून येणार आहेत. ज्या संधींची आतापर्यंत आपण वाट पाहत होतात त्या संधी समोर आल्याने आपल्या आनंदाला पारावर राहणार नाही. अस्तंगत बुध कन्या या आपल्या स्वराशीत असून दिनांक 26 रोजी तूळ राशीत प्रवेश करत आहे. रवी, बुध, शुक्राची युति म्हणजेच लक्ष्मीनारायण योग व बुधादित्ययोग आपल्या राशीच्या सप्तम स्थानात होत आहेत, आणि तिथूनच होणारे चंद्राचे भ्रमण यामुळे व्यवसाय उद्योगात प्रगती, अनपेक्षित धनप्राप्ती असे योग दिसून येतात. नवीन कार्यारंभ होतील. मात्र कोणत्याही मोहाला बळी पडू नका. आठवड्याच्या उत्तरार्धात कामानिमित्त प्रवास होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल अशी खरेदी केली जाईल. ही दिवाळी आपणांस आनंदाची व भरभराटीची जावो.
शुभ दिनांक – 27 ते 29.

वृषभ – आपल्या राशीच्या पंचमस्थानातून पंचमेश अस्तंगत बुधाचे दिनांक 26 ऑक्टोबर रोजी तुळ राशीतून भ्रमण सुरू होईल. रवी शुक्र बुध आणि चंद्र जसे आपल्या राशीच्या सुखस्थानातून होणारे भ्रमण आपल्या वैयक्तीक उत्कर्षाच्या पूरक राहील. बुधादित्य योग आणि लक्ष्मीनारायण योग आपल्या षष्ठ स्थानातून झाल्यामुळे नोकरी-व्यवसायात चांगल्या संधी चालून येतील. आपण केलेल्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होईल. बढती बदलीचे योग येतील. कामाचा व्याप वाढेल. मात्र प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाईल. असंगत बुध केतुयुक्त षष्ठस्थानात असल्यामुळे कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करू नका. व्यवसाय उद्योगाचा विस्तार करताना योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन लाभेल. अंधश्रद्धेला बळी पडू नका. प्रवासात आपले खिसापाकिट सांभाळावे. दिवाळीच्या काळात आप्तस्वकीयांच्या गाठीभेटीतून आनंद मिळेल.
शुभ दिनांक -27, 28.

मिथुन – आपल्या राशीतून मंगळाचे तर पंचमस्थानातून रवी, बुध, शुक्राचे भ्रमण होत आहे. म्हणजेच पंचमहास्थानातून बुधादित्ययोग व लक्ष्मीनारायण योग होत आहे. वैयक्तिक उत्कर्ष होण्याच्या दृष्टीने हे ग्रहमान आपणास अनुकूल राहील. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे योग येतील. तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून यश लाभेल. मनाजोग्या कोर्सला प्रवेश मिळेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. आपली इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील. राजकारण, समाजकारण क्षेत्रातील व्यक्तींच्या हातून लोकहितार्थ कामे केली जातील. सामाजिक पत प्रतिष्ठा उंचावेल. मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. आठवड्याच्या उत्तरार्धात नोकरी-व्यवसायात चांगल्या संधी लागतील. जोडीदाराचे उत्कर्षाची वार्ता कानी येईल. ही दिवाळी आपणा सर्वांना सुख समाधानाची व भरभराटीची जावो.
शुभ दिनांक – 26, 27.

कर्क – रवी, शुक्र, बुध व चंद्र यांचे सुखस्थानातून होणारे भ्रमण आपल्या घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही ठेवणारे राहील. सुखस्थानातून लक्ष्मीनारायण योग व बुधादित्य होत आहे. दिवाळीच्या सुमुहूर्तावर भूमी, भवन, वाहन यांचे योग दिसून येतात.बड्या व्यक्तींचे घराला पाय लागतील. संततीस शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे योग दिसून येत आहेत. लॉटरी अथवा स्थावर मालमत्तेतून अनपेक्षित धनप्राप्ती संभवते. सहलीचे आयोजन केले जाईल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. आपल्या मनस्वी स्वभावामुळे रेंगाळलेली कामे मार्गी लावण्यात यश येईल. शुभ समारंभात सहभागी व्हाल. घरासाठी अत्याधुनिक वस्तूंची खरेदी केली जाईल. आठवड्याच्या उत्तरार्धात संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. नवनवीन व्यावसायिक उपक्रमातून लाभ होतील.
शुभ दिनांक – 24, 25.

सिंह – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या धनस्थानातून धनेश बुधा वरून चंद्राचे भ्रमण होत आहे. घरात आपल्या मतांचा आदर केला जाईल. आपल्या संभाषण चतुर्याच्या जोरावर अनेक कामे मार्गी लावण्यात यश लाभेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ होतील. पराक्रम स्थानातून बुधादित्य योग व लक्ष्मीनारायण योग होत आहे. मोठे धाडसी निर्णय घेऊन आपले उत्पन्न वाढवण्यात यश लाभेल. परदेशी संस्थांशी चांगले संबंध प्रस्थापित करून व्यावसायिक मालाची आयात निर्यात मोठ्या प्रमाणावर होईल. भावंडांच्या मदतीने यश लाभेल. 23 ऑक्टोबर रोजी षष्ठस्थानातील षष्ठेश शनि मार्गी झाल्यामुळे नोकरी व्यवसायात नवीन संधी चालून येतील. गुंतवणुकीतून लाभ होतील जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात शुभ समारंभात सहभागी व्हाल. घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील. करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळवाल. दिनांक 29, 30 या दिवस आपणास अनुकूल फलदायी ठरतील.
शुभ दिनांक – 29, 30

कन्या – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीतून राशीस्वामी बुधावरून चंद्राचे भ्रमण होत आहे. तसेच आपल्या राशीच्या धनस्थानातून बुधादित्ययोग व लक्ष्मीनारायण योग होत आहे. आर्थिक भरभराट होण्याच्या दृष्टीने दिवाळीचा हा आठवडा आपल्यासाठी अतिशय उत्तम फलदायी आहे. आपल्या कामाचा योग्य मोबदला आपल्याला मिळणार आहे. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाली लाभणार आहे. घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. मात्र आपली मते इतरांवर लादू नका. घरातील वातावरण आनंदी कसे राहील याकडे लक्ष द्या. आठवड्याच्या उत्तरार्धात प्रवास घडून येतील. महत्त्वाची कागदपत्रे हाती लागतील. आजवर रेंगाळलेली कामे ओळखीतून मार्गी लागतील. कुटुंबासाठी मोठा खर्च केला जाईल. पंचम स्थानात मार्गी झालेला शनि संततीचा उत्कर्ष चा वाढता देणारा राहील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. लघुउद्योगातून नवीन कार्यारंभ केले जातील.
शुभ दिनांक – 29, 30.

तूळ – आपल्या राशीतून लक्ष्मीनारायण योग होत आहे. तसेच आठवड्याच्या मध्यात म्हणजेच 26 ऑक्टोबर रोजी बुध आपल्या राशीत प्रवेश करीत आहे, तेव्हा बुधाधित्ययोग झाल्यामुळे हा आठवडा आपल्या भाग्योदयास अनुकूल फलदायी राहील. वैयक्तिक उत्कर्षाच्या दृष्टीने अनेक घडामोडी घडतील. आपल्या हातून शुभकार्ये घडतील. अनपेक्षित धनप्राप्ती होईल. कलाकारांना चांगल्या संधी चालून येतील. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. कोणत्याही प्रलोभनांना मात्र बळी पडू नका. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. कुटुंबात आपल्या मतांचा आदर होईल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. गोड बोलून कामे करून घेण्यात यशस्वी व्हाल. महत्त्वाची रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. सरकारी कामातून लाभ होतील. कामानिमित्त प्रवास घडतील. नवीन ओळखी होतील.
शुभ दिनांक – 26 ते 28

वृश्चिक – आपल्या राशीच्या लाभातूनचंद्राचे होणारे भ्रमण आपली इच्छापूर्ती करणारे राहील. सरकार दरबारी मानसन्मान प्राप्त होईल. मित्र परिवाराचे सहकार्य लाभेल. कामानिमित्त परदेश प्रवास घडून येतील. करिअरच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक घटना घडतील. सहकारी तसेच वरिष्ठ आपल्या कामाचे कौतुक करतील. आपल्या कार्यक्षेत्रात चांगला नावलौकिक लाभेल. दिवाळीतील ग्रहमान आपले कर्तृत्व एकदम कमवून टाकेल. चांगल्या संधी चालून येतील. त्याचा फायदा घेणे श्रेयस्कर ठरेल. उत्तर आधार उंचीवरचा अलंकारांची खरेदी केली जाईल. आप्तस्वकियांच्या गाठीभेटीतून आनंद मिळेल. वैयक्तिक उत्कर्ष साधता येईल. सामाजिक कार्यात विशेष सहभाग घ्याल. नवीन योजनांची आखणी करून यशस्वीपणे पार पाडता येतील. आठवड्याच्या उत्तरार्धात चांगली धनप्राप्ती होईल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. कौटुंबिक सुवार्तांचा काळ आहे.
शुभ दिनांक 27 ते 29.

धनु – राशीच्या दशम स्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण नोकरी व्यवसायात नवीन कार्यारंभ करणारे राहील. लाभात होणारे बुधादित्य योग व लक्ष्मीनारायण योग वैयक्तिक उत्कर्षाचा पूरक ठरतील. आपले विचार थांब ठेवा. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रांवर योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनानंतरच सह्या कराव्यात. कोणत्याही नकारात्मक विचारांना मनात जागा देऊ नका. शेअर्स मध्ये गुंतवणूक टाळावी. आठवड्याच्या उत्तरार्धात कामानिमित्त प्रवास घडतील. अतिशय विचारपूर्वक आत्मविश्वासाने आपली मते मांडा. आपल्या जीवनात अविश्वसनीय घटना घडण्याचा हा कालावधी आहे.
शुभ दिनांक – 29, 30.

मकर – आपल्या राशीच्या भाग्यस्थानातून आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण होत आहे. तसेच दशमस्थानातून लक्ष्मीनारायण व बुधादित्ययोग होत असल्याकारणाने नोकरी-व्यवसायात भरभराटीचा काळ राहील. नवनवीन व्यावसायिक उपक्रम राबविले जातील. नोकरीत बढती बदलीचे योग संभवतात. तूळ राशीत आलेला रवी व स्वराशीचा शुक्र आपल्या सर्व समस्या, चिंता दूर करणारा राहील. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल. आपल्या परिवाराशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करता येतील. घरातील वातावरण आनंदी उत्साही राहील. दिनांक 23 ऑक्टोबर रोजी आपल्या राशीतून मार्गी झालेल्या शनीमुळे शांत, संयमी वृत्तीने महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. जबाबदाऱ्यांचे ओझे कमी होईल. कवी, कलाकार, लेखक यांना लोकप्रियता लाभेल. अध्यात्मिक प्रगती होईल. दिनांक 25, 26 आपणासाठी अनुकूल फलदायी राहील.
शुभ दिनांक -25, 26

कुंभ – आपल्या राशीच्या धनस्थानातून अष्टमेश बुधा वरून आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण होत आहे. या काळात आपले महत्त्वाचे दस्तऐवज सांभाळावेत. कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करण्यापूर्वी योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे. दिनांक 26 ऑक्टोबर रोजी अष्टमेश बुध भाग्यस्थानात प्रवेश करीत आहे. कवी, कलाकार, लेखक यांना चांगल्या संधी लाभतील. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. सरकार दरबारी रेंगाळलेली कामे ओळखीतून मार्गी लागतील. नवीन कल्पना आकार घेतील. नोकरी व्यवसायात मनाजोगे बदल घडून येतील. उत्तरार्धात कामानिमित्त परदेश प्रवास घडतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. संयम मेहनतीच्या जोरावर मोठी मजल मारता येईल. जनहितार्थ कामे केली जातील. समाजात मान, प्रतिष्ठा उंचावेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. दिवाळीत मनाजोग्या घटना घडल्यामुळे आपल्या आनंदाला पारावार राहणार नाही.
शुभ दिनांक – 26, 27

मीन – आपल्या राशीतून गुरु व सप्तम स्थानातून सप्तमेश बुधावरून चंद्राचे भ्रमण आठवड्याच्या सुरुवातीला होत आहे. जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. भागीदारी व्यवसायातून नवीन कार्यारंभ केले जातील. दिनांक 26 ऑक्टोबर रोजी बुध आपल्या राशीच्या अष्टमस्थानात प्रवेश करीत आहे. जोडीदाराकडून अथवा सासुरवाडीहून तसेच भागीदारी व्यवसायातून चांगली अर्थप्राप्ती होईल. आपल्या राशीच्या अष्टमस्थानात बुधादित्य योग आणि लक्ष्मीनारायण योग होत आहे. त्यामुळे अनपेक्षित धनप्राप्ती घडून येईल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. अध्यात्मिक प्रगती होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात कामाचा व्याप वाढेल. सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य लाभेल. मनासारख्या घटना घडल्यामुळे आनंदी, उत्साही वातावरण राहील. ही दिवाळी आपणास आरोग्यदायी तसेच भरभराटीची आहे.
शुभ दिनांक – 29, 30.
- श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे
9011149780 / 8668293104
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.