Home » “या” राशीतील लोकं करतील मौल्यवान वस्तूंची खरेदी

“या” राशीतील लोकं करतील मौल्यवान वस्तूंची खरेदी

by Team Gajawaja
0 comment
Weekly Horoscope 19 Sept to 25 Sept
Share

गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर पितृपंधरवडा सुरु झाला आहे. चालू आठवड्याच्या शेवटी पितृपक्ष संपून नवरात्र सुरु होईल आणि पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण निर्माण होईल. पण तत्पूर्वी या आठवड्यातलं राशिभविष्य याबद्दल जाणून घेऊया. (Weekly Horoscope 19 Sept to 25 Sept)

मेष – आपल्या राशीच्या तृतीयस्थानातून म्हणजेच पराक्रमस्थानातून आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण होत आहे. मोठ्या जबाबदारीने, धाडसाने काही निर्णय घ्यावे लागतील. गृहसुशोभीकरणासाठी वेळ देता येईल. घरासाठी आकर्षक खरेदी कराल. ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ उक्तीप्रमाणे जे ठरवाल ते पार पाडले जाईल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. उच्चशिक्षणासाठी परदेशी जाण्याचे प्रयत्न करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना यश लाभेल. सामाजिक कार्यात विशेष सहभाग घ्याल. लेखकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल. 

शुभ दिनांक – 21, 22.

वृषभ – धनस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण आर्थिक फायदा करून देणारे राहील. त्यामुळे आर्थिक स्थिती उत्तम राहील. मनाजोग्या घटना घडतील. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास घडतील. मात्र अचानक येणारे प्रस्ताव विचारपूर्वक स्वीकारावेत नाहीतर फसवणूक होण्याची शक्यता आहे. भावंड सौख्य लाभेल. भावंडांसंबंधी सुवार्ता कानी येईल. आपल्या कठोर बोलण्याने कोणाचे मन दुखावणार नाही याची काळजी घ्यावी. उत्तरार्धात कुटुंबात पाहुण्यांची वर्दळ राहील. घरातील वातावरण आनंदी राहील. 

शुभ दिनांक – 23 ते 25 

मिथुन – आपल्याच राशीतून आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण होत आहे. सामाजिक कार्यात विशेष सहभाग घ्याल. वडीलधाऱ्या व्यक्तींबाबतची कर्तव्य पार पाडाल. चंद्र गुरुचा होणारा नवपंचम योग आपला उत्कर्ष घडवण्यास पूरक राहील. धार्मिक शुभ समारंभात सहभागी व्हाल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश लाभेल. थोड्या परिश्रमातून उत्तुंग यशाचे मानकरी बनाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. विविध व्यावसायिक उपक्रम राबवले जातील. उत्तरार्धात प्रवासातून लाभ होतील. 

शुभ दिनांक – 19, 20.

कर्क – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या व्ययस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. कामानिमित्त परदेश प्रवास घडतील. कामाचा व्याप वाढेल. प्रकृतीच्या तक्रारींकडे मात्र दुर्लक्ष करू नका. आपला आत्मविश्वास वाढल्याने मोठे निर्णय सहजतेने घेतले जातील. नवीन व्यावसायिक प्रकल्प यशस्वीपणे राबवले जातील. भविष्यकाळाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाईल. बड्या लोकांच्या ओळखी होतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. उत्तरार्धात कुटुंबात शुभ घटना घडल्यामुळे मिष्टान्न भोजनाचा योग येईल.

शुभ दिनांक  – 21, 22.

सिंह – लाभस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण व्यवसाय उद्योगात भरभराट करणारे राहील. अनपेक्षित धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. जुनी येणी वसूल होतील. नवीन व्यावसायिक कल्पनांना चालना मिळेल. आपल्या व्यवसायास लागणारी आधुनिक यंत्रसामग्री खरेदी केली जाईल. अनेकांचे सहकार्य लाभेल. करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद घ्याल. रेंगाळलेली सरकारी कामे मार्गी लागतील. उत्तरार्धात कुटुंबात पाहुण्यांची वर्दळ राहील. (Weekly Horoscope 19 Sept to 25 Sept)

शुभ दिनांक  – 23, 24.

कन्या – कर्म स्थानातून होणाऱ्या चंद्राच्या भ्रमणामुळे नोकरीत बढती बदलीचे योग संभवतात. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारल्या जातील. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना मनाजोगे काम मिळेल. आपल्या संभाषण चातुर्याच्या जोरावर सकारात्मक घडामोडी घडतील. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. करमणुकीच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल. येणाऱ्या पुढील काळात हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल. 

शुभ दिनांक – 20, 21.

तूळ – आठवड्याच्या सुरुवातीला भाग्यस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी देणारे राहील. बुद्धीच्या जोरावर हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. नवीन व्यावसायिक उपक्रम राबवले जातील. सरकार दरबारी तसेच सामाजिक कार्यातून आर्थिक प्राप्ती होईल. अथक परिश्रमाने तसेच प्रतिष्ठित व्यक्तींच्या सहकार्याने यश लाभेल. दानधर्म केला जाईल. वडिलोपार्जित जमीन जमल्याची कामे मार्गी लागतील. सतत कार्यरत रहाल. 

शुभ दिनांक – 23,  24.

वृश्चिक – आपल्या राशीच्या अष्टमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. मानसिक अस्वस्थता जाणवेल. कठीण परिस्थितींना सामोरे जावे लागेल. पैसा मिळवण्यासाठी न्याय्य गोष्टी टाळू नका. उत्तरार्धात कामाचा व्याप वाढेल. व्यवसाय उद्योगात नवनवीन कल्पना आकार घेतील. शांत व आनंदी वृत्तीने मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकाराल. धार्मिक स्थळांना भेटी दिल्या जातील. कामानिमित्त प्रवास घडतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. धाडसी निर्णय घेतले जातील. (Weekly Horoscope 19 Sept to 25 Sept)

शुभ दिनांक 21, 22 

धनु – आपल्या राशीच्या सप्तमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. भागीदारी व्यवसायात स्वतः लक्ष घालण्याची गरज आहे अथवा फसवणूक होण्याची शक्यता राहते. कामाचा व्याप वाढल्यामुळे मानसिक गोंधळ उडण्याची शक्यता राहते. योग्य व्यक्तीचा निर्णय घेऊन कामे पार पाडावीत. कोणत्याही भुलथापांना बळी पडू नये. उत्तरार्धात धार्मिक शुभ समारंभात सहभागी व्हाल. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश लाभेल. जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. 

शुभ दिनांक – 19, 20.

मकर – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या षष्ठस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. व्यवसाय उद्योगात कामे करताना काही अडीअडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे अनपेक्षित खर्चात वाढ होईल हितशत्रूंच्या कारवायांना मोठ्या युक्तीने सामोरे जाल. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. उत्तरार्धात जोडीदाराचे सहकार्य लाभेल. आपल्या अंगभूत कला गुणांना चांगलावाव मिळेल. प्रवासात खिसा पाकीट सांभाळावे.नवीन जबाबदाऱ्या तूर्तास स्वीकारू नयेत. 

शुभ दिनांक – 21, 22.

कुंभ – पंचमस्थ चंद्राचे भ्रमण  संततीची भरभराट करणारे राहिल. बुद्धिमत्तेच्या जोरावर मोठी मजल माराल. अध्यात्मिक क्षेत्रात उन्नती होईल.हातून दानधर्म होईल. कामानिमित्त प्रवास घडतील. सरकार दरबारी रेंगाळलेली कामे ओळखीतून मार्गी लागतील. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. आपली इच्छापूर्ती घडणाऱ्या घटना घडतील. लेखकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल. अंगभूत कलागुणांना चांगला भाव मिळेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. बढती बदलीचे योग येतील. उत्तरार्धात सहलीत सहभागी व्हाल. (Weekly Horoscope 19 Sept to 25 Sept)

शुभ दिनांक – 23, 24

मीन – सुखस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण जमीन जुमल्याची कामे मार्गी लावणारी राहील. गृहउद्योग तसेच लघुउद्योगातून नवीन प्रकल्प राबवले जातील. आपल्या श्रमांना योग्य न्याय मिळेल. मातृसौख्य लाभेल. घरात पाहुण्यांची वर्दळ वाढल्याने वातावरण आनंदी राहील. गृहसुशोभीकरण्यासाठी वेळ द्याल. स्पर्धा परीक्षातून विद्यार्थ्यांना यश लाभेल. इच्छाशक्तीच्या जोरावर प्रगती होईल. संतती सौख्य लाभेल.  विवाहेच्छुक तरुणांचे विवाह जमतील. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका 

शुभ दिनांक- 22.

  • श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे 

9011149780 / 8668293104

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.