Home » ‘या’ दिवशी होणारा शनिपालट कोणत्या राशींना बनवणार धनवान

‘या’ दिवशी होणारा शनिपालट कोणत्या राशींना बनवणार धनवान

by Team Gajawaja
0 comment
Weekly Horoscope
Share

ज्योतिषशास्त्रानुसार 17 जानेवारी रोजी शनिपालट कर्मफलदाता कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. शनीच्या राशीपालटामुळे अनेक राशीच्या लोकांसाठी कठीण काळ सुरू होऊ शकतो. जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी. (Weekly Horoscope 16 Jan to 22 Jan)

मेष – आपल्या राशीच्या सप्तमस्थानातून आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण होत आहे. राशीस्वामी मंगळ धनस्थानात, रवी, शुक्र कर्मस्थानात असून कर्म स्थानाचा अधिपती शनि 17 जानेवारी रोजी आपल्या राशीच्या लाभस्थानात कुंभ राशीत प्रवेश करत आहे. ही ग्रहस्थिती आपणास अतिशय अनुकूल फलदायी राहील. जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. स्थावर मालमत्तेतून धनलाभ होईल. शनीची आपल्या राशीवर तसेच पंचम आणि अष्टमस्थानावर दृष्टी राहणार आहे. उच्च शिक्षणासाठी अथवा संशोधनपर अभ्यासक्रमा साठी परदेशी जाण्याचे प्रयत्न करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना यश लाभेल. अर्थार्जनाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरीत बढती बदलीचे योग संभवतात.

शुभ दिनांक- 20 ते 22

वृषभ – राशीतून मंगळ तर श्रेष्ठ स्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. दशमस्थानात दशमेश शनीचा 17 जानेवारी रोजी 30 वर्षांनी प्रवेश होत आहे. आपली ध्येयपूर्ती करण्यासाठी अथक परिश्रमांची आवश्यकता आहे. अतिशय विचारपूर्वक महत्त्वाचे निर्णय घेणे गरजेचे आहे. कोणत्याही कामात घाईगडबड करू नका. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. भागीदारी व्यवसायातून नवीन कार्यारंभ केले जातील. नवीन संधी चालून येतील. महत्त्वाच्या कागदपत्रांवर सह्या करण्यापूर्वी योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. आठवड्याच्या उत्तरार्धात करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळवाल. सहलीत सहभागी व्हाल. बड्या व्यक्तींच्या गाठीभेटी होतील.

शुभ दिनांक – 17, 18

मिथुन – लाभेश मंगळ व्ययस्थानात असल्यामुळे वर्षाच्या सुरुवातीपासूनच आर्थिकदृष्ट्या चांगले नियोजन करावे लागेल. उधारी उसनवारी टाळावी. संततीच्या शिक्षणासाठी मोठा खर्च उद्भवण्याची शक्यता आहे. या आठवड्यात आपला भाग्यस्थानाचा अधिपती शनी भाग्यस्थानात प्रवेश करत आहे. संशोधनपर अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना यश लाभेल. कामानिमित्त प्रवास घडून येतील. धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. जोडीदाराकडून लाभ होतील. भागीदारी व्यवसायात नवीन कार्यारंभ केले जातील. उष्णतेचे विकार, नेत्र विकार यांचा त्रास उद्भवण्याची शक्यता राहते.

शुभ दिनांक – 19 ते 21

कर्क – कर्मस्थानाचा अधिपती मंगळ लाभात असल्यामुळे नोकरीत बढती बदलीचे योग संभवतात. व्यवसाय उद्योगाच्या कामानिमित्त प्रवास घडून येतील. मित्र परिवाराचे सहकार्य लाभेल. कुटुंबात धार्मिक कार्याचे आयोजन होईल. षष्ठस्थानात बुध, सप्तम स्थानात रवी शुक्र तर अष्टमस्थानात शनि, आणि भाग्य स्थानात गुरु अशी अतिशय उत्कर्षवर्धक ग्रह स्थिती आपणास लाभली आहे. तेव्हा चालून आलेल्या चांगल्या संधी सोडू नका, भविष्यात त्यांचा फायदा होणार आहे. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळणार आहे. चांगला वित्तलाभ झाल्यामुळे गुंतवणूक करता येईल. मन प्रसन्न राहील. कुटुंबीयांवर आपली मते लागू नका नाहीतर वादंग होण्याची शक्यता राहते.

शुभ दिनांक – 17, 18

सिंह – आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातून केतूवरून चंद्राचे भ्रमण होत आहे. त्यामुळे काही मनाविरुद्ध घटना घडू शकतात. महत्त्वाचे निर्णय तूर्तास लांबणीवर टाकावेत. घरात पाहुण्यांची वर्दळ वाढेल. आप्तस्वतकियांच्या गाठीभेटीतून आनंद मिळेल. गृहउद्योग अथवा लघुउद्योगातून नवीन काम मिळेल. संततीसंबंधी सुवार्ता कानी येतील. महत्त्वाची कागदपत्रे हाती लागतील. करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळवाल. लेखक साहित्यिकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल. नोकरीत स्त्री अधिकाऱ्यांकडून चांगले सहकार्य लाभेल.

शुभ दिनांक – 22

कन्या – आपल्या राशीच्या धनस्थानातून केतूवरून चंद्राचे भ्रमण होत असल्यामुळे उधारी उसनवारी शक्यतो टाळावी. कुटुंबीयांवर आपली मते लागू नयेत. कामानिमित्त प्रवास घडतील. भावंडांचे सहकार्य लाभेल. सुखस्थानातील बुध व पंचमस्थानातील रवी, शुक्र आपणास अनुकूल फलदायी ठरतील. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी देणाऱ्या घटना घडतील. सामाजिक, राजकीय क्षेत्रात नावलौकिक वाढेल. अनेकांना सहकार्य कराल. मित्र परिवाराबरोबर वेळ मजेत घालवाल. करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळवाल. आपली इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील.

शुभ दिनांक – 17 ते 19

तूळ – शनि हा आपल्या राशीचा राजयोग कारकग्रह मकरआपल्या या स्वराशीतून कुंभ या स्वराशीत प्रवेश करत आहे. उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना परदेशी जाण्याचे योग येतील. संशोधन पर अभ्यासक्रमातून यश लाभेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. राशीतील केतूवरून चंद्राचे होणारे भ्रमण मानसिक अस्वस्थता निर्माण करणारे राहील. महत्त्वाचे निर्णय घेताना योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा. अनपेक्षित खर्च उद्भवण्याची शक्यता राहते. कामानिमित्त परदेश प्रवास संभवतो. भावंडांशी सुसंवाद साधाल. महत्त्वाची कागदपत्रे हाती लागतील. सुखस्थानातील रवी, शुक्र आठवड्याच्या उत्तरार्धात शुभ फलदायी ठरतील. घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. आप्तस्वकीयांच्या गाठीभेटीमुळे मन प्रसन्न राहील.

शुभ दिनांक – 21, 22

वृश्चिक – आपल्या राशीच्या वेळेस स्थानातून चंद्राचे होणारे भ्रमण सुरुवातीला काहीसे त्रासदायक ठरू शकते. परंतु समोर आलेल्या अडचणींवर योग्य मार्ग काढून मात करता येईल. धनस्थानातील लाभेश बुध व पराक्रम स्थानातील रवी, शुक्रामुळे आपला आत्मविश्वास वाढवून चांगल्या संधी चालून येतील. आर्थिक स्थिती सुधारेल. हाती घेतलेल्या कामात यश लाभेल. दैनंदिन जीवनातून विरंगुळा शोधाल. सहलीत सहभागी व्हाल. करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळवाल. उत्तरार्धात कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. आप्तस्वकीयांच्या गाठीभेटी होतील. मन प्रसन्न होणाऱ्या घटना घडतील.

शुभ दिनांक – 21, 22

धनु – राशीतून दशमेश बुधाचे तर लाभस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. नोकरी व्यवसायात चांगल्या संधी लाभतील. नवनवीन उपक्रम राबवले जातील. आपल्या वाक् चातुर्याच्या जोरावर मोठी मजल माराल. विरोधकांवर मात केली जाईल. आपल्या कर्तृत्वाला चांगली जळाली येईल. धनस्थानातील रवी, शुक्र कौटुंबिक दृष्ट्या तसेच आर्थिक दृष्ट्या अनुकूल फलदायी ठरतील. कुटुंबासाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाईल. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवून कोणतेही काम सोपवू नका.

शुभ दिनांक – 19 ते 21

मकर – राशी स्वामी शनि 17 जानेवारी रोजी आपल्या राशीतून धनस्थानात जात आहे. दशम स्थानातून केतूवरून चंद्राचे तर आपल्या राशीतून रवी, शुक्राचे भ्रमण होत आहे. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने मोठे आर्थिक व्यवहार करताना योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे. कामानिमित्त प्रवास घडतील. राशी स्वामी शनीची धनस्थानातून आपल्या सुखस्थानावर, अष्टमस्थानावर आणि लाभस्थानावर दृष्टी आहे. तेव्हा कौटुंबिक सौख्य लाभणार आहे तसेच अनपेक्षित धनलाभ होतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीची पूर्तता झाल्यामुळे हाती पैसा येईल. स्थावर इस्टेटीचे व्यवहार मार्गी लागतील. आपल्या मेहनतीला योग्य न्याय मिळेल. राशीत आलेल्या रवीमुळे आरोग्याच्या तक्रारी दूर होतील.

शुभ दिनांक – 17, 18

कुंभ – आपल्या राशीच्या भाग्यस्थानातून केतूवरून चंद्राचे भ्रमण होत आहे. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. अध्यात्मिक प्रगती होईल. तरुणांना नोकरीच्या संधी चालून येतील. अष्टमेश बुध लाभस्थानात असल्यामुळे शेअर्स मधून तसेच संततीकडून लाभ होतील. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. आपल्या कार्यक्षेत्रात चांगला नावलौकिक मिळेल. भागीदारी व्यवसायातून लाभ होतील. कोणत्याही कामात विरोधकांच्या कारवायांना सामोरे जावे लागेल. परंतु मोठ्या शिताफीने आपण त्यातून मार्ग काढाल व कार्य सफलता लाभेल. सहकाऱ्यांकडून काम करून घ्यावे लागेल.

शुभ दिनांक – 18 ते 20

मीन – राशीच्या अष्टमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत असल्यामुळे कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका. अनोळखी व्यक्तीच्या सहकार्याने कोणतेही निर्णय घेऊ नका. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग येतील. अध्यात्मिक प्रगती होईल. भागीदारी व्यवसायातून चांगले लाभ होतील. नवीन कार्यारंभ केले जातील. कर्मस्थानातील बुध व लाभस्थानातील रवी, शुक्रामुळे व्यवसाय उद्योगात चांगली वाढ होईल. आर्थिक प्राप्ती वाढेल. बड्या व्यक्तींच्या सहकार्यामुळे कामाचा व्याप वाढवण्यास मदत होईल. प्रकृतीच्या तक्रारी दूर होतील. मित्र परिवाराचे सहकार्य लाभेल. उत्तरार्धात अपेक्षापूर्ती होईल.

शुभ दिनांक – 22

  • श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे 

9011149780 / 8668293104

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.