Home » ‘या’ राशीच्या लोकांना सप्तमस्थानातील शुक्र, शनिमुळे जोडीदाराचे सहकार्य लाभेल…

‘या’ राशीच्या लोकांना सप्तमस्थानातील शुक्र, शनिमुळे जोडीदाराचे सहकार्य लाभेल…

by Team Gajawaja
0 comment
Weekly Horoscope
Share

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी आपल्या हालचालीनुसार राशी बदलत असतो आणि त्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर पडतो. नवीन वर्ष सुरू झाले असून वर्षाच्या पहिल्या महिन्यात 13 जानेवारीला मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल. ज्योतिष शास्त्रानुसार मंगळाच्या मार्गामुळे त्याचा प्रभाव सर्व राशींच्या जीवनात दिसून येईल. (Weekly Horoscope 09 Jan to 15 Jan)

मेष – नवीन वर्षाचा दुसरा आठवडा आपल्याला खूप सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह देणारा राहणार आहे. आप्तस्वकीयांच्या गाठीभेटीतून आनंद मिळेल. घरात शुभ समारंभाचे आयोजन होईल. नवीन वाहन वास्तूचे योग येतील. संततीची भरभराट होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून यश लाभेल. मनाजोग्या घटना घडल्यामुळे मन प्रसन्न राहील. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना चांगल्या संधी चालून येतील. विरोधकांवर मोठ्या शिताफीने मात कराल. आठवड्याच्या उत्तरार्धात जोडीदाराचे सहकार्य लाभेल.

शुभ दिनांक – 10 ते 12

वृषभ – आपल्या राशीतून मंगळ तर पराक्रमस्थानातून चंद्राचे होणारे भ्रमण आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी देणारी राहील. धाडसी निर्णय घेतले जातील. भावंडांचे सहकार्य लाभेल. घरातील सुखसुविधा वाढवण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. भूमी, वाहन यांचे योग आहेत. मालमत्ते संबंधीच्या व्यवहारातून लाभ होतील. संतती संबंधी महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. कवी, कलाकारांना चाहत्यांकडून चांगली दाद मिळेल. उष्णतेचे विकार नेत्र विकार यासंबंधी त्रास होऊ शकतो.

शुभ दिनांक – 13, 14

मिथुन – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या धनस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. जुनी व्यावसायिक येणी वसूल होतील. कुटुंबात आपल्या मतांचा आदर केला जाईल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. कामानिमित्त प्रवास घडतील. विद्यार्थ्यांना संशोधनपर अभ्यासक्रमातून यश लाभेल. कामानिमित्त प्रवास घडतील. नोकरी- व्यवसायात सतत कार्यरत राहाल. नवीन प्रकल्प हाती घेतले जातील. अष्टमातील शुक्र शनीमुळे अनपेक्षित धनप्राप्ती होईल. जोडीदाराकडून मौल्यवान भेटवस्तू मिळेल.

शुभ दिनांक – 12, 13

कर्क – नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपलेच राशीतून राशीस्वामी चंद्राचे भ्रमण होत आहे, तर दशमेश मंगळ लाभातून भ्रमण करत आहे . वैयक्तिक उत्कर्षाच्या दृष्टीने अतिशय अनुकूल असे ग्रहमान आपणास लाभले आहे. तसेच सप्तमस्थानातील शुक्र, शनिमुळे जोडीदाराचे सहकार्य लाभेल. विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. कौटुंबिक शुभ समारंभात सक्रिय सहभाग घ्याल. महिलांना दैनंदिन कामातून बदल मिळेल. उत्तरार्धात कामानिमित्त प्रवास घडतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. भावडांचे सहकार्य लाभेल. परदेशस्थ भावडांशी सुसंवाद साधाल. संतसज्जनांचा सहवास लाभेल. अध्यात्मिक प्रगती होईल.

शुभ दिनांक 14, 15

सिंह – नवीन वर्षाच्या सुरुवातीला राशीच्या व्ययस्थानातून चंद्राचे तर पंचमस्थानातून अनुक्रमे राशीस्वामी आणि धनेश,‌ रवी, बुधाचे भ्रमण होत आहे. भाग्येश मंगळ आपल्या कर्मस्थानात आहे. नोकरी व्यवसायातील कामानिमित्त दूरचे प्रवास घडतील. बढती बदलीचे योग संभवतात. व्यवसाय उद्योगात महत्त्वाची कागदपत्रे हाती लागतील. सामाजिक, राजकीय क्षेत्रात नावलौकिक मिळेल. जनहितार्थ कामे केली जातील. दानधर्म कराल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. लेखकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल. भावंडांवर आपली मते लागू नका नाहीतर मतभेद होऊ शकतात.

शुभ दिनांक – 10 ते 12

कन्या – आपल्या राशीच्या भाग्यशानातून मंगळाचे तर लाभस्थानातून चंद्राचे होणारे भ्रमण आपल्या वैयक्तिक उत्कर्षाच्या दृष्टीने अनुकूल फलदायी ठरेल. आपल्या राशीचा राजयोग कारकग्रह शनी पंचमस्थानात भाग्येश शुक्राच्या युतीत आहे. तेव्हा संतती संबंधी सतत सुवार्ता समजतील. संततीस उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे योग येतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून यश मिळेल. संशोधनपर अभ्यासक्रमातून यश लाभेल. कामानिमित्त प्रवास घडतील. कवी, कलाकारांना चांगला वाव मिळेल. सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्याल. आपली इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील. सामाजिक पतप्रतिष्ठाा उंचावेल. अनपेक्षित खरेदीचे योग संभवतात.

शुभ दिनांक – 13, 14

तूळ – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या दशमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. नोकरी व्यवसायात अनेक चांगल्या संधी चालून येतील. मित्रपरिवाराच्या सहकार्याने आपल्या कामांना गती मिळेल. मोठ्या खुबीने सहकाऱ्यांकडून कामे करून घ्याल. नोकरीत आपल्या कामाची वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा चांगला ठसा उमटवाल. सामाजिक कार्यात रूची वाढेल. सामाजिक पतप्रतिष्ठा उंचावेल. आपली इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील. आवक वाढल्यामुळे गुंतवणुकीवर भर दिला जाईल. उत्तरार्धात कामानिमित्त प्रवास घडतील. मनस्वास्थ्य लाभेल.

शुभ दिनांक – 11, 12

वृश्चिक – भाग्येश चंद्राचे भाग्यस्थानातून होणारे भ्रमण आपल्या वैयक्तिक उत्कर्षासाठी पूरक राहील. दशमेश रवी व लाभेश बुध यांचा आपल्या राशीच्या धनस्थानात बुधादित्ययोग होत असल्यामुळे नोकरी व्यवसायातून चांगली आवक होईल. जुनी व्यावसायिक येणी वसूल होतील. गोड बोलून आपली कामे करून घेण्यात यश लाभेल. नोकरीत अधिकार पदाची प्राप्ती होईल. सहकाऱ्यांची चांगली साथ मिळेल. शेअर्समध्ये गुंतवणूक कराल. मिष्टान्न भोजनाचे योग येतील. धाडसी निर्णय घेतले जातील. आपल्या मतांचा आदर केला जाईल.

शुभ दिनांक – 13, 14

धनु – आपल्या राशीतून राजयोग कारक ग्रह रवी व दशमेश बुध यांची युती होत आहे. त्यामुळे आजवर रेंगाळलेली आपली कामे मार्गी लागण्यास मदत होईल. परंतु अष्टमस्थानातून अष्टमेश चंद्राचे भ्रमण होत आहे तेव्हा कोणतेही निर्णय अति घाईने घेऊ नका. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. योग्य व्यक्तीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. वाहन चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. व्यवसाय उद्योगातून अनपेक्षित वित्तालाभ होण्याची शक्यता आहे. तरुणांना नोकरीच्या संधी चालून येतील. स्पर्धा परीक्षातून चांगले यश लाभेल. धाडसी निर्णय घेतले जातील. सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्यामुळे अनेक कामे सुकर होतील. कामाचा व्याप वाढेल. पथक परिश्रमाने आपले ध्येय साध्य कराल.

शुभ दिनांक – 10 ते 12

मकर – आपल्या राशीतून शनी, शुक्राचे तर सप्तमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. विवाहेच्छुक तरुणांचे परिचयोत्तर विवाह ठरतील. भागीदारी व्यवसायातून नवीन कार्यारंभ कराल. कामानिमित्त प्रवास घडतील. प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात. अनोळखी व्यक्तीशी सलगी करू नये. धार्मिक शुभ समारंभात सहभागी व्हाल. अध्यात्मिक प्रगती होईल. विवाहेच्छुक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. नोकरीत तूर्तास बदल करू नयेत. उंची वस्त्रालंकारांची खरेदी केली जाईल. जुनी येणी वसूल होतील.

शुभ दिनांक – 13 ते 15

कुंभ – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या षष्ठस्थानातून चंद्राचे प्रमाण होत आहे. आप्तस्वकियांच्या गाठीभेटीतून आनंद होईल. विरोधकांवर मोठ्य शिताफीने मात कराल. नोकरीत आपल्या कामाची वरिष्ठानकडून प्रशंसा होईल. बढती बदलीचे योग संभवतात. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून यश लाभेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. प्रलोभनांपासून दूर राहा. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. स्थावर मालमत्तेच्या कामातून फायदा होईल.

शुभ दिनांक – 11, 12

मीन – आपल्या राशीच्या पंचमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. राशीतील गुरुची चंद्रावर पाचवी दृष्टी असल्यामुळे संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून यश मिळेल. धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. तीर्थस्थळांना भेटी देण्याचे योग येतील. नोकरी व्यवसायात आपल्या कामांना प्राधान्य द्या. विवाहेच्छुक तरुणांचे विवाह ठरतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराला. उत्तरार्धात प्रवासात आपले खिसा पाकीट सांभाळावे‌.

शुभ दिनांक – 10, 11

  • श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे 

9011149780 / 8668293104

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.