Home » माझा तिच्यासोबत मृत्यू झालायं.. मुलीच्या मृत्यूनंतर ‘या’ अभिनेत्याचे वक्तव चर्चेत

माझा तिच्यासोबत मृत्यू झालायं.. मुलीच्या मृत्यूनंतर ‘या’ अभिनेत्याचे वक्तव चर्चेत

साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये दु:खाचे सावट कोसळले जेव्हा अभिनेत्याच्या १६ वर्षीय मुलीने आत्महत्या केली. तिच्या मृत्यूनंतर त्याच्यासह पत्नीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

by Team Gajawaja
0 comment
South fame actor
Share

साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये दु:खाचे सावट कोसळले जेव्हा अभिनेता विजय एंटनी याच्या १६ वर्षीय मुलीने आत्महत्या केली. मीरा हिच्या मृत्यूनंतर विजय आणि त्याच्या पत्नीवर दु:खाचा डोंगर कोसळला गेला आहे. अशातच आता अभिनेत्याचे एक ट्विट खुप चर्चेत आले आहे. त्यात त्याने आपल्या मुलीबद्दल जे काही वक्तव्य केले आहे ते पाहून सर्वांना धक्काच बसत आहे. (South fame actor)

तमिळ अभिनेता आणि संगीतकार विजय एंटनी याने आपल्या १६ वर्षीय मुलीच्या निधनानंतर पहिल्यांदाच आपले विधान दिले. त्याची मुलगी चेन्नईतील राहत्या घरी मृतावस्थेत मिळाली. मीराने कथित रुपात आत्महत्या केली आहे. आपल्या मुलीच्या अंत्यसंस्कारानंतर विजयने एक भावूक पोस्ट शेअर करत ट्विट केले.

द इंडियन एक्सप्रेसच्या एका रिपोर्ट्सनुसारर तमिळ भाषेत विजयने असे म्हटले की, तुम्हा सर्व दयाळू लोकांना नमस्कार, माझी मुलगी मीरा अत्यंत प्रेमळ आणि हुशार आहे. आता ती जाति, धर्म, पैसा, इर्ष्या, दु:ख, गरीबी पासून मुक्त एका उत्तम आणि शांतिपूर्ण ठिकाणी गेली आहे. ती आता सुद्धा माझ्याशी बोलत आहे. माझा सुद्धा तिच्यासोबत मृत्यू झाला आहे. मी आता तिच्यासोबत वेळ घालवण्यास सुरुवात केली आहे. आतापासून जे काही काम करेन त्याची सुरुवात तिच्याकडून करेन.

विजय एंटनी याची मुलगी कथित रुपात १९ सप्टेंबरला मध्यरात्री ३ वाजता आपल्या घरात मृतावस्थेत मिळाली. त्यावेळी अभिनेत्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मीरा चेन्नईतील एका खासगी शाळेत शिक्षण घेत होती. ती शाळेतील टॉप स्टुडेंसपैकी एक होती.ती कल्चरल हेड सुद्धा होती. मीराच्या अचानक अशा मृत्यूमुळे सर्वांना धक्का बसला आहे. (South fame actor)

अभिनेता जयम रवि यांनी ट्विट केले होते की, विजयंतनी भाई, तुमच्या मुलीच्या या दु:ख घटनेबद्दल ऐकून फार वाईट वाटत आहे. त्यामुळे सध्याच्या मुलांनी समजून घेतले पाहिजे की, आम्ही तुमच्यावर खुप प्रेम करतो. तुम्ही ऐकटे नाहीत. आयुष्यात चढउतार येत राहतात. त्यामुळे पालकांसोबत समस्या शेअर करा.

मीरा, विजय आणि पत्नीसह त्यांची मोठी मुलगी असा त्यांचा एकूणच परिवार. १६ वर्षीय मीराच्या निधनानंतर आई खुप रडली.तिने असे म्हटले की, मी तुला माझ्या गर्भात वाढवले.. तु मला एक शब्द सुद्धा सांगू शकत नव्हतीस का?


हेही वाचा- जेव्हा हॉलिवूड सिंगर शकीराचा झाला होता घटस्फोट…


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.