Home » तुम्ही घट्ट साडी नेसता? होऊ शकतो गंभीर आजार

तुम्ही घट्ट साडी नेसता? होऊ शकतो गंभीर आजार

तुम्ही घट्ट साडी नेसता का? तर ही माहिती तुमच्या महत्त्वाची आहे. कारण घट्ट साडी नेसल्याने गंभीर आजार होऊ शकतो. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर....

by Team Gajawaja
0 comment
Saree Cancer
Share

Saree Cancer : भारतात महिलांनी साडी नेसण्याची परंपरा फार जुनी आहे. कोणताही सण-सोहळा, पार्टी-फंक्शनवेळी महिला साडी नेसणे पसंत करतात. साडीचा ट्रेण्ड भारतापर्यंतच मर्यादित नाही, आज जगभरातील महिला वेगवेगळ्या पद्धतीने साडी नेसतात.

साडी केवळ ट्रेडिशनल पद्धतीने नव्हे वेगवेगळ्या स्टाइलमध्येही नेसली जाते. पण तुम्हाला माहितेय का, घट्ट साडी नेसल्याने कॅन्सर होण्याचा धोका वाढला जातो. भारतातील महिला ज्या प्रकारे साडी नेसतात त्यामुळे त्यांना कॅन्सरसारखा गंभीर आजार होऊ शकतो. याशिवाय कपड्यांच्या कारणास्तवही कॅन्सर होण्याचा धोका वाढला जातो.

साडी कॅन्सर नक्की काय आहे?
साडी नेसल्याने Squamous Cell carcinoma (SCC)चा धोका वाढला जातो. अशाप्रकारे कॅन्सर भारतीय महिलांमध्ये वेगाने फैलावत आहे. काही गेल्या वर्षांमध्ये साडी कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ओन्ली माय हेल्थच्या मते, एससीपीपीएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पि
लचे कॅन्सर स्पेशालिट यांनी म्हटले की, भारतातील गावात राहणाऱ्या महिला संपूर्ण वर्षभर साडी नेसतात. साडी सातत्याने नेसल्याने कंबरेवर एक रेष तयार होते.

ही रेष कंबरवेर पेटीकोट बांधून तयार झालेली असते. यामुळे पुढे जाऊन स्किन कॅन्सरचा धोका वाढला जोत. ज्या महिला उन्हाळ्यातही अधिक घट्ट साडी नेसतात त्यांच्यामध्येही कॅन्सरचा धोका वाढला जातो. बिहार आणि झारखंडमधील महिलांमध्ये साडी कॅन्सरचा धोका वेगाने वाढत आहे. ऐवढेच नव्हे घट्ट जीन्स सातत्याने परिधान केल्यानेही कॅन्सरचा धोका वाढला जाऊ शकतो. (Saree Cancer)

असे राहा दूर
कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासून दूर राहण्यासाठी तुम्ही लाइफस्टाइलमध्ये काही बदल केले पाहिजेत. हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. अॅक्टिव्ह लाइफस्टाइल असावी. एकाच ठिकाणी सातत्याने बसून राहू नये. तुम्ही जेवढे अॅक्टिव्ह रहाल तेवढेच आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.


आणखी वाचा :
तुम्हाला कंबरेखाली सातत्याने दुखते? असू शकतात ही कारणे
पनीर किंवा टोफू? आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर
पोटाला सूज येण्यामागे तुमच्या ‘या’ सवयी तर कारणीभूत नाहीत ना?

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.