Home » RRR मधील Natu Natu गाण्याला मिळाला ऑस्कर

RRR मधील Natu Natu गाण्याला मिळाला ऑस्कर

by Team Gajawaja
0 comment
Oscar 2023
Share

चित्रपट निर्माते एस ए राजामौली यांचा सिनेमा ‘आरआरआर’ने अखेर परदेशात भारताचे नाव उंचावले आहे. या सिनेमातील गाणं ‘नाटू नाटू’ याला बेस्ट ओरिजनल सॉन्गसाठी नॉमिनेट करण्यात आले होते. यंदाच्या ऑस्कर पुरस्कारावर या गाण्याने आपले नाव कोरले आहे. राजामौली यांच्या सिनेमातील नाटू नाटू गाण्याला हा मानाचा पुरस्कार मिळाल्यानंतर भारतीय प्रेक्षक आणि त्यांचा चाहता वर्ग फार खुश झाला आहे. या गाण्याचे तेलगू वर्जन हे कोला भैरवा आणि राहुल सिप्लीगुंज यांनी मिळून लिहिले आहे. तर एमएम किरवानी यांनी ते कंपोज केले आहे. (Oscar 2023)

नाटू-नाटूला पुरस्कार मिळाल्याच्या आनंद संपूर्ण देशभरात साजरा केला जात आहे. यापू्र्वी ८० व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स २०२३ मध्ये बेस्ट ऑरिजनल सॉन्गचा ही पुरस्कार पटकावल्यानंतर या गाण्याने ९५ व्या ऑस्कर पुरस्काराला ही आपल्या नावावर केले आहे.

खास गोष्ट अशी की, Best Original Song कॅटेगरीत या गाण्याला टक्कर देण्यासाठी लेडी गागाचा अप्लॉज, टॉप गन: मॅवरिकचे गाणं होल्ड माय हँन्ड आणि बेंजामिन राइस याचे लिफ्ट मी अप आणि Amy Macdonald चे गाणं दिस इज लाइफ ही होते. मात्र या सर्व दिग्गजांना मागे टाकत नाटू-नाटू गाण्याने हा पुरस्कार जिंकला आहे. सिनेमाने भारतात सर्व प्रेक्षकांच्या मनावर आपले नाव कोरले होते. सिनेमाला आता पर्यंत अनेक पुरस्कार ही मिळाले आहेत. याच दरम्यानस सिनेमातीला आता नाटू-नाटू गाण्याला हा ऑस्कर पुरस्कार मिळाल्याने सर्वजण आनंदित झाले आहेत.

खुप व्हायरल झाले होतं गाणं
नाटू-नाट गाणे एमएम किरवानी यांनी कंपोज केले आहे. याला काला भैरव आणि राहुल सिप्लिगुंज यांनी गायले असून ते गाणं प्रेम रक्षित यांनी कोरियोग्राफ केले आहे. तस गाण्याचे लिरिक्स हे बोल चंद्रबोस यांनी लिहिले आहे. हे जेव्हा गाणं लॉन्च झाले तेव्हा सर्वांच्या पसंदीस पडलेच. पण त्यावरुन अनेकांनी रिल्स ही बनवल्या आणि सोशल मीडियात पोस्ट केल्या.(Oscar 2023)

हे देखील वाचा- पाकिस्तानमध्ये होतोय पाकीझाचा रिमेक

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या घराबाहेर झाली होती गाण्याची शुटिंग
तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की, आरआरआर मधील या गाण्याची शुटिंग युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर जेलेंस्की यांच्या अधिकृत घराबाहेर झाली होती. युक्रेन आणि रशियाच्या युद्धापूर्वीच हे गाणे जेलेंस्की यांचे अधिकृत निवास Mariinskyi Palace च्या बाहेर शूट करण्यात आले होते.

यशामागे किरवानी यांचा मोठा वाटा
एम एम किरवानी यांनी ऑस्कर सारखे प्रतिष्ठीत पुरस्कार याआधी ही आपल्या नावावर केले आहेत. किरवानी यांना बाहुबली-२ साठी सॅटर्न पुरस्कार मिळाला होता. तर सर्वश्रेष्ठ सॉन्ग मध्ये गोल्डन ग्लोब्स आणि क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड्सह काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार ही पटकावले होते.

एमएम किरवानी यांनी तेलगू सिनेमातून एका सहाय्यक संगीत निर्देशकाच्या रुपात आपल्या संगीताच्या करियरची सुरुवात केली होती. त्यांनी दिग्गज गीतकार वेटुरीच्या मार्गदर्शन आणि निर्देशनात काम केले. मौली यांचा १९९० मधील सिनेमा ‘मनासु ममता’ त्यांचा पहिला मोठा ब्रेक होता जो त्यांच्यासाठी तेलगू सिनेजगतात उत्तम कामगिरी करण्याचा मार्ग त्यांना मिळाला होता.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.