Home » सिंघम गर्ल काजलने बाळाचे ठेवले ‘हे’ नाव? मावशीने केले जाहीर

सिंघम गर्ल काजलने बाळाचे ठेवले ‘हे’ नाव? मावशीने केले जाहीर

by Team Gajawaja
0 comment
Kajal Aggarwal son name reveal
Share

सध्या मनोरंजनविश्वात अतिशय आनंदाचे वातावरण दिसत आहे. काही कलाकार लग्नाच्या बंधनात अडकत आहे, तर काही कलाकारांच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. काही दिवसांपूर्वीच कॉमेडी क्वीन भारतीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. आता बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री असलेल्या काजल अग्रवालने नुकताच एका मुलाला जन्म दिला.

रोहित शेट्टीच्या ‘सिंघम’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या काजलने १९ एप्रिल रोजी एका मुलाला जन्म दिला. या बाळाच्या आगमनामुळे काजल आणि तिचा पती गौतम किचलू सध्या खूपच आनंदात आहे. काजलचे फॅन्स सध्या बाळाची एक झलक पाहण्यासाठी अतिशय आतुर झालेले दिसत असले तरी अजूनतरी त्यांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. तत्पूर्वी काजलच्या फॅन्ससाठी तिच्या बहिणीने निशा अग्रवालने बाळाच्या नावाची घोषणा केली आहे.

निशाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत काजल आणि गौतम यांच्या बाळाचे नाव जाहीर केले आहे. नुकत्याच आई झालेल्या काजलने आणि तिच्या पतीने त्यांच्या बाळाचे नाव ‘नील’ ठेवल्याचे निशाने सांगितले आहे. निशाने हे नाव जाहीर करताना एक गोड नोट देखील शेअर केली आहे. या नोटमध्ये तिने लिहिले, “१९ एप्रिलची संध्याकाळ आमच्यासाठी खूपच परफेक्ट होती. आम्ही आमच्या अतिशय अमूल्य अशा बाळाचे स्वागत केले आहे. या बाळाच्या आगमनामुळे आमचे सुंदर असलेले जग अधिकच सुंदर आणि अनमोल झाले आहे.”

पुढे निशाने लिहिले, “अतिशय निरागस, आकर्षक हास्य, चमकणारे डोळे असलेल्या या बाळाने आमच्या दिवसाला अधिकच प्रकाशमान केले आहे. आमच्या जगात नील किचलू तुला मिळवून आम्ही अधिकच आनंदी आणि समाधानी झालो आहोत.” काजलने तिच्या प्रेग्नन्सीच्या काळात सोशल मीडियावर चांगलीच सक्रियता वाढवली होती. ती सतत तिच्या प्रेग्नन्सीच्या संबंधातील विविध अपडेट तिच्या फॅन्ससोबत शेअर करायची. या काळात तिला वाढलेल्या वजनावरून देखील मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले गेले होते, मात्र तिने ट्रोलर्सला देखील सडेतोड उत्तर देत शांत केले. 

=======

हे देखील वाचा – बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर गंगूबाई ‘या’ दिवशी येणार ओटीटीवर

=======

दरम्यान काजल टॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने तिथे सर्वच टॉपच्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. काजलने २००४ साली ‘क्यो हो गया ना’ मधून अभिनीत पाऊल टाकले. त्यानंतर २००७ साली तिने ‘लक्ष्मी कल्याणम’ सिनेमातून तेलगू सिनेमासृष्टीत प्रवेश केला. काजल आणि रामचरण यांच्या ‘मगधीरा’ सिनेमाने तुफान लोकप्रियता मिळवली. २०२० साली काजलने उद्योगपती गौतम किचलूसोबत मोजक्या लोकांच्या उपस्थित लग्न केले होते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.