Home » टिकटॉकपासून बिगबॉसच्या घरापर्यंतचा प्रवास – अभिनेत्री सोनाली पाटील (sonali Patil)

टिकटॉकपासून बिगबॉसच्या घरापर्यंतचा प्रवास – अभिनेत्री सोनाली पाटील (sonali Patil)

by Team Gajawaja
0 comment
सोनाली पाटील Sonali Patil
Share

सोशल मीडिया हे माध्यम प्रत्येकाच्या कलागुणांना वाव देत आहे. वेगवेगळे व्हिडिओज बनवणे हा अनेकांचा छंद आहे, पण हा छंद जोपासता जोपासता आवडत्या क्षेत्रात करिअर करायला मिळण्याची संधी मिळाली तर हा विचार किती भन्नाट आहे ना! सध्या बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनमुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्री सोनाली पाटील (sonali Patil) हिच्या बाबतीत हा फंडा कामी आला आहे. 

सहज म्हणून इन्स्टाग्रामवर टिकटॉक व्हिडिओ बनवणारी सोनाली आज टीव्ही स्टार बनली आहे. गंमत म्हणजे नायिका म्हणून सोनालीला ‘वैजू नंबर वन’ ही मालिकाही तिच्या टिकटॉक व्हिडिओमुळेच ऑफर करण्यात आली होती. सहज म्हणून केलेल्या त्या टिकटॉक व्हिडिओमुळे आपल्याला एका मालिकेची नायिका म्हणून ऑफर येईल हा विचार सोनालीनेही केला नव्हता. 

‘जुळता जुळता जुळतंय की’ मालिकेतील सेकंड लीड भूमिका करत असतानाच सोनाली पाटील (sonali Patil) इन्स्टावर झळकत होती, त्यातूनच ‘वैजू नंबर वन’ मालिकेच्या लीड रोलसाठी सोनालीची निवड झाली. देवमाणूसमधील डॅशिंग वकीलही तिने वठवली आणि बिगबॉस ३ मध्ये सोनाली भाव खाऊन गेली.

Vaiju No.1 fame Sonali Patil to feature in Devmanus soon - Times of India

आता जरी टिकटॉक हे ॲप बंद झाले असले तरी जेव्हा टिक टॉक ॲप सुरू होतं तेव्हा सोनालीने खूप सारे टिकटॉक व्हिडिओ बनवले होते. इतकंच नाही, तर सोशल मीडियावर सोनालीला ‘टिक टॉक गर्ल’ म्हणून ओळखले जात होते. हीच ‘टिक टॉक गर्ल’ आता सेलिब्रिटी वर्तुळात झळकत आहे. 

कोणतीही समस्या हुशारीने आणि चुटकीसरशी सोडवणारी एखादी स्त्री आपल्या आसपास असते. अशा स्त्रीची व्यक्तिरेखा म्हणजेच ‘वैजू नंबर वन’. ही भूमिका सोनालीसाठी करिअरमधील टर्निग पॉइंट ठरली. . या भूमिकेसाठी आवश्यक असणारा उत्साहीपणा सोनालीने तिच्या अभिनयातून उत्तम साकारला.

सोनाली पाटील (sonali Patil) सांगते, “एखादी मालिका हिट का होते? जेव्हा त्या मालिकेची कथा, मालिकेतील व्यक्तिरेखा या प्रेक्षकांना जवळच्या वाटतात. ‘वैजू नंबर वन’ ही मालिका प्रत्येकाला वास्तववादी वाटते. कारण अशा स्त्रिया आणि अशा व्यक्तिरेखा आपल्या आजूबाजूला सतत दिसतात. या कथेमध्ये दाखवण्यात आलेल्या गोष्टी किंवा समस्या सोडवण्यासाठी इतरांना नेहमी उपयोगी पडणाऱ्या स्त्रिया मी माझ्या आयुष्यामध्येही पाहिल्या आहेत.

Vaiju No 1 - Disney+ Hotstar

अभिनयात करिअर करायचं असं मी काहीच ठरवलं नव्हतं. कोल्हापुरात राजाराम कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं. त्यानंतर मी बी.एड. केलं. मला शिक्षिका व्हायचं होतं. हे क्षेत्र मला खूप आवडायचं. लहानपणी खेळताना सुद्धा मी शिक्षिका आणि विद्यार्थी असे खेळ खेळायचे आणि त्यामध्ये मी शिक्षिका व्हायचे. मला, ‘शिक्षिका वर्गात आल्यावर  विद्यार्थी गुड मॉर्निंग म्हणतात आणि मग ती सगळ्यांना शिकवायला सुरु करते’, हे खूप आवडायचं. 

मी ज्या कॉलेजमध्ये शिकले त्या राजाराम कॉलेजमध्ये मला ज्युनियर कॉलेजची शिक्षिका म्हणून नोकरी मिळाली, हा अनुभव माझ्यासाठी खूपच वेगळा होता. ज्या ठिकाणी आपण शिकलो, ज्या वर्गात मी स्वतः बसत होते, ज्या बेंचवर मी स्वतः बसत होते, त्या वर्गात मी शिक्षिका म्हणून शिकवायला आले तेव्हा खूप आनंद झाला .एखाद्या कॉलेजमध्ये विद्यार्थी म्हणून आपण धमाल करणं ,मजा करणं आणि त्याच कॉलेजमध्ये शिक्षिका म्हणून काम करत असताना जबाबदारीने वागणं, या दोन्ही गोष्टींचा अनुभव मी घेतला. 

दरम्यान ‘जुळता जुळता जुळतंय की’ या मालिकेचे चित्रीकरण कोल्हापूर परिसरात होणार होतं आणि माझ्या काही मित्रमंडळीनी मला या मालिकेत एक भूमिका आहे असं सुचवलं. सहज म्हणून मी ऑडिशन दिली आणि या मालिकेतील रेखा या व्यक्तिरेखेसाठी माझी निवड झाली. प्राध्यापिकेचा जॉब आणि रेखाची भूमिका या दोन्ही मी त्या वेळेला करत होते. पण त्यानंतर मला टीक टॉकचे व्हिडिओ करायला खूप आवडायला लागलं. 

Bigg Boss Marathi 3: Host Mahesh Manjrekar gives clarification on excluding Sonali  Patil in previous' weekend Chavadi, says, "I would have done the same with  my daughter" - Times of India

सणाच्या निमित्ताने मी सजायचे तेव्हा मी ते व्हिडिओ बनवून टिक टॉकवर अपलोड करायचे किंवा काही असे मजेशीर व्हिडिओ बनवण्याचं मला सुचलं की मी लगेच ते बनवून टिक टॉक वर टाकायचे. यामुळे मी टिकटॉकवर खूप प्रसिद्ध झाले. मला ‘वैजू नंबर वन’ या मालिकेची ऑफर आली. सहज केलेले व्हिडिओ आज मला एक ओळख एक चेहरा देऊन गेले.”

हे ही वाचा: कोल्हापूरची खाद्यसंस्कृती -सणासुदीचं सुग्रास कोल्हापूर

शब्बास रे पठ्ठ्या! शिक्षण अर्धवट सोडून व्यवसायाला सुरुवात केली, आता कमावतोय वर्षाला कोटी रुपये

‘जुळता जुळता जुळतंय की’ ही सोनालीची पहिली मालिका होती, तर ‘वैजू नंबर वन’ या तिच्या दुसऱ्याच मालिकेत थेट नायिका साकारण्याची संधी मिळाली. देवमाणूस मालिकेच्या शेवटच्या टप्प्यात वकील आर्या देशमुख ही भूमिका सोनालीने अशी काही साकारली की, मालिका संपण्याच्या मार्गावर असतानाही सोनाली प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. घाडगे आणि सून, देव पावला या मालिकेतील छोटी भूमिकाही तिने साकारली आहे. 

हे देखील वाचा: या महत्वाच्या कारणांसाठी आवर्जून बघा ‘शार्क टॅंक इंडिया'(Shark Tank India)

तिला मराठी सिनेमात काम करायचा आहे. शिवाय वेबसिरीज मध्ये झळकण्याची सोनालीची इच्छा आहे. अवघ्या पाच वर्षात सोनालीने मनोरंजन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बिगबॉसच्या घरात प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या सोनालीची नुकतीच या शोमधून एक्झिट झाली आहे. सध्या इन्स्टा रिल करणाऱ्या हौशी कलाकारांनाही छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळू शकते, हे सोनालीने दाखवून दिले आहे. 

अनुराधा कदम


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.