एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाची नुकतीच पहिली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. निवडणूक आयोगाने त्यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह सुद्धा दिले. त्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रीय कार्यकरणीची ही बैठक झाली आहे. बैठकीत प्रस्तावित प्रस्तावांवर हिंदुत्व विचारवादी विनायक दामोदर सावकर यांना भारत रत्न देण्याची मागणी सुद्धा केली होती. (Churchgate Station)
राष्ट्रीय कार्यकरिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा उपस्थिती होती. यामध्ये आणखी एका प्रस्तावाअंतर्गत चर्चगेट रेल्वे स्थानकाचे नाव बदलून माजी केंद्रीय अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांचे नाव दिले जाणार आहे.
१९४३ मध्ये भारतीय रिजव्र बँकेला चिंतामण द्वारकानाथ देशमुख यांच्या रुपात पहिले गर्वनर म्हणून मिळाले. ते एक सिविल सेवक होते आणि त्यांनी देशासाठी काही महान कार्य केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा पदभार सांभाळल्यानंतर प्रतिष्ठित चर्चगेट स्थानकाचे नाव बदलून चिंतामणरावर देशमुख स्थानक करण्याचा प्रस्ताव पारित केला. भारताच्या स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या वर्षात देशात काही महान कार्य केल्यानंतर ते १९५०-५६ दरम्यान भारताचे अर्थमंत्री झाले होते.
बैठकीनंतर मंत्री उदय सामंत यांनी महत्वाची माहिती देत असे सांगितले की, पक्षाच्या विरोधात कारवाई करणाऱ्यांसाठी तीन सदस्यीय कमेटीची स्थापना केली गेली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्य नेते म्हणून निवडले गेले आहे. एकनाथ शिंदे यांच्याजवळ पक्षाची सर्व सुत्र असणार आहे. तसेच बैठकीत मराठीला अभिजात वर्गाचा दर्जा देण्याचा ही निर्णय घेण्यात आला आहे. भुमिपूत्रांना ८० टक्के रोजगार देण्याचा ही प्रस्ताव पास केला गेला आहे.
दरम्यान, चर्चगेट स्थानकाचे नाव ठेवण्यामागे एक इतिहास आहे. खरंतर १८६२ मध्ये सर बॅटल फ्रेर बॉम्बे हे गर्वनर झाले. त्यांनी शहराला मिनी लंडन बनवण्याचा विचार केला. त्यासाठी फ्रेर यांनी ब्रिटिश कलाकृतीवर आधारित काही इमारती आणि चर्च उभारले. आज हाच परिसरल कुलाबा आणि चर्चगेट नावाने ओळखळा जातो. (Churchgate Station)
हे देखील वाचा- जगातील सर्वाधिक मोठा हत्ती ‘थेचिकोट्टुकावु रामचंद्रन’ राहिलाय वादग्रस्त
त्यावेळी या संपूर्ण परिसरात तीन गेट्स होते. हे गेट्स अपोलो गेट, बाजार गेट आणि चर्च गेट होते. चर्चगेटचा थेट रस्ता हा सेंट थॉमस कथेडरल चर्चकडे जात होता. त्यामुळे त्या गेटचे नाव चर्चगेट पडले होते. १८६० मध्ये तो गेट तोडला गेला होता. गेट नव्हता तरीही त्या परिसराला चर्चगेट नावाने ओळखले जाऊ लागले होते. कुलाबा स्थानक ही बंद झाले.त्यानंतर १८७० मध्ये एक नवं स्थानक बनवले गेले. ज्याचे नाव चर्चगेट असे ठेवले गेले.