महाराष्ट्राला लाभलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. मराठा साम्राज्याचे संस्थापक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या शौर्याने मुघल, आदिलशाही, कुतुबशाही अशा अनेक परकीय आक्रमणांपासून आपल्या स्वराज्याचे रक्षण केले. महाराजांचे कर्तृत्व एवढे मोठे आहे की, त्याला शब्द देखील अपुरे पडतील. याच महाराजांच्या शौर्याचे साक्ष देणारे आजही त्यांची अस्तित्वाची अनुभती देणारे गड किल्ले महाराष्ट्रात आहे. अतिशय भव्य, भक्कम आणि सुरेख असे हे किल्ले म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे आणि पर्यायाने देशाचे वैभव आहे. (Railway)
शेकडो वर्षांपूर्वीचा इतिहास आजच्या आणि भविष्यातील पिढीला समजावा यासाठी अनेक प्रयत्न होताना दिसत आहे. आज आपण घेत असलेला मोकळा श्वास ज्या लोकांच्या बलिदानामुळे मिळाला त्या लोकांना पराक्रम अनुभवता यावा यासाठी आपण आपला इतिहास आणि त्याच्याशी संबंधित अशा वास्तुंना नक्की भेट दिली पाहिजे. आज आपल्या महाराष्ट्रात शेकडो गड किल्ले आहे. हे किल्ले लोकांनी पाहावे, इथले पर्यटन वाढावे आणि इतिहासाची, महाराजांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची जाणीव सगळ्यांना व्हावी यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. असाच एक भन्नाट उपक्रम रेल्वेच्या माध्यमातून सुरु होत आहे. जाणून घेऊया याच उपक्रमाबद्दल. (Marathi News)
महाराष्ट्राच्या किल्ल्यांना जोडणारी ‘मराठा पर्यटन ट्रेन’ ही ट्रेन येत्या ९ जूनपासून सुरू होत आहे. या ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करणे आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांचा, सांस्कृतिक ठेव्यांचा आणि धार्मिक स्थळांचा अविस्मरणीय अनुभव घेणे पर्यटकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. भारतीय रेल्वेच्या ‘आयआरसीटीसी’द्वारा चालवली जाणारी ‘भारत गौरव टुरिस्ट ट्रेन’ खास मराठा साम्राज्याच्या ऐतिहासिक किल्ल्यांना जोडणारी आहे. (Marathi Latest News)
कसा असेल प्रवास ?
मराठा पर्यटन ट्रेनचा प्रवास सहा दिवसांचा असणार आहे. या प्रवासात विशेष पर्यटन मार्गात रायगड, शिवनेरी, प्रतापगड आणि पन्हाळगडाचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसेच दादर आणि ठाणे स्थानकावरून ही रेल्वे ९ जूनला सुटेल. या पॅकेजमध्ये स्लीपर, एसी तृतीय श्रेणी, एसी द्वितीय श्रेणीतून प्रवासाची सोय आणि हॉटेलमध्ये मुक्कामाची सुविधा असणार आहे. (Marathi Trending News)
छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला पाहता येणार आहे. या ट्रेनच्या प्रवासात पुणे परिसरातील लाल महाल, कसबा गणेश मंदिर, शिवसृष्टी, शिवनेरी किल्ला, भिमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर यासोबतच, किल्ले प्रतापगड आणि कोल्हापूरची अंबाबाई मंदिर देखील या प्रवासात अनुभवता येणार आहेत. (Marathi Top News)
=======
हे देखील वाचा : E-Passport : भारतात सुरु झाली ई-पासपोर्ट सेवा
RTO : महाराष्ट्रातील ‘या’ तालुक्यात होणार नवीन आरटीओ ऑफिस
=======
या यात्रेच्या अंतर्गत, पर्यटन प्रेमींना एक विशेष यात्रा पॅकेज देखील दिले जाणार आहे, यात संपूर्ण प्रवासाची व्यवस्था, निवास, भोजन, तसेच स्थानिक मार्गदर्शकांची सेवा उपलब्ध असेल. या पॅकेजमध्ये विविध किल्ल्यांची आणि तीर्थस्थळांची सुसंगत माहिती दिली जाईल, ज्यामुळे पर्यटकांना एक संपूर्ण ऐतिहासिक अनुभव मिळेल. हे सर्व पर्यटन स्थळे आणि किल्ले एकाच प्रवासात पाहण्यासाठी एकत्र केल्यामुळे, पर्यटकांना एक थेट आणि सुसंगत इतिहास समजून घेण्याची संधी मिळेल. शिवाय राज्यातील पर्यटन क्षेत्राला मोठा चालना मिळेल. (Social News)