Home » Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणेला छळणारी करिश्मा हगवणे आहे तरी कोण?

Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणेला छळणारी करिश्मा हगवणे आहे तरी कोण?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Vaishnavi Hagawane
Share

पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असलेल्या राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने वैष्णवी हगवणे हीने १६ मे रोजी सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. लग्नानंतर हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला आणि याच छळातून वैष्णवीने हे टोकाचे पाऊल उचलले. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या आईवडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिचा नवरा शशांक, सासू, सासरे, दीर आणि नणंदेला पोलिसांनी अटक केली. मात्र या सर्वांमध्ये प्रकर्षाने सर्वात जास्त नाव घेतले जाते ते वैष्णवीच्या नणंदेचे करिश्माचे. वैष्णवीची मोठी जाऊ असलेल्या मयुरी जगतापने सांगितले की, वैष्णवीचा सर्वात जास्त छळ करिश्माच करायची. या घटनेनंतर करिश्मा हगवणे ही कोण याबद्दल सतत विचारणा होत आहे. जाणून घेऊया करिश्माबद्दल. (Vaishnavi Hagawane)

वैष्णवी हगवणेनेच्या मृत्यूनंतर तिचे व्हॉट्स चॅट समोर आले. त्यामध्ये तिने तिला होत असलेल्या त्रासाचा, जाचाचा उल्लेख केलेला आहे. वैष्णवीने व्हॉईस नोटच्या माध्यमातून तिची आपबिती तिच्या मैत्रिणीला सांगितली. यामध्ये तिने पिंकी ताईचे नाव घेतले आहे. पिंकी ताईकडून होत असलेला त्रास तिने व्हॉईस नोटच्या माध्यमातून सांगितला आहे. वैष्णवीने उल्लेख केलेली पिंकी दुसरी तिसरी कोणी नाही तर तिची नणंद करिश्मा हगवणे आहे. (Todays Marathi News)

Vaishnavi Hagawane

करिश्मा हगवणे, वैष्णवीची नणंद या प्रकरणात मुख्य आरोपींपैकी एक असल्याचे म्हटले जात आहे. ही हगवणे कुटुंबातील पहिले अपत्य आहे. करिश्मा ३४ वर्षांची असून अविवाहित आहे. घरातले सगळे निर्णय करिश्माच घेते, असे सांगितले जात आहे. वैष्णवीच्या आत्महत्येपूर्वी करिश्माने तिला धमकावले आणि त्रास दिला, असा आरोप आहे. करिश्मा ही फॅशन डिझायनर आहे. लक्ष्मीतारा या नावाने तिची एक कंपनी आहे. माहितीनुसार, तिचे दुकान कोथरुडमध्ये आहे. तिच्या इंस्टाग्राम पेजवर, तिने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबतचे फोटो पोस्ट केलेले आहेत. (Marathi Latest News)

करिश्मा ही अविवाहित असल्यामुळे तिच्या मुळशीमध्ये पालकांसोबतच राहाते. संपूर्ण हगवणे कुटुंबावर करिश्माचीच सत्ता होती. घरात कोणी कोणाशी कसे वागायचे हे करिश्माच ठरवत असे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वैष्णवी आणि मयूरी एकाच घरात राहात असून देखील करिश्माने त्यांना एकमेकींशी बोलण्यास, भेटण्यास मनाई केली होती. करिश्माने केवळ वैष्णवीलाच नाही तर मयुरीला देखील खूप त्रास दिला. तिला लग्न करायची इच्छा नाही. हगवणे कुटुंबावर तिला कायमस्वरुपी नियंत्रण हवं आहे. ती दोन्ही भावांपेक्षा ५ वर्षानं मोठी आहे. त्यामुळे त्यांच्या संसारात तिची कायम लुडबूड चालते. (Latest Marathi HEadline)

Vaishnavi Hagawane

याबद्दल मयुरीने सांगितले की करिश्मा आणि तिच्या कुटुंबाने तिलाही मारहाण केली, मानसिक छळ केला. गावात कोणाशी बोलू नये म्हणून करिश्मा आणि तिची आई लता मयुरीला कायम थांबवायच्या. वैष्णवीच्या बाळाला मयुरीला कधीच भेटू दिले नाहीत, असेही तिने सांगितले. मयुरीने २०२४ साली नोव्हेंबरमध्ये पौड पोलिसांत या सर्व त्रासाविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र राजकीय दबावामुळे ती दाबली गेली, असा दावा मयुरीने केला आहे. (Top Stories)

======
                      
======

विशेष म्हणजे राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राज्य कार्यकारिणी सदस्य होता. शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील वैष्णवीच्या लग्नाला हजर राहिले होते. मात्र यासर्व प्रकरणावर अजित पवार यांनी सांगितले आहे की, ‘माझी चूक असेल तर फासावर लटकवा’. आता राजेंद्र आणि सुशील यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. (Marathi News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.