जंगलाचा राजा कोण, अर्थातच सिंह. जंगलाचा हा राजा नुसता समोर आला तरी भल्याभल्यांना घाम फुटतो. ज्या जंगलात सिंहाचे वास्तव्य आहे, तेथील प्राणी त्याची हालचाल कुठे आहे, हे बघूनच आपला मार्ग ठरवतात. अशा या जंगलाच्या राजाला कुणाचीही भीती नसते. पण हा जंगलाचा राजा एका पक्षाला सर्वाधिक घाबरतो, असे सांगितले तर आश्चर्य वाटेल. पण जंगलाचा राजा सिंह, मार्शल ईगल नावाच्या पक्षाला सर्वाधिक घाबरतो. (Martial Eagles)
या मार्शल नावाच्या गरुडाचे पाय एवढे तीक्ष्ण आणि मजबूत असतात की त्या पायांचा मार सिंहाला बसला तर तो आंधळाही होण्याची शक्यता असते. हा गरुड अतिशय चपळ असतो, तो कधी, कशी आणि कुठून आपल्या खांद्यावर झडप घालतो, हे कळतही नाही. अशीच झडप हा मार्शल ईगल जंगलाच्या राजावरही घालतो. त्यामुळे एरवी रुबाबात चालणारा हा राजा मार्शल ईगल दिसला की आपला मार्ग बदलतो. जंगलाचा राजा सिंह सर्वात हिंसक प्राणी आहे. कारण सिंह हा शक्तिशाली असण्यासोबतच निष्णात शिकारी म्हणूनही ओळखला जातो. या राजाला जंगलात कोणाचीही भीती वाटत नाही. मात्र मार्शल ईगल नावाच्या पक्षाला हा सिंह निश्चितच घाबरतो. कारण या पक्षाची ताकद कमी असली तरी त्याची चलाखी आणि त्याचा वेग हा सिंहापेक्षा अधिक आहे. (Marathi News)
याच जोरावर तो जंगलाच्या राजालाही घाबरुन सोडतो. अर्थात जंगलाचा राजा असलेल्या सिंहाला जंगलातील काही प्राण्यांपासून सावधान रहावे लागतेच. त्यातला त्याचा पहिला शत्रू हा ताकदवार सिंहच ठरतो. ब-याचवेळा म्हातारा झालेल्या सिंहाची शिकार अन्य ताकदवान सिंहच करतो. तर वयोवृद्ध सिंहाची तरस या प्राण्यानंही शिकार केल्याच्या घटना झाल्या आहेत. तरस हा प्राणी जंगलात समुहानं वावरतो. अशा तरसांच्या समुहाला म्हातारा झालेला सिंह दिसल्यास ते त्याला मारून त्याचे मांस भक्षण करतात. यानंतर सिंह आणि जंगली म्हशींची मारामारीही अनेकवेळा होते. या म्हशी आपल्या शिंगांच्या सहाय्यानं सिंहाला घायाळही करतात. हत्ती, पाणघोडा यासारखे प्राणीही या जंगलाच्या राजावर कधीकधी मात करतात. मात्र हे सर्व प्राणी ताकदीनं सिंहासारखेच आहेत. पण सिंहाच्या अगदी शेपटीच्या वजनापेक्षाही कमी असलेला मार्शल ईगल सिंहाला घातक ठरु शकतो. जंगली प्राण्यांवर संशोधन करणा-या एका वाहिनीनं याबाबत एक फिल्म तयार केली आहे. या फिल्ममध्ये मार्शल ईगलची दहशत सिंहावर किती आहे, हे स्पष्ट झाले आहे. (Martial Eagles)
या मार्शल ईगल म्हणजेच गरुडाचा वेग हा थक्क करणारा आहे. या गरुडाच्या पंखांचा विस्तार सुमारे 6 फूट असतो. शक्यतो मार्शल ईगल कुठल्याही मोठ्या प्राण्यावर हल्ला करत नाही. मात्र त्याच्या घरट्याजवळ एखादा मोठा प्राणी आल्यास या प्राण्याला मार्शल ईगल हल्ला करुन पळवून लावतो. अनेकवेळा मार्शल ईगलच्या हल्ल्यामध्ये प्राण्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापतही झाली आहे. यासंदर्भात नॅशनल जिओग्राफिकने एक फिल्म तयार केली असून त्यात जंगलाच्या राजाची शिकार कऱणारा मार्शल ईगलही चित्रीत कऱण्यात आला आहे. मार्शल ईगलचे हत्यार म्हणजे, त्याची नखं आहेत. त्याची तीक्ष्ण दृष्टी आणि मजबूत नखे यामुळे तो जंगलातील सर्वात धोकादायक पक्षी म्हणून ओळखला जातो. आपल्या पिल्लांचे रक्षण करण्यासाठी हा मार्शल ईगल जंगलातील कोणत्याही प्राण्याबरोबर लढण्यास तयार असतो. मार्शल ईगलचा वेग हा त्याचा मदतनीस असतो. हा गरुड उंचावरून एवढ्या लवकर खाली येतो, की तो ज्या प्राण्यावर हल्ला करणार आहे, त्याला त्याच्या वेगाचा अंदाजही घेता येत नाही. (Marathi News)
=======
हे देखील वाचा : डिमेंशियाची समस्या अनुवांशित असते का? घ्या जाणून
Vegetarian : ८०० वर्षांपासून शाकाहारी असलेले महाराष्ट्रातील एकमेव गाव
=======
मार्शल ईगलचे घरटे उंच अशा झाडांवर असते. अशा घरट्याच्या आसपास एखादा प्राणी आल्यास तो त्याच्यावर हल्ला करतो. मार्शल ईगल उंचावरून आपल्या घरट्यावर लक्ष ठेवत असतो. घरट्याच्या आसपास आलेल्या प्राण्यांवर तो आपले भक्ष समजून हल्ला करतो. वेगानं झेपावत तो मजबूत नखे आणि तीक्ष्ण चोच या प्राण्यांच्या मस्तकात मारतो. अशावेळी सिंहासारखा प्राणीही गडबडून पडतो. मग अशा पडलेल्या सिंहावर किंवा अन्य प्राण्यांवर आणखी वेगानं हल्ला करत मार्शल ईगल त्यांना रक्तबंबाळ करतो. हा मार्शल ईगल मोठ्याप्रमाणात आफ्रिकेतील जंगलात आढळतो. तेथील जंगलात सिंहाचेही प्रमाण अधिक आहे. या सिंह आणि मार्शल ईगलमध्ये झालेल्या अनेक झटापटी नॅशनल जिओग्राफीनं चित्रित केल्या आहेत. (Martial Eagles)
सई बने