महाराष्ट्र्र अतिशय वेगाने विकसित होत आहे. महाराष्ट्रासोबतच महाराष्ट्रातील शहरं आणि तालुक्यांचाही झपाट्याने विकास होताना दिसत आहे. या होणाऱ्या विकासामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमधील तालुक्यांचा विकास देखील खूपच वाढत आहे. राज्यातील या वाढत्या विकासामुळे विविध जिल्ह्यांतील तालुक्यांमध्ये वाहनांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढत आहे. आणि म्हणूनच राज्यात नवीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत आता महाराष्ट्रातील एका तालुक्याला नवा RTO क्रमांक मिळाला आहे. (RTO)
आताच्या घडीला महाराष्ट्रामध्ये एकूण ५६ आरटीओ (RTO) नंबर आहेत. या आरटीओ नंबरचा वापर वाहन नोंदणीसाठी केला जातो. राज्यात विविध प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत, जी MH-1 ते MH-56 पर्यंतच्या क्रमांकांनी ओळखली जातात. मात्र आता यात अजून एका नंबरची भर पडली आहे. १ मार्च २०२५ रोजी मीरा-भाईंदर येथे राज्यातील ५८ वे उपप्रदेशिक परिवहन कार्यालय मंजूर करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला MH 59 हा नवीन RTO क्रमांक देण्यात आला आहे. (Marathi Top News)
‘जत’साठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय मंजूर करण्यात आले असून, त्यामुळे जत तालुक्यातील नागरिकांना वाहन नोंदणी, परवाने, कर भरणा यांसाठी इतर ठिकाणी जावे लागणार नाही. हे कार्यालय तालुक्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. (Marathi Trending News)
भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत तालुक्यासाठी नवीन RTO कार्यालयाची मागणी केली होती. जत तालुक्यातील नागरिकांना वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर परिवहन संबंधित कामांसाठी सांगलीपर्यंत जावे लागत असल्याने त्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. दरम्यान आताच्या घडीला महाराष्ट्र राज्यात 15 प्रादेशिक परिवहन कार्यालये आणि 35 उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. (Marathi Latest News)
=======
हे देखील वाचा : Virat-Anushka : विराट-अनुष्काच्या हातात दिसली ‘इलेक्ट्रॉनिक जपमाळ’
=======
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) कार्यालय हे मोटार वाहन कायदा आणि नियमांनुसार काम करणारे एक महत्वाचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या अंतर्गत अनेक मोठी कामं होतात, जसे की वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग परवाने, वाहन तपासणी आणि वाहतूक कायद्यांची अंमलबजावणी आदी. या कार्यालयात, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हे जिल्हा स्तरावरील कार्यालयाचे प्रमुख असतात आणि त्यांचे काम रस्ता सुरक्षा, वाहतूक नियम आणि करांसंबंधी कामकाज पाहणे असते. (Top Stories)