बॉलिवूडमधील अनेक कलाकार अभिनयासोबतच इतरही अनेक व्यवसायांमध्ये सक्रिय असतात. कोणाचे हॉटेल्स असतात , कोणाचे स्पा असतात, कोणाचे ब्युटी प्रोडक्टस असतात तर काही लोकांचे विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक असते. मात्र जेव्हापासून आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग सुरु झाले तेव्हापासून बरेच बॉलिवूड कलाकार आयपीएलमध्ये गुंतवणूक करताना दिसत आहे. शाहरुख खान, जुही चावला पासून ते प्रीती झिंटापर्यंत अनेक कलाकारांची स्वतःची टीम आहे. यंदा आयपीएलचा १८ वा सिझन सुरु आहे. या सीझनमध्ये प्रीती झिंटाची टीम आयपीएलच्या अंतिम सामन्यांमध्ये पोहचली आहे. (Preity Zinta)
आयपीएलच्या क्लालिफायर 2 राऊंडमध्ये पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. आता अंतिम सामना हा पंजाब किंग्जविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू असा होणार आहे. बॉलिवूडची डिंपल गर्ल अशी ओळख असलेली आयपीएलमधील एका मोठ्या टीमची मालकीण आहे. बॉलिवूडपासून सध्या दूर असलेली प्रीती आयपीएलच्या सामन्यांमुळे कायम प्रकाशझोतात येत असते. आता प्रीतीची टीम अंतिम सामन्यांमध्ये पोहचल्यानंतर प्रीती चांगलीच गाजत आहे. (Marathi News)
बॉलिवूडमध्ये प्रितीने एक दशक गाजवले. टॉपची अभिनेत्री असलेल्या प्रितीने चित्रपटांमध्ये अपयश मिळालीला लागल्यानंतर या क्षेत्रापासून दूर राहणे पसंत केले. दोन मुलांची आई असलेल्या प्रीतीची क्रेझ आणि लोकप्रियता आजही कायम आहे. आज जरी ती चित्रपटांमध्ये कमी दिसत असली तरी ती कोट्यवधींची कमाई करते. चित्रपटांमध्ये न दिसणाऱ्या प्रीतीच्या उत्पन्नाचे साधन कोणते? आज या लेखातून जाणून घेऊया प्रीतीच्या एकूण संपत्तीबद्दल. (Top Stories)
एका मोठ्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, प्रिती झिंटाची एकूण संपत्ती तब्बल १८३ कोटी रुपये आहे. ती तिचा व्यवसाय आणि ब्रँड एंडोर्समेंट यांमधून पैसा कमावते. एका ब्रँड एंडोर्समेंटसाठी प्रीती १.५ कोटी रुपये घेते. २००८ मध्ये प्रिती झिंटा आयपीएलची टीम असलेल्या पंजाब किंग्जची सहमालक बनली. ‘मनी कंट्रोल’ने दिलेल्या माहितीनुसार, प्रितीने त्यावेळी सुरुवातीला ३५ कोटी रुपये या टीममध्ये गुंतवले होते. आज हेच ३५ कोटी रुपये ३५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. एवढेच नाही तर २००८ मध्ये जेव्हा पंजाब किंग्ज या टीमची सुरुवात झाली, तेव्हा ही टीम ७६ दशलक्ष डॉलर्सना विकत घेण्यात आली होती. मात्र १४ वर्षात अर्थात 2022 पर्यंत याच टीमची किंमत ९२५ दशलक्ष डॉलर्सपर्यंत वाढलेले होते. (Latest Marathi News)
आयपीएलमधील सामन्यांच्या तिकिट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात आयपीएल संघांच्या मालकांचाही मोठा वाटा असतो. मीडिया मधील एका रिपोर्ट्सनुसार, या सामन्यांच्या तिकीट विक्रीचा ८० टक्के भाग संघ मालकांच्या वाट्याला जातो. यासोबतच प्रेरक टीम स्पॉन्सर्सद्वारे देखील कोट्यवधी पैसे कमवतात. प्रीती झिंटा केवळ अभिनयातूनच नाही विविध ब्रँड एंडोर्समेंट आणि IPLमधूनही मोठी कमाई करते. (Top Marathi HEadline)
IPLमधून संघ मालकांना तिकीट विक्रीसोबतच ऑरगनायझेशन आणि ब्रॉडकास्ट राइट्समधून देखील कोट्यवधी रुपये मिळतात. प्रीती झिंटाने भारतात आणि परदेशात अनेक प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली आहे. एका मोठ्या वेबसाइटच्या माहितीनुसार, प्रीतीचे मुंबईतील पाली हिल येथे १७.०१ कोटींचे आलिशान अपार्टमेंट आहे. याशिवाय तिचे होमटाऊन असलेल्या शिमला येथे देखील ७ कोटींचे घर आहे. तर अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये प्रीती तिच्या पतीसोबत बेव्हरली हिल्समधील आलिशान घरात राहते. यासर्वच गोष्टींसोबत प्रीती झिंटा अनेक महागड्या लक्झरी गाड्यांचे मोठे कलेक्शन देखील आहे. तिच्या पार्किंगमध्ये १२ लाखांची Lexus LX400, ५८ लाखांची Mercedes Benz E-Class, Porsche, BMW सारख्या अनेक महागड्या कारही आहेत. तिचे सोशल मीडियावर ११ मिलियन फॉलोअर्स आहेत. (Social Updates)
===========
हे देखील वाचा : Jonas Masetti : कोण आहेत, पद्मश्री जोनास मासेट्टी !
===========
प्रीतीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने २०१३ मध्ये ‘इश्क इन पॅरिस’ या चित्रपटातून निर्माती म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटात प्रीतीने स्वतः काम केले होते, पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला. यानंतर प्रीतीने ‘हॅपी एंडिंग’ आणि ‘वेलकम टू न्यूयॉर्क’मध्ये कॅमिओ केला. पुढे २०१८ मध्ये तिचा ‘भैय्याजी सुपरहिट’ हा चित्रपट आला मात्र हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर आपटला. आता लवकरच प्रीती ‘लाहोर 1947’ या चित्रपटातून ६ वर्षांनंतर सिनेमात पुनरागमन करणार आहे. आमिर खान या चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटात सनी देओलसोबत प्रिती झिंटा दिसणार आहे. (Celebrity News)