दिल्लीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वात गाजलेला मुद्दा म्हणजे, यमुना नदीचे प्रदूषण. दिल्लीतील यमुना नदी शहराच्या पूर्व भागातून वाहते, आणि शहराला पूर्व आणि पश्चिम दिल्लीमध्ये विभागून पुढे जाते. गेली काही वर्ष याच यमुना नदीमधील प्रदूषण हा वादाचा मुद्दा ठरला आहे. यमुना नदी दिल्लीमध्ये सुमारे 22 किलोमीटर अंतर व्यापते. यातील जवळपास 76 टक्के नदी प्रदूषित असल्यानं दिल्लीकरांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत होते. अनेकवेळा या यमुना पात्रामधील बर्फासारखा दिसणारा फेस आणि यमुनेचे प्रदूषित पाणी यांचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. (Yamuna)
याच सर्वांवरुन दिल्लीमधील विधानसभा निवडणुकाही गाजल्या आहेत. आता दिल्लीविधानसभेत भाजपाचे सरकार आल्यावर त्यांना प्रथम यमुना नदीतील प्रदूषण दूर करण्यावर भर दिला आहे. साबरमती रिव्हर फ्रंटच्या धर्तीवर यमुना नदीचा विकास करण्यासाठी तयारी सुरु झाली. यमुना नदीमध्ये आधुनिक मशिन उतरवून नदीतील गाळ काढला जात आहे. या सर्वांमागे चांगले फलित मिळाले असून दिल्लीमधील या यमुना नदीमध्ये आता क्रूझ चालवण्याची तयारीही कऱण्यात आली आहे. आता यमुना नदीतून फिरणा-या या क्रूझमध्ये बसून पर्यटक ताजमहल आणि अन्य पर्यटन स्थळंही बघण्याचा आनंद घेऊ शकणार आहेत. याशिवाय यमुना नदीमध्ये चालणा-या क्रूझचा वापर वाहतूक व्यवस्थेसाठीही कऱण्याची योजना आहे. यामुळे दिल्लीमध्ये होत असलेल्या वाहतूक कोंडीपासूनही बचाव होणार आहे. सहा वर्षापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आग्रा येथील एका कार्यक्रमात यमुना नदीमध्ये क्रूझ चालवणार असे आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता आता होत आहे. (Latest News)
दिल्लीमध्ये येणा-या पर्यटकांसाठी पुढच्या काही महिन्यात यमुना नदीतून क्रूझ सफारीचा आनंद घेता येणार आहे. आग्रा येथील यमुना नदीतील ताजमहाल ते कैलास मंदिरापर्यंत क्रूझ सेवा सुरू करण्याची योजना असून त्यावर दिल्ली सरकारनं तयारी सुरु केली आहे. वाराणसी आणि मथुरा येथेही अशाच प्रकारचे क्रूझ चालवण्यात येतात. यातून पर्यटकांना नदीमध्ये फिरल्याचा आनंद मिळतोच, शिवाय क्रूझमध्ये बसून पर्यटनस्थळंही बघता येतात. दिल्लीमध्ये पुढच्या काही महिन्यात ताजमहालपासून प्राचीन कैलास महादेव मंदिरापर्यंत क्रूझ चालवले जाणार आहे. याबाबत भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाने ताजमहाल ते प्राचीन कैलास महादेव मंदिरापर्यंत यमुना नदीच्या बाजूने अंतर्देशीय जलमार्गांच्या संभाव्य विकासासाठी एक सर्वेक्षण केले आहे. (Yamuna)
या भागात यमुना नदीची रुंदी साधारण 250 ते 350 मीटर आहे. नदीच्या दोन्ही बाजुला मोठे काठ असून येथेही विकासकामे कऱण्यात येणार आहेत. यातून पर्यटनाला चालना मिळणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात बोटींसाठी जेट्टी आणि किनाऱ्यावरील सुविधा उभारण्यात येतील. सध्या ताजमहाल आणि कैलास मंदिरा दरम्यान क्रूझ सेवा कशी चालेल यासाठी नेमलेली समिती काम करीत आहेत. या भागात ताजमहाल, मेहताब बाग, ग्याराह सिद्दी, आग्रा किल्ला, ताज कॉरिडॉरवरील मुघल गार्डन, एतमादुद्दौला, चिनी का रोजा, रामबाग, जोहराबाग, जसवंत सिंगची छत्री, 32 खांब आणि अन्य स्थानांचा समावेश आहे. क्रूझ सेवेची व्याप्ती वाढवल्यावर पर्यटकांना 16व्या आणि 17व्या शतकात बांधलेल्या ऐतिहासीक स्थानांनाही पाहता येणार आहे. ही योजना सुरु झाल्यावर दिल्लीमध्ये येणा-या पर्यटकांची संख्याही वाढणार आहे. शिवाय रस्ते वाहतुकीवर पडणारा अतिरिक्त प्रवाशांचा भार कमी होण्यास मदत होणार आहे. (Latest News)
=======
हे देखील वाचा : Navratri : चैत्र नवरात्रीची तयारी !
Statue Of Liberty : अमेरिकेची ओळखच पुसली जाणार !
=======
सध्या या सर्वांसाठी यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी आधुनिक मशीनचा वापर कऱण्यात येत आहे. यात 4 स्किमर मशीन, 2 तण काढणी मशीन आणि एक डीटीयू मशीन बसवण्यात आली आहेत. दिल्लीतील आयटीओ आणि वासुदेव घाटापासून हे काम सुरु असून त्याची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. अर्थात हे काम मोठ्या स्वरुपात जरी केले तरी दिल्लीतील यमुना नदी सध्या पूर्णपणे काळी झाली आहे. या नदीतील पाण्याचे स्वरूप बदलण्यास थोडा वेळ लागणार असल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे. नदीमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक कचराही असून काढलेल्या कच-याचे विघटन कऱण्याचे आव्हानही आधिका-यांसमोर आहे. (Yamuna)
सई बने