Home » Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे प्रकरणात नाव आलेला निलेश चव्हाण आहे तरी कोण?

Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे प्रकरणात नाव आलेला निलेश चव्हाण आहे तरी कोण?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Vaishnavi Hagawane
Share

वैष्णवी हगवणेनेच्या आत्महत्येनंतर अनेक नवनवीन खुलासे या केसमध्ये होताना दिसत आहे. आता या प्रकरणात निलेश चव्हाण हे नाव समोर आले आहे. वैष्णवीने हुंड्यासाठी होणाऱ्या सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. वैष्णवीला एक १० महिन्याचा मुलगा देखील आहे. मात्र हा मुलगा वैष्णवीच्या मृत्यूनंतर निलेश चव्हाण नावाच्या माणसाकडे होता. वैष्णवीचे १० महिन्यांचे बाळ याच निलेश चव्हाणकडे असल्याचा आरोप झाला. वैष्णवीचे वडील आणि इतरांनी बाळ त्याच्याकडे असल्याचे सांगितले. बाळ परत घ्यायला गेलेल्या वैष्णवीच्या आई वडिलांना अर्थात कस्पटे कुटुंबाला निलेश चव्हाणने बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोपही झाला. यानंतर वैष्णवीच्या माहेरच्यांच्यातक्रारीवरुन निलेश चव्हाणविरोधात पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Vaishnavi Hagawane)

निलेश चव्हाण आहे तरी कोण?
निलेश चव्हाण हा वैष्णवी हगवणेची नणंद करिश्मा हगवणेचा मित्र आहे. शिवाय निलेश हा वैष्णवीचा पती शशांक हगवणे याचा बिजनेस पार्टनर असल्याची माहिती देखील समोर आली आहे. हा निलेश चव्हाण पुण्यातील कर्वेनगर भागातील औदुंबर सोसायटीत तो राहायला आहे. वैष्णवीच्या बाळाला आपल्याकडे ठेऊन घेणारा निलेश चव्हाण सुद्धा त्याच्या पत्नीचा छळ करत होता हे सत्य समोर आले आहे. निलेश हा अतिशय विकृत माणूस असल्याचे समोर आलेल्या भयानक सत्यावरून लक्षात येते. (Marathi NEws)

निलेश चव्हाण या व्यक्तीने कायमच हगवणे कुटुंबाच्या वादात मध्यस्थी केली होती. हा निलेश चव्हाणने स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने स्वतःच्याच पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडीओ रेकॉर्ड केले होते. या आरोपांतर्गत निलेश चव्हाणवर २०१९ साली पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याच पोलीस ठाण्यात वैष्णवीचे बाळ मागण्यासाठी आलेल्या तिच्या माहेरच्या लोकांना पिस्तुलाच्या साहाय्याने धमकावल्याचा गुन्हा निलेश चव्हाणवर दाखल झाला आहे. (Todays Marathi News)

Vaishnavi Hagawane

३ जून २०१८ रोजी निलेश चव्हाणचे लग्न झाले. सर्व छान सुरु असताना निलेशच्या पत्नीला जानेवारी २०२१ मध्ये एक दिवस अचानक आपल्या बेडरूमच्या सिलिंग फॅनला काहीतरी संशयास्पद दिसले. तिने याबाबत निलेशला विचारले देखील, मात्र त्याने तिला उडवाउडवीचे उत्तर दिली गेली. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा तिला त्यांच्या बेडरूमच्या एसीला काहीतरी संशयास्पद लावले असल्याचे आढळलं. या ही वेळेला निलेशने तिला काहीतरी सांगून वेळ मारून नेली. शेवटी निलेशच्या पत्नीने त्याचा लॅपटॉप तपासला आणि त्यातून तिला एक भयानक हादरून टाकणारे सत्य समजले. (Todyas Marathi Headline)

निलेश कायम शरीर संबंध ठेवताना लाईट का सुरु ठेवतो हा प्रश्न तिला कायम पडायचा. या लॅपटॉपमधून तिला याचे उत्तर मिळाले. निलेशच्या पत्नीला त्या लॅपटॅपमध्ये तिचे आणि निलेशचे शरीरसंबंध ठेवतानाचे आक्षेपार्ह व्हिडीओ मिळाले. हे पाहून ती पूर्णपणे हादरली. निलेश आपले असे आक्षेपार्ह व्हिडीओ काढतो. याची तिला किंचितही कल्पना नव्हती. विशेष म्हणजे लॅपटॉपमध्ये फक्त तिचेच नाही, तर त्याचे इतर अनेक महिलांबरोबर शरीर संबंध ठेवतानाचे व्हिडीओ दिसले. (Top Stories)

हे पाहिल्यावर निलेशच्या पत्नीने याबद्दल त्याला जाब विचारला असता त्याने घरातील चाकूने तिला धमकावले आणि तिचा गळा देखील दाबला. एवढंच नव्हे तर त्याने बळजबरीने तिच्यासोबत शरीर संबंध देखील ठेवले. एवढं सगळं झाल्यावर निलेशच्या पत्नीने निलेशच्या आई–वडिलांना आणि कुटुंबातील इतरांना याची माहिती दिली. पण त्यांनी तिला यात मदत न करता तिचाच छळ करायला सुरुवात केली. त्यानंतर पुढचे अनेक महिने निलेश तिच्या पत्नीचा छळ करत राहिला. अखेर अति झाल्यानंतर निलेशच्या पत्नीने घर सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ती तडक पोलीस संतोष गाठले आणि निलेश विरोधात तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीवरून निलेश आणि त्याच्या नातेवाईकांवर १४ जून २०२२ साली गुन्हा दाखल झाला . (Marathi Latest News)

======
                      
======

पत्नीने तक्रार दाखल केल्यानंतर निलेशने अटकपूर्व जामीनासाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पण हा अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला. मात्र त्यानंतर सुद्धा वारजे पोलिसांनी त्याला अटक केली नाही. अखेर मुंबई उच्च न्यालयाने त्याला अटकपूर्व जमीन दिला. निलेश चव्हाणचा बांधकाम व्यवसाय आहे आणि पोकलेन मशीनचा देखील तो व्यवसाय करतो. आता निलेशची पत्नी निलेशपासून विभक्त झाली आहे. (Marathi Top News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.