Home » कोणत्या राशी होणार मालामाल आणि कोणाचा होणार परदेश प्रवास…

कोणत्या राशी होणार मालामाल आणि कोणाचा होणार परदेश प्रवास…

by Team Gajawaja
0 comment
Weekly Horoscope – 31 October to 06 November
Share

या आठवड्यात कुठल्या राशींचा भाग्योदय होणार? कुठल्या राशींना परदेश प्रवास घडणार? कुठल्या राशींना त्रास होणार, पाहूया या आठवड्याचे राशिभविष्य (Weekly Horoscope – 31 October to 06 November)

मेष – या आठवड्यात कोणताही ग्रहपालट नाही. राशीच्या भाग्यस्थानातून चंद्राचे होणारे भ्रमण वैयक्तिक उत्कर्षाच्या दृष्टीने अनुकूल राहील. आपण कडक शिस्तीचे भोक्तेे आहात. आपल्या इच्छेनुसार सर्व गोष्टी प्राप्त करून घेण्यात यश येईल. नवीन क्षेत्रात काम आणि नाव मिळवू शकाल. नवीन काम मोठ्या उत्साहाने कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. आपल्या कामाची वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. आपल्या मेहनतीला योग्य न्याय मिळेल. धाडसी निर्णय घेतले जातील. कामानिमित्त दूरचे प्रवास घडून येतील. आणि ते यशस्वी होतील. धार्मिक कार्यात रुची वाढेल. आठवड्याच्या उत्तरार्धात धार्मिक स्थळांना भेटी द्याल. आप्तस्वकियांच्या गाठीभेटीतून आनंद मिळेल. गुंतवणुकीतून लाभ होतील.

शुभ दिनांक -1 ते 3.

वृषभ – आपल्या राशीच्या सप्तमास्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण भागीदारी व्यवसायातून लाभ देणारी राहील. श्रमाने, मेहनतीने आपले हित साध्य करता येईल. सफलता लाभेल. जोडीदाराचे चांगले सहकार्य करावे लाभेल. आपल्या माणसांसाठी जीव ओतून काम कराल. आपल्या चांगल्या वागणुकीची प्रशंसा होईल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.कोणतीही गोष्ट मनात न ठेवता मोकळेपणाने विचारांना वाट करून द्याल. जीवनातील समस्यांवर सहजतेने तोडगा काढाल. कोणतेही गैरसमज करून घेऊ नका. आठवड्याच्या उत्तरार्धात तरुणांना नोकरीच्या सुसंधी येतील. नोकरीत भरती बदलीचे योग येतील. मित्र परिवाराचे सहकार्य लाभेल. आपल्या चांगल्या विचारांचा आदर केला जाईल. इच्छापूर्ती होईल. सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करण्याची संधी येईल.

शुभ दिनांक – 4 ते 6.

मिथुन – राशीतील मंगळामुळे आपले निर्णय ठाम राहतील. सप्तमास्थानातून होणाऱ्या चंद्राच्या प्रमाणामुळे भागीदारी व्यवसायातून नवीन कार्यारंभ केले जातील. आपल्या संभाषण कौशल्यामुळे लोकांना आपलेसे कराल. प्रवासात आपले खिसा पाकीट सांभाळावे. कुटुंबातील वयस्कर व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी वाटेल. हीतशत्रूंच्या कारवायांना बळी पडू नका. कोणाच्याही सांगण्यावरून आपल्या मतात बदल करू नका. विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी परदेशी जाण्याचे योग येतील. नवीन संधी चालू येतील. आठवड्याच्या उत्तरार्धात प्रवास योग घडून येतील.भाग्यस्थानातून होणाऱ्या चंद्राच्या भ्रमणामुळे आपल्या उत्कर्षासाठी अनुकूल काळ राहील. दशमस्थानातील गुरुवरून चंद्रग्रहण होताना अनेक चांगल्या संधींचा लाभ घेता येईल.

शुभ दिनांक – 5, 6.

कर्क – गेल्या आठवड्यात आपल्या राशीच्या सुखस्थानात बुधाचा प्रवेश झालेला आहे. रवी शुक्राशी होणारी बुधाची सुखस्थानातील युती घरातील वातावरण आनंदी उत्साही ठेवणारी राहील‌. बड्या मंडळींचे घराला पाय लागतील. नवीन ओळखी होतील. नवीन क्षेत्रात काम मिळवू शकाल. आपल्या चांगल्या कामाने वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. कामाचा व्याप वाढवताना मात्र प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. तसेच भागीदारी व्यवसायातून अनेकांचे सहकार्य लाभेल. अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. कोणतीही गोष्ट मनात न ठेवता मोकळेपणाने आपले विचार मांडाल. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. आठवड्याच्या उत्तरार्धात धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग येतील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे योग येतील.

शुभ दिनांक – 4 ते 6

सिंह – राशीच्या पंचमस्थानातून चंद्राचे होणारे भ्रमण संततीचा उत्कर्ष करणारी राहील. समाजकारण, राजकारण या क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्याल. आपण कडक शिस्तीचे भोक्ते आहात, आपल्या गुणामुळेच समाजात आपल्या मतांचा आदर केला जाईल. आपल्या इच्छेनुसार सर्व गोष्टींची प्राप्ती करून घेता येईल. आपल्या माणसांसाठी जीव ओतून काम कराल. शेअर बाजारात गुंतवणूक करणे टाळावे. व्यावसायिक आर्थिक उलाढाली करताना योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी वाटेल. आठवड्याच्या उत्तरार्धात जोडीदाराकडून लाभ होतील. तसेच स्थावर मालमत्तेतून अथवा सासुरवाडीहून देखील लाभ होतील. अध्यात्मिक ओढा वाढेल. जीवनातील समस्यांवर रामबाण उपाय मिळेल. या आठवड्यातील ग्रह स्थिती आपणास अनुकूल असल्याकारणाने सर्व कार्यात सफलता मिळवता येईल.

शुभ दिनांक – 31, 1

कन्या – राशीस्वामी बुधाने आपल्या राशीच्या धनस्थानात प्रवेश केला आहे. तेथे धनेश शुक्राशी बुधाची युती होईल. कर्म स्थानाचा अधिपती देखील बुधच असल्याकारणाने नोकरी व्यवसायातून आपले उत्पन्न चांगले वाढणार आहे. गृहसुशोभीकरणासाठी आकर्षक शोभेच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. कुटुंबातील वातावरण आनंदी, उत्साही राहील. मातृसौख्य लाभेल. लघुउद्योग तसेच गृहउद्योगातून नवीन कार्यारंभ केले जातील. अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन कामाची पूर्तता करण्यासाठी अथक परिश्रम घ्याल. संतती संबंधी सुवार्ता कानी येईल. आपल्याच विश्वात रममाण व्हाल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीची पूर्तता झाल्यामुळे हाती पैसा येईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना सुसंधी लाभतील. विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. व्यावसायिक कामानिमित्त परदेशी जाण्याचे योग येतील.

शुभ दिनांक – 5, 6

तूळ – भाग्येश बुधाने नुकताच आपल्या राशीत प्रवेश केला आहे. आपल्या राशीतून लाभेश रवी व राशी स्वामी शुक्र भ्रमण करत आहेत. तर धनस्थानाचा अधिपती मंगळ भाग्य स्थानातून भ्रमण करत आहे. त्यामुळे या आठवड्यातील ग्रहमान आपल्या उत्कर्षास अतिशय पूरक असे आहे. पराक्रम स्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण आपणास सतत कार्यरत ठेवणारे राहील. सर्व कामे मनाजोगी पार पडल्याने अतिशय उत्साही वातावरण राहणार आहे. भावंडांशी गाठीभेटी होतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने अनेक बळ्या व्यक्तींच्या ओळखी होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला आणि अनुभव आपणास उपयोगी पडेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतून चांगले यश लाभेल. तरुणांना नोकरीच्या सुसंधी चालून येतील.

शुभ दिनांक – 2, 3

वृश्चिक – राशी स्वामी मंगळाचे अष्टमस्थानातून तर भाग्येश चंद्राचे धनस्थानातून होणारे भ्रमण आपणास अनपेक्षित धनलाभ देणारे राहील. वारसा हक्कातून तसेच लॉटरीतून लाभ होतील. मात्र कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. घरातील वातावरण आनंदी उत्साही राहिल्यामुळे जोमाने काम कराल. कुटुंबात आपल्या मतांचा आदर केला जाईल. कामानिमित्त प्रवास घडून येतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. कुटुंबात शुभ समारंभाचे आयोजन केले जाईल. घरात पाहुण्यांची सतत वर्दळ राहील. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात चांगले यश संपादन करता येईल. नवपरिणीतांना गोड बातमीची चाहुल लागेल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल.

शुभ दिनांक – 31, 1

धनु – आपल्याच राशीतून अष्टमेश चंद्राचे भ्रमण होत आहे. मानसिक त्रास होणारा एखादा प्रसंग घडू शकतो, परंतु त्या प्रसंगाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यास आपल्याला मानसिक त्रास जाणवणार नाही. लाभस्थानातील रवी, बुध, शुक्रची युती आपली आर्थिक बाजू भक्कम करणारी राहील. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीपूर्वी केलेल्या गुंतवणुकीची पूर्तता झाल्याने हाती पैसा येईल. घरातील वातावरण आनंदी उत्साही ठेवण्याचा प्रयत्न कराल. आपल्या इच्छेनुसार सर्व गोष्टींची प्राप्ती होईल. आपल्या माणसांसाठी जीव ओतून काम कराल. शेअर बाजारातील गुंतवणूक टाळावी, नाहीतर नुकसान होण्याची शक्यता राहते. आठवड्याच्या उत्तरार्धात घरात धार्मिक शुभ समारंभाचे आयोजन केले जाईल. नवीन वाहन वास्तूचे योग येतील.

शुभ दिनांक – 2 ते 4

मकर – सप्तमेश चंद्राचे भ्रमण आपल्या राशीच्या व्ययस्थानातून होत आहे. त्यामुळे आपल्या प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. अनपेक्षित खर्च वाढू शकतो. कामानिमित्त प्रवास घडतील. आपल्या पथक परिश्रमाने आपले ध्येय साध्य कराल. धाडसी निर्णय घेतले जातील. वडीलधाऱ्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे आठवड्याच्या उत्तरार्धात केल्यास पूर्णत्वास जातील. आपल्या चांगल्या कामाची, चांगल्या वागणुकीची प्रशंसा केली जाईल. राजकारण समाजकारण यात सक्रिय सहभाग घ्याल. अनेकांना सहकार्य कराल. नवीन क्षेत्रात पाय रोवता येईल. आठवड्याच्या उत्तरार्धात आपली आर्थिक बाजू भक्कम होण्यास मदत होईल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. संत सज्जनांचा सहवास लाभेल. पराक्रम स्थानात गुरू- चंद्राची होणारी युती आपणास अनेक क्षेत्रात उपलब्धता देणारी राहील.

शुभ दिनांक – 5, 6.

कुंभ – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या लाभस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. आपली इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील. रेंगाळलेल्या सरकारी कामांना गती मिळेल. सामाजिक कार्यात विशेष सहभाग घ्याल. मित्र परिवाराबरोबर वेळ मजेत घालवाल. सहलीचे आयोजन केले जाईल. मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. हा आठवडा आपणासाठी अतिशय सकारात्मक उर्जा घेऊन येणारा आहे. कामानिमित्त परदेश प्रवास घडतील. वैयक्तिक उत्कर्षाच्या वार्ता कानी येतील. मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाईल. सामाजिक पतप्रतिष्ठा उंचावेल. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आपल्या कष्टाचे चीज होईल. गायक, वादक, कलाकार यांच्यासाठी या आठवड्यातील ग्रहमान अतिशय अनुकूल फलदायी आहे. आपली मते स्पष्टपणे मांडाल. आठवड्याच्या उत्तरार्धात धनस्थानातून होणारे गुरुचंद्राचेे भ्रमण आपली आर्थिक बाजू उंचावणारे राहील.

शुभ दिनांक – 1 ते 3

मीन – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या कर्म स्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. तरुणांना नोकरी व्यवसायाच्या चांगल्या संधी चालून येतील. वरिष्ठांची मर्जी राखून काम केल्यामुळे नोकरीत आपले प्रशंसा होईल. बढती बदलीचे योग येतील. अष्टमातील रवी, बुध, शुक्र जोडीदाराकडून तसेच भागीदारी व्यवसायातून लाभ देणारे राहतील.व्यवसायाच्या दृष्टीने नवीन कल्पना आकार घेतील. आपल्या व्यवसायासाठी नवीन वास्तु घेण्याचे योग आहेत. आपली मानसिक कोंडी दूर करणारे हे ग्रहमान आहे. मैत्रीला उजाळा मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात राशी स्वामी गुरुवरून चंद्राचे होणारे भ्रमण आपणास अनेक गोष्टी उपलब्ध करून देणारे राहील. महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी केली जाईल. गुरुकृपा लाभेल. हातून दानधर्म केला जाईल. आपल्या सात्विक विचारांमुळे आपल्या मतांचा आदर केला जाईल.

शुभ दिनांक -1, 2

  • श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे 

9011149780 / 8668293104

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.