2023 हे नवीन वर्ष रविवारपासून सुरू होत आहे. या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात बारा राशींच्या नशिबात काय असेल, त्यांना हा आठवडा कसा जाईल हे जाणून घेऊ… (Weekly Horoscope 02 Jan to 08 Jan)

मेष – नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याच राशीतून चंद्राचे भ्रमण होत आहे. कोणतीही गोष्ट मनात न ठेवता आपल्या विचारांना वाट मोकळी करून द्याल. बोलण्यातील स्पष्टपणा वाढेल. राशीस्वामी मंगळावरून धनस्थानातून चंद्राचे होणारे भ्रमण आपल्याला चांगला वित्तलाभ करून देणारे राहील. जुनी येणी वसूल होतील. आपल्या मतांचा समाजात आदर केला जाईल. आपल्या माणसांसाठी जीव ओतून काम कराल. उत्तरार्धात पौर्णिमेजवळ भावंडांच्या गाठीभेटी होतील. भावंडांचा एखादा सल्ला आपल्यासाठी खूप महत्त्वाचा राहील. घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. कुटुंबात शुभ समारंभाचे आयोजन होईल. कामानिमित्त प्रवास घडतील.
शुभ दिनांक – 3, 4

वृषभ – नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या राशीतून मंगळाचे होणारे भ्रमण आपली ध्येयपूर्ती करणारी राहील. आपणास अधिकार प्राप्ती होईल. चांगल्या व्यवस्थापन कौशल्यामुळे आपले कौतुक होईल. अनपेक्षित खर्च उद्भवेल. राशीत मंगळ असल्यामुळे चांगले नेतृत्व गुण दिसून येतील. नवनवीन उपक्रम धडाडीने राबवले जातील. नवीन क्षेत्रात काम मिळवता येईल. आपले ध्येय पूर्ण करून घेताना कोणाचे मन दुखावणार नाही याकडे लक्ष द्या. गोड बोलून आपली कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. कुटुंबीयांवर आपली मते लागू नका.
शुभ दिनांक – 3, 4 , 5

मिथुन – आपल्या राशीच्या लाभस्थानातील राहू आणि हर्षल वरून चंद्राचे भ्रमण होत आहे. त्यामुळे नोकरी व्यवसायातील कामानिमित्त आपणास सतत प्रवास करावे लागतील. मेहनतीने आपले हित साध्य करण्यात यश लाभेल. मित्र परिवाराचे सहकार्य लाभेल. शेअर्स मधून लाभ होतील. आपली इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील. नेत्रविकार, डोकेदुखी याकडे दुर्लक्ष करू नका. अकारण खर्च वाढण्याची शक्यता राहते. उधारी उसनवारी टाळावी. उत्तरार्धात वार्ता कानी येतील. धाडसी निर्णय घेतले जातील. हातून दानधर्म होतील. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल.
शुभ दिनांक – 5, 6 ,7

कर्क – राशीस्वामी चंद्राचे भ्रमण वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या कर्मस्थानातून होत आहे, त्यामुळे व्यवसाय उद्योगात आपणास अनेक सुसंधी चालून येतील. नवीन कार्यारंभ केले जातील. मित्र परिवाराचे तसेच सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आपली इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील. सामाजिक राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्याल. आपल्या मतांचा समाजात आदर होईल. कामानिमित्त प्रवास घडतील. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी लाभेल. संसर्गजन्य आजार तसेच उष्णतेच्या विकारांचा त्रास होऊ शकतो.
शुभ दिनांक – 3, 4

सिंह – नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या भाग्यस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण आपला वैयक्तिक उत्कर्ष करणारे राहील. नवीन सुसंधी चालून येतील. कामानिमित्त दूरचे प्रवास घडतील. हाती घेतलेले काम यशस्वीपणे पूर्णत्वास न्याल. नोकरीत बढती बदलीचे योग येतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ होतील. शेअर्स मधून चांगला फायदा होईल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. रेंगाळलेली सरकारी कामे मार्गी लावता येतील. उत्तरार्धात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून चांगले यश लाभेल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल.
शुभ दिनांक – 2, 3

कन्या – आपल्या राशीच्या अष्टमस्थानातून होणाऱ्या चंद्राच्या भ्रमणामुळे जुन्या प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवून कोणतेही काम त्यांच्यावर सोपवू नका. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. स्थावर मालमत्तेतून लाभ होण्याची शक्यता राहते. धाडसी निर्णय घेतले जातील. एखाद्या जुन्या समस्येवर योग्य मार्ग काढता येईल. भाग्यस्थानातील मंगळ आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी देणारा राहील. नवीन उपक्रम राबवण्यात यश लाभेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. आपण केलेल्या कामाची वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. आणि एखाद्या सवलतीचा लाभ मिळेल.
शुभ दिनांक – 6 ,7, 8

तूळ – आपल्या राशीच्या सप्तमस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने शुभ फळे देणारी राहील. समाजातील स्वतःची पतप्रतिष्ठा वाढवण्याचे दृष्टीने सतत प्रयत्नशील राहाल. स्वकर्तृत्वावर महत्त्वाचे निर्णय घेऊन यशस्वीपणे पार पाडले जातील. व्यवसाय उद्योगात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायातील आत्मविश्वास व कामाचा वेग वाढेल. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातून लाभ होतील. प्रलोभनांना बळी पडू नका. कुटुंबातील एखादे काम पुढाकार घेऊन पूर्ण कराल. उत्तरार्धात कामानिमित्त प्रवास घडतील. नोकरीत पदोन्नती होईल.
शुभ दिनांक – 7, 8

वृश्चिक – राशीस्वामी मंगळाचा सप्तम स्थानातील प्रवेश आपणास अतिशय उत्साह देणारा राहील. प्रिय व्यक्तींच्या गाठीभेटी घडून येतील. व्यवसायातचे निर्णय घेतले जातील. आळस झटकून नव्या जोमाने कामाला लागाल. जिद्द आणि महत्त्वाकांक्षा वाढेल. हितशत्रूंच्या कारवायांना मोठ्या हिमतीने मात कराल. आपले ध्येय गाठण्यासाठी सतत कार्यरत राहाल. तरुणांना नोकरीच्या संधी चालून येतील. जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. उत्तरार्धात प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. सर्दी, ताप तसेच संसर्गजन्य आजारांचा त्रास होऊ शकतो.
शुभ दिनांक – 3, 4

धनु – नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या पंचमस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण आणि षष्ठस्थानातून होणारे मंगळाचे भ्रमण आपल्याला उत्साही ठेवणारे राहील. मात्र दैनंदिन कामाची आखणी करताना प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. राशीतील रवी बुध आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी देणारे राहतील. जुनी व्यावसायिक केळी वसूल होतील. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. तरुणांचे परिचयोत्तर विवाह ठरतील. लेखक साहित्यिकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल. नशिबाची चांगली साथ लाभेल.
शुभ दिनांक – 5 , 6 ,7

मकर – आपल्या राशीतून शनी, शुक्राचे तर सुखस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. आजवर घेतलेल्या मेहनतीला यश लाभेल. व्यवसाय उद्योगात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक केली जाईल. धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. हातून दानधर्म होतील. उंची वस्त्रालंकारांची खरेदी केली जाईल. पंचमातील चंद्र, मंगळ युतीमुळे विद्यार्थ्यांना नवीन व्यासपीठ उपलब्ध होईल. स्वतःसाठी खरेदी केली जाईल. सहलीत सहभागी व्हाल. कवी, कलाकारांना चाहत्यांकडून चांगली दाद मिळेल. मोठ्या व्यवहारातून चांगले लाभ होतील. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. जीवनसाथीचा एखादा सल्ला आपणास लाखमोलाचा ठरेल.
शुभ दिनांक – 7, 8

कुंभ – आपल्या राशीच्या पराक्रम स्थानातील राहू, हर्षल वरून चंद्राचे भ्रमण होत आहे तर सुखस्थानातून मंगळाचे भ्रमण होत आहे. कामानिमित्त प्रवास घडतील. आजवर रेंगाळलेली कामे प्रतिष्ठित व्यक्तींच्या सहकार्याने मार्गी लागतील. घरातील सुखसुविधा वाढवण्याकरिता इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातून लाभ होतील. परदेशस्थ भावनांशी संवाद साधाल. कुटुंबातील एखादे काम पुढाकार घेऊन पार पाडाल. उंची वस्त्रालंकारांची खरेदी केली जाईल उत्तरार्धात संततीच्या उत्कर्षाची सुवार्ता कानी येईल.
शुभ दिनांक – 5, 6

मीन – नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या धनस्थानातील राहू आणि हर्षल वरून चंद्राचे भ्रमण होत आहे. कुटुंबातील सदस्यांचे मन दुखावेल असे वक्तव्य टाळावे. अनपेक्षित खर्च उद्भवण्याची शक्यता राहते. भावंडांचे चांगले सहकार्य लाभेल. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी येईल. धाडसी निर्णय घेतले जातील. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातून लाभ होतील. वाहन वास्तूचे योग येतील. उत्तरार्धात सहलीत सहभागी व्हाल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून यश मिळेल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. मित्र परिवाराचे सहकार्य लागेल. आपली इच्छापूर्ती होईल.
शुभ दिनांक – 7, 8
- श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे
9011149780 / 8668293104
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.