Home » RBI कडून ॲलर्ट! ट्रेडिंगसाठी हे ॲप वापरत असाल तर लगेच करा Delete

RBI कडून ॲलर्ट! ट्रेडिंगसाठी हे ॲप वापरत असाल तर लगेच करा Delete

गुगल प्ले स्टोअवर असे काही अॅप आहेत जे डाउनलोड केल्याने तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. अशाच अॅपबद्दल आरबीआयने ॲलर्ट जारी केला आहे.

by Team Gajawaja
0 comment
Trading App Alert
Share

Trading App Alert : जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर आता ॲलर्ट होण्याची गरज आहे. आरबीआयने एक ॲलर्ट जारी करत म्हटले आहे की, काही अॅप हे तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मते, असे काही अॅप जे Forex अथॉराइज्ड नाहीत. आरबीआयने अशा अॅपपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. आरबीआयने Olymp Trade नावाच्या अॅपबद्दल ॲलर्ट जारी केला आहे.

अनधिकृत ट्रेडिंग अॅपच्या माध्यमातून तुमची फसवणूक होऊ शकते. एकूणच तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून या अशा काही अनधिकृत अॅपच्या माध्यमातून पैसे कमावण्याचा मार्ग शोधत असाल तर सावध व्हा. तुमची अशा अॅपच्या माध्यमातून फसवणूक झाल्यास आरबीआय याची जबाबदारी घेणार नसल्याचे त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

अनधिकृत अॅपमुळे होईल नुकसान
फसवणूक
काही ट्रेडिंग अॅप हे केवळ फसवणूकीसाठी तयार केले जातात. यामध्ये तुम्ही पैसे टाकल्यास तुमची आर्थिक फसवणूक होण्याचा मोठा धोका असतो.

-सेफ्टी बग्स
काही ट्रेडिंग अॅपमध्ये सेफ्टी बग्स असू शकतात. यामुळे हॅकर्सला तुमचे अकाउंट सहज एक्सेस करता येऊ शकते.

-अपूर्ण माहिती
अनधिकृत ट्रेडिंग अॅपचा वापर अशा लोकांद्वारे केला जातो ज्यांच्याकडे आर्थिक मार्केटबद्दल पुरेशी माहिती नाही. यामुळे नुकसान होऊ शकते.

ट्रेडिंग अॅपचा वापर करताना पुढील काही गोष्टी लक्षात ठेवा
-अॅप अधिकृत आहे की नाही हे तपासून पाहा
-अॅपबद्दल पुरेशी माहिती मिळवा
-अकाउंटच्या सेफ्टीबद्दल जाणून घ्या
-आर्थिक नुकसान होणार नाही ना याची दक्षता घ्या (Trading App Alert)

अनधिकृत किंवा बनावट अॅप असे ओळखा
-बनावट बेवसाइट किंवा अॅपमध्ये स्पेलिंग चुकलेली असू शकते
-अॅप तुम्हाला कमी वेळात उत्तम रिटर्न्स देण्याचे आश्वासन करतात
-अॅपबद्दल सकारात्मक रिव्हू अधिक प्रमाणात लिहिलेले असतात


आणखी वाचा:
Truecaller नव्हे तर ‘या’ ट्रिकने ओळखता येईल तुम्हाला कोण फोन करतेय
फुटलेल्या स्क्रिनचा मोबाइल वापरताय? व्हा सावध, अन्यथा…
फोनवर व्हिडीओ, गाणी ऐकताना सतत जाहिरात दाखवली जाते? टाळण्यासाठी करा ही सेटिंग

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.