Travel Tips : प्रत्येकजण नवं वर्षानिमित्त आपल्याला जमेल त्या पद्धतीने सेलिब्रेशन करतात. भारतातील कुल्लू-मनाली अथवा एखाद्या ठिकाणी बहुतांश लोक फिरायला जातात. कमी खर्चात आणि खिशाला परवडेल अशा किंमतीत फिरायला जायचे असल्यास काही गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
सुट्टीच्या कारणास्तव बहुतांशजण ट्रिप प्लॅन करतात. यावेळी खर्च करताना मागेपुढे पाहिले जात नाही. पण प्लॅनिंग करून केलेली ट्रिप ही नक्कीच तुमचा खिसा कापणार नाही.
आधीच बुकिंग करा
सध्याच्या डिजिटल युगात काही गोष्टी करणे सहज शक्य झाले आहे. यामुळे एखाद्या ठिकाणी पोहचण्यापूर्वी तेथील हॉटेल बुकिंग करून ठेवा. काही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला उत्तम डिस्काउंटही दिले जाते. बजेट ट्रिपसाठी नेहमीच 3 स्टार हॉटेलचे बुकिंग करावे .
मॉल्सच्या जवळ राहण्याची व्यवस्था नको
डोंगराळ भागात ज्या ठिकाणी मॉल्स असतात तेथे राहण्याच्या व्यवस्थेचे भाडे अधिक असते. यामुळे एकाच ठिकाणचा राहण्याचा पर्याय निवडण्याऐवजी आणखी एक-दोन ठिकाणी राहण्याच्या व्यवस्थेबद्दल विचारून पाहा.
चुकीची रूम बुकिंग
नेहमीच लक्षात ठेवा की, तुमची रूम लिफ्ट अथवा हॉटेलच्या पँन्ट्रीजवळ नसावी. यामुळे तुम्हाला शांतता कधीच मिळणार नाही. फार कमी लोकांना या टिपबद्दल माहिती असते. लोकांच्या विनाकारण आवाजामुळे खोलीतील शांतता भंग होऊ शकते. (Travel Tips)
बिलाचे पेमेंट
ज्यावेळी तुम्ही बिलाचे पेमेंट करता यावेळी बिलाची प्रत जरूर घ्या. कारण यामध्ये काही चार्जेस लावले जातात. यामुळे तुमचा खिसा कापला जाऊ शकतो. हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये काही अतिरिक्त चार्जेस तुम्हाला लावले जातात. जे तुम्ही हॉटेल मालकाला काढायला लावू शकता.