जम्मू आणि काश्मिर हे पर्यटनासाठी सर्वोत्तम मानले जाते. मात्र त्यासोबत या राज्याची मध उत्पादक राज्य म्हणूनही ओळख होत आहे. काश्मिरमध्ये गेल्या अनेक काळापासून मध निर्मिती केली जाते. येथील मधमाशीपालकांच्या अनेक पिढ्या पारंपारिक पद्धतीनं मधाची निर्मिती करत आहेत. आता याच व्यवसायाला सरकारनं अधिक आधुनिक रुप दिले आहे. परिणामी जम्मू काश्मिरमध्ये सर्वाधिक आणि सर्वोत्तम मधाची निर्मिती होऊ लागली आहे. विशेष म्हणजे यात तरुणींचा पुढाकार मोठा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी काश्मिरच्या एका तरुणीला यासाठी पुरस्कार मिळाला आहे. काश्मिरमधील तरुणी, महिला मोठ्या संख्येनं या व्यवसायात प्रवेश करत असल्याची माहिती आहे. यामुळे काश्मिरचा पारंपारिक मधमाशी व्यवसाय आता बहरु लागला आहे. (Jammu And Kashmir)
काश्मीरमध्ये गेल्या अनेक वर्षापासून मधमाशीपालकांच्या पिढ्यानपिढ्या पारंपारिक पद्धतीने मधाची निर्मिती करतात. येथे रॉबिनिया स्यूडोतेशिया या फुलांचा यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळेच येथील मध हे अव्वल दर्जाचे मानले जाते. काश्मिरमध्ये वर्षभर तापमान समान नसले तरीही येथील मध निर्मितीवर त्याचा काहीही परिणाम होत नाही, हे विशेष हिवाळ्याच्या दिवसात येथील मधमाशांच्या पेट्या जम्मू, राजस्थान आणि पंजाब या राज्यात हलवल्या जातात. हिवाळा संपल्यावर या मधमाश्यांच्या पेट्या पुन्हा काश्मिरमध्ये आणल्या जातात. गेल्या अनेक वर्षापासून अशाच क्रमानं हा मधमाशा पालनाचा व्यवसाय येथे केला जात होता. (Social News)
मात्र अलिकडच्या काळात या व्यवसायाला सरकारी योजनांमधून अनुदान देण्यास सुरुवत झाली आहे. परिणामी वर्षभर काश्मिरमध्येच मधमाश्यांच्या पेट्यांचे जतन करण्याची सुविधा उपलब्ध झाली. याचा परिणाम म्हणून काश्मिरमध्ये मधाचे उत्पादन हे वाढले आहे. काश्मीरच्या मधमाश्या पालकांना काश्मिरी बकरवाल म्हटले जाते. हे काश्मिरी बकरवाल दरवर्षी सुमारे 22,000 क्विंटलहून अधिक मधाचे उत्पादन करतात. आता याच मध उत्पादकांमध्ये विविध स्पर्धा करुन स्थानिक प्रशासन मध उत्पादकांना चालना देत आहे. त्यातही महिलांचा सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न होत आहेत. नुकत्याच मध उत्पादकांच्या समारंभात एका 20 वर्षीय तरुणीचा बी क्वीन म्हणून सत्कार कऱण्यात आला. 20 वर्षीय सानिया झेहराचा काश्मीर खोऱ्याची मधमाशी राणीचा किताब मिळाला आहे. सानिया ही काश्मीरमधील सध्यातरी एकमेव महिला मधमाशीपालक आहे. तिचे वडिलही याच व्यवसायात आहेत. (Jammu And Kashmir)
त्यांच्याकडून तिने मधमाशीपालनाचे धडे घेतले आणि ती या व्यवसायात उतरली. अवघ्या चार वर्षातच तिनं आपल्या वडिलांच्या व्यवसायाल आधुनिक तंत्रज्ञानाची साथ दिली. यातून मधाचे उत्पादन चारपटींनी वाढले आहे. श्रीनगरमधील बलहामा गावात राहणाऱ्या सानियानं आत्ता अनेक स्थानिकांना नोकर-या दिल्या आहेत. तसेच येथील महिलांना या व्यवसायात येण्यासाठी ती प्रोत्साहन देत आहे. काश्मीरमध्ये मध उत्पादनासाठी मधमाशी पालनासाठी उत्तम परिस्थिती आहे. काश्मीरची हिरवेगार मैदाने, नद्या आणि भरपूर फुलांच्या वनस्पती यामुळे ते मधुमाशा पालनासाठी योग्य ठिकाण मानले जाते. जम्मू-काश्मीरमधील शेतक-यांसाठी सरकारने मधुमाशा पालनासाठी विशेष प्रकल्पाला मान्यता दिली आहे. या प्रकल्पावर पुढील तीन वर्षांत 47 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन ही गुंतवणूक केली जाणार आहे. (Social News)
=====
हे देखील वाचा : थंडीत आल्याचा चहा प्या आणि ‘या’ आजारांना पळवा
========
या प्रकल्पामुळे काश्मिरमधील मधाचे उत्पादन वाढण्यास मोठी मदत होणार आहे. या योजनेतून मध्याचे उत्पादन हे पुढील 10 वर्षात 682 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यातून मोठी रोजगार निर्मितीही होणार आहे. सध्या काश्मिरमध्ये तयार होणारे मध हे मोठ्याप्रमाणात इतर राज्यात आणि परदेशात पाठवले जाते. शिवाय सौंदर्य साधने निर्माण करणा-या उद्योगातूनही या मधाला मोठी मागणी आहे. सोबत आयुर्वेदिक औषध निर्मितीसाठीही या मधाला मागणी आहे. काश्मिरमध्ये तयार होणारे मध हे घट्ट असल्यामळे त्याचा वापर साबण निर्मितीमध्येही होत आहे. मधमशी पालन हा शेतक-यांच्या उत्पादनाचा पूरक स्रोत होत असल्यामुळे या उद्योगाची भरभराट होईल, असा आशावाद आहे. यासाठी काश्मीरमधील शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ काश्मीरमधून मधमाशी पालन अभ्यासकर्मही चालवले जात आहेत. याचा फायदा येथील अनेक तरुण घेत असून त्यामुळे काश्मिर खो-याची ओळख पुढच्याकाही वर्षात मधनिर्मितीतील अव्वल राज्य अशी होऊ पहात आहे. (Jammu And Kashmir)
सई बने