Home made hair mask : केसांच्या टोकांना फाटे फुटणे ही महिलांमध्ये सर्वसामान्य समस्या असून, त्याचे मुख्य कारण म्हणजे केसांना मिळणाऱ्या पोषणाची कमतरता, सततचा उष्णता उपचार (हीट स्टायलिंग), रासायनिक उत्पादने आणि प्रदूषण यांचा होणारा दुष्परिणाम. केसांच्या टोकांची निगा न राखल्यास ते अधिक कोरडे, निर्जीव आणि नाजूक होतात, ज्यामुळे फाटे फुटण्याची शक्यता वाढते. यासाठी केशसंवर्धनासाठी काही घरगुती उपाय उपयोगी ठरतात. खाली दिलेले पाच घरगुती मास्क केसांच्या फाटलेल्या टोकांवर प्रभावी उपचार करू शकतात आणि केसांना नैसर्गिक चमक व मजबुती परतवून देतात.
अंडी आणि खोबरेल तेलाचा मास्क
अंडं हे प्रथिनांनी भरलेलं असून, ते केसांच्या मुळापासून टोकांपर्यंत पोषण देतं. खोबरेल तेल हे केसांच्या मऊपणासाठी आणि ओलसरपणासाठी ओळखलं जातं. एक अंडं फोडून त्यात दोन टेबलस्पून खोबरेल तेल मिसळा. हे मिश्रण केसांमध्ये, विशेषतः टोकांवर लावा आणि अर्धा तास ठेवून शॅम्पूने धुवा. आठवड्यातून एकदा वापरल्यास केसांना चमकदारपणा आणि बळकटी मिळते.
केळी आणि मधाचा मास्क
केळीमध्ये नैसर्गिक मॉइश्चर आहे आणि मध हा एक उत्तम कंडीशनर म्हणून काम करतो. एक पिकलेली केळी मॅश करून त्यात एक चमचा मध घालावा. ही पेस्ट केसांवर लावा आणि ३० मिनिटांनी धुवा. हा मास्क केसांच्या कोरडेपणाला दूर करून त्यांना मऊ बनवतो, तसेच टोकांवरील फाटे कमी होण्यास मदत करतो.(Hair Care Tips)

Home made hair mask
मेथी आणि दही मास्क
मेथीमध्ये प्रथिनं आणि निकोटिनिक अॅसिड असतं, जे केसांची वाढ सुधारतं. दही हे केसांचं नैसर्गिक कंडीशनर आहे. मेथीच्या दाण्यांना रात्रभर भिजवून सकाळी वाटून त्यात दही मिसळा. हे मिश्रण केसांवर लावून ४५ मिनिटांनी धुवा. यामुळे केसांचे फाटे, कोंडा आणि कोरडेपणा दूर होतो.(Home made hair mask)
============
हे ही वाचा :
पावसाळ्यात चेहऱ्याची त्वचा तेलकट होते? करा हे घरगुती उपाय
साडीला असणारे जरी वर्क खरे की बनावट कसे ओळखावे?
============
आवळा आणि बदाम तेलाचा मास्क
आवळा केसांसाठी उत्तम टॉनिक आहे. त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C केसांच्या मजबुतीसाठी फायदेशीर असतात. आवळा पावडरमध्ये थोडं बदाम तेल मिसळून पेस्ट तयार करा आणि टोकांवर लावा. ३० मिनिटांनी शॅम्पूने धुवा. हे केस गळती कमी करतो आणि टोकांना पोषण देतो.(Latest Marathi News)
अॅलोवेरा आणि ऑलिव्ह तेल मास्क
अॅलोवेरा जेल केसांचं हायड्रेशन राखतं, तर ऑलिव्ह तेल हे खोलवर पोषण देतं. एक चमचा अॅलोवेरा जेल आणि एक चमचा ऑलिव्ह तेल मिक्स करा. हे मिश्रण केसांच्या टोकांवर लावून ३० ते ४५ मिनिटांनी धुवा. यामुळे फाटलेले टोकं लवकर सुधारतात आणि केस सौम्य होतात.