Home » आधार कार्डच्या माध्यमातून काढता येतील पैसे, जाणून घ्या प्रोसेस

आधार कार्डच्या माध्यमातून काढता येतील पैसे, जाणून घ्या प्रोसेस

तुमच्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी बँकेत जावे लागते. पण तुम्हाला माहितेय का, आधार कार्डच्या माध्यमातून पैसे कसे काढले जातात. याबद्दलच अधिक जाणून घेऊया....

by Team Gajawaja
0 comment
Aadhar Card Update
Share

Finance : तुमचे बँक खाते आधार कार्डला लिंक असल्यास तुम्ही बँक किंव एटीएममध्ये जाऊन पैसे काढण्याची गरज नाही. पण तुम्ही घरबसल्याही पैसे काढू शकता. यासाठी तुम्हाला आधार इनेबेल्ड पेमेंट सिस्टिमची मदत घेऊ शकता. अशी ही एक सेवा आहे की, ज्याच्या माध्यमातून तुम्ही आधार कार्डच्या मदतीने बँक खात्यातून पैसे काढू शकता.

याशिवाय खात्यातून पैसे काढण्यासह दुसऱ्या खात्यात पैसेही ट्रान्सफर करू शकतात. ही सिस्टिम नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने डेव्हलप केली आहे. यामध्ये आधार क्रमांक आणि फिंगरप्रिंटच्या माध्यमातून वेरिफिकेशन करून डिजिटल ट्राजेक्शन करू शकता. खरंतर ही सुविधा अत्यंत सुरक्षित असून यामध्ये बँक डिटेल्स देण्याची आवश्यकता नाही.

सुरक्षित आहे ट्रांजेक्शन?
बँक ही सेवा परिसरातील कॉमन सर्विस सेंटर संचालकांसह पोस्टऑफिसमधील पोस्टमास्टरच्या द्वारे पुरवली जाते. दरम्यान, यासाठी अतिरिक्त शुल्कही घेतला जातो. ही पेमेंट सिस्टिम युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. यासाठी तुम्हाला आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणे गरजेचे आहे. या सिस्टिमअंतर्गत ट्रांजेक्शन करताना एखाद्या ओटीपीची आवश्यकता नसणार आहे. एक आधार कार्ड काही बँक खात्याला लिंक केले जाऊ शकते. या सुविधेसाठी पोस्टमास्टर किंवा सीएससी संचालकांना घरी बोलावून या सुविधेचा लाभ घेऊ शकता. (Finance)

कशी मिळवाल सुविधा?
-सर्वप्रथम इंडिय पोस्ट पेमेंट बँकेच्या संकेतस्थळावर जा आणि नंतर सर्विस रिक्वेस्टवर क्लिक करा.
-यानंतर येथे सांगा की, तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकचे ग्राहक आहेत की नाही.
-आता एटीएम बेस्ड कॅश विड्रॉल फ्रॉम मनी आधार लिंक्ड बँक खात्याचा पर्याय निवडा.
-यानंतर मागितलेली सामान्य माहिती द्या आणि सबमिट करा. असे केल्यानंतर ग्राहक प्रतिनिधी तुमच्या घरी येतील.


आणखी वाचा :
ChatGPT मध्ये नवे फीचर येणार, कोणत्याही फोटोबद्दल लगेच माहिती मिळणार
जुने घर विक्री करताना किती टॅक्स भरावा लागतो?
विमानात तुमचे मुलं अचानक रडू लागल्यास करा ‘हे’ काम

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.