Home » विमानात तुमचे मुलं अचानक रडू लागल्यास करा ‘हे’ काम

विमानात तुमचे मुलं अचानक रडू लागल्यास करा ‘हे’ काम

विमानात बसल्यानंतर काही मुलं रडतात. यावेळी पालक संतप्त होत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात. यावर तुम्ही काही सोपे उपाय करू शकता.

by Team Gajawaja
0 comment
Parenting Tips
Share

Parenting Tips :  ज्यावेळी तुम्ही विमानातून तुमच्या बाळासह प्रवास करता त्यावेळी ते अचानक रडू लागल्यास त्याला शांत कसे करायचे असा प्रश्न निर्माण होतो. बाळाच्या रडण्यामुळे आपल्यासह आजूबाजूला बसलेल्यांना त्रास होईल याची चिंताही व्यक्त केली जाते. पण अशी स्थिती उद्भवल्यास तुम्ही पुढील काही गोष्टी करू शकता. जेणेकरून तुमचा प्रवास आरामदायी होऊ शकतो.

शांत राहा
सर्वप्रथम स्वत: ला शांत करा. लक्षात ठेवा, आपल्यामुळे आजूबाजूंना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. मुलं तुम्हाला शांत राहिलेले पाहून थोड्यावेळाने ते ही आपोआप शांत होईल.

Mom's Plea for People to Stop Getting Mad at Crying Babies on Flights Goes Viral

कानावर पडणारा दबाव ओळखा
विमानातून प्रवास करताना कधीकधी बाळाच्या कानावर दबाव निर्माण होऊ शकतो. खरंतर असे होणे सामान्य बाब आहे. यावेळी तुम्ही बाळाला दूध देऊ शकता. ही एक सोपी ट्रिक आहे ज्यामुळे बाळ रडणे थांबवू शकते.

आवडीची वस्तू द्या
प्रवासावेळी मुलांच्या आवडीची खेळणी किंवा वस्तू सोबत ठेवा. जेणेकरून बाळ रडायला लागल्यास त्याला त्या वस्तू द्या. यामुळे बाळ आनंदीत होऊन शांत होईल. (Parenting Tips)

बाळाला हलक्या हाताने गोंजारा
कधीकधी बाळाला हलक्या हाताने गोंजारल्याने ते शांत होते. अथवा बाळाला उचलून घेऊन हळूहळू चाला. यामुळे बाळ रडणे थांबवेल.


आणखी वाचा :
सासू-सासऱ्यांसोबत सातत्याने वाद होतात? या गोष्टींकडे द्या लक्ष
गर्लफ्रेण्डच्या ‘या’ गोष्टींमुळे होतो बॉयफ्रेण्डला त्रास, आजच सोडून द्या या सवयी
सोशल मीडियाचा अत्याधिक वापर करणाऱ्या व्यक्ती राहतात नैराश्यात, अभ्यासातून खुलासा

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.