Home » सोनाक्षीच्या सासऱ्यांनी एकेकाळी केली होती सलमान खानची मदत, वाचा किस्सा

सोनाक्षीच्या सासऱ्यांनी एकेकाळी केली होती सलमान खानची मदत, वाचा किस्सा

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल सध्या लग्नामुळे जोरदार चर्चेत आहेत. खरंतर, कपलचे सलमान खानसोबत खास संबंध आहेत.

by Team Gajawaja
0 comment
Bollywood News
Share

Bollywood News : बॉलिवूडमधील अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आपल्या लग्नामुळे अधिकच सध्या चर्चेत आहे. अखेर, कपलने 23 जूनला एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली आहे. सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल वर्ष 2017 पासून एकमेकांना डेट करत होते. अशातच दोघांनी आता लग्न केल्याचे काही फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. पण तुम्हाला माहितेय का, सोनाक्षीच्या सासऱ्यांनी एकदा सलमान खानची मदत केली होती.

सोनाक्षी सिन्हाच्या सासऱ्यांचे नाव इक्बाल रतनसी असे असून ते मुंबईतील स्थानिक आहेत. इक्बाल रतनसी यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. जहीर त्याच्या भावंडांमध्ये मोठा आहे. खरंतर, सोनाक्षीचे सासरे मुंबईतील प्रसिद्ध ज्वेलर्स आहेत. याशिवाय रिअल इस्टेटमध्ये त्यांचे मोठे नाव आहे.

काय करतात सोनाक्षीचे सासरे?
वर्ष 2005 मध्ये इक्बाल रतनसी यांनी स्टेलमेक डेव्हलपर्स प्राइव्हेट लिमिटेड नावाची कंपनी सुरु केली होती. यानंतर ब्लॅक स्टोन हाउसिंग अँड इंफ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडची सुरुवात केली. याशिवाय वर्ष 2016 मध्ये टूल्स, लाइट आणि ग्रिप्सचा व्यवसाय करण्यास सुरुवात केलीय याच कंपनीकडून इंडस्ट्रीमध्ये सिनेमातील फाइटिंग सीनसाठी इक्विपमेंट दिल्या जातात. (Bollywood News)

इक्बाल रतनसी यांनी केली होती सलमानची मदत
इक्बाल रतनसी यांनी एकेकाळी सलमान खानची मदत कली होती. सलमान खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली होती. सलमान खानने म्हटले होते की, एकेकाळी माझ्या करियरची सुरुवात होत होती तेव्हा ते माझ्या पर्सनल बँकेसारखे होते. त्यांनी खूप माझी मदत केली आहे. त्यांचेही कर्ज आहे जे चुकते केलेले नाही. खरंतर, त्यांनी माझ्याकडून कधीच कर्जाचे व्याजही मागितले नाही.


आणखी वाचा :
जेव्हा अमृता रावने शाहीदच्या कानाखाली मारली होती… वाचा संपूर्ण किस्सा
Pushpa-2 संदर्भात मोठे अपडेट, निर्मात्यांनी जाहीर केली सिनेमा प्रदर्शित होण्याची नवी तारीख

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.