Home » Sudesh Mhashilkar : अभिनेत्री प्राची पिसाटच्या आरोपांवर सुदेश म्हशीलकर यांचे स्पष्टीकरण

Sudesh Mhashilkar : अभिनेत्री प्राची पिसाटच्या आरोपांवर सुदेश म्हशीलकर यांचे स्पष्टीकरण

by Jyotsna Kulkarni
0 comment
Sudesh Mhashilkar
Share

सोशल मीडियावर अनेकदा महिलांना अभिनेत्रींसुद्धा काही चुकीच्या गोष्टींचा सामना करावा लागतो. अनेकदा त्यांना सोशल मीडियावर काही चुकीचे, अश्लील मेसेज देखील पाठवले जातात. बऱ्याच महिला या गोष्टींचा सामना करतात. अगदी मनोरंजनविश्वातील अभिनेत्रीसुद्धा याला अपवाद नाही. अभिनेत्रींनासुद्धा अशा घटनांना सामोरे जावे लागते. अशीच एक घटना मराठी मालिकाविश्वात घडली आहे. झी मराठीवरील प्रसिद्ध ‘तू चाल पुढे’ या मालिकेमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री प्राची पिसाटला असाच भीषण अनुभव आला आहे. (Sudesh Mhashilkar)

अभिनेत्री प्राची पिसाटने काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते सुदेश म्हशीलकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सुदेश यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर प्राचीला अश्लील मेसेज पाठवल्याचा स्क्रीनशॉट शेअर करत प्राचीने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर सुदेश यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा समान करावा लागला. त्यांच्यावर अनेक आरोप देखील होत होते, मात्र सुदेश यांनी मौन बाळगणेच योग्य समजले. पण आता सुदेश यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. इन्स्टाग्रामवर त्यांनी यासंदर्भात पोस्ट लिहिली आहे. सोबतच त्यांनी पोलीस तक्रारीची प्रतसुद्धा या पोस्टमध्ये जोडली आहे. (Marathi News)

सुदेश यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, ‘खरंतर मी या विषयावर काहीही लिहिणार नव्हतो. पण गेले काही दिवस जे काही सोशल मीडियावर सुरू आहे, त्यावर अनेक लोकांचे, मीडियाचे प्रतिसाद पाहून शांत बसणं मला शक्य झालं नाही. म्हणून आज इथे माझं म्हणणं मुद्द्यांनुसार मांडत आहे. (Top Stories)

1. हा मेसेज खरंच मीच केला का?

तो मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला आहे. पण तो नेमका केव्हा, कसा गेला? कोणीतरी अकाउंटमध्ये शिरलं का? की कुठे गैरवापर झाला? याचा मला पत्ता नाही. त्याबाबतीत मी लेखी तक्रार दाखल केली आहे, ती मी इथे जोडत आहे आणि जर कुणी असं म्हणत असेल की त्यांनी माझं अकाऊंट हॅक झालं का ते तपासलं, तर ती अतिशय गंभीर बाब आहे. माझं सोशल मीडिया अकाऊंट ही माझी वैयक्तिक माहिती आहे. त्यात परवानगीशिवाय हस्तक्षेप करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.  (Top Marathi Headlines)

 

Sudesh Mhashilkar

2. अश्लील मेसेजेस केल्याचा आरोप

मी इथे माझ्या फोनमधील मूळ चॅट्सचे स्क्रीनशॉट्स जोडत आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे हास्यविनोदाच्या स्वरात लिहिलेलं असं (हसण्याचे इमोजी) दिसेल. जर खरंच मी असा मेसेज केला असता आणि तो इतका आक्षेपार्ह असता, तर त्यावर प्रतिक्रिया देताना “असं का पाठवलं?” एवढं तरी कुणीही विचारलं असतं. पण इथे उलट मेसेजचा संदर्भ तोडून, त्यातून चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न झाला आहे. लोकांना अर्धवट माहिती देऊन अशाप्रकारे दिशाभूल करणं हे सुद्धा चुकीचं आहे. (Todays Marathi News)

3. फ्लर्टिंगसाठी नंबर मागितला का?

माझ्या फोनमध्ये ‘Prachi Pisat’ या नावाने आधीच नंबर सेव्ह आहे. मला त्यासाठी फेसबुकवर नंबर मागायची गरजच नव्हती. ज्यादिवशी पोस्ट आली त्यादिवशी शहानिशा करण्यासाठी प्राचीला कॉल केला होता, पण तिने घेतलाच नाही.

4. पाच दिवस उत्तर का दिलं नाही?

मी फारसा सोशल मीडियावर सक्रिय नसतो. माझं शूटिंग, माझं काम, आणि बाकी वेळ माझ्या कुटुंबीयांसोबत जातो. माझी पत्नी कॅन्सर पेशंट आहे आणि माझी मुलंही याच इंडस्ट्रीत काम करतात. या घटनेमुळे त्यांच्यावर किती मानसिक ताण आला असेल, याची कल्पनाही मला कदाचित करता येणार नाही. हे सगळं पाहून मीही थोडा गोंधळलो होतो. कुठून सुरूवात करावी हे समजत नव्हतं. (Celebrity News)

5. प्राचीला कॉल करून पोस्ट काढायला धमकावलं?

माझ्या काही जवळच्या मित्र-मैत्रिणींनी फक्त काळजीपोटी तिला कदाचित मेसेज किंवा कॉल केला असेल तर मला माहीत नाही. कारण मी स्वतः कुणाला असं करायला सांगितलं नाही.

6. बाकी पोरींनी सांगितलेले किस्से व्हायरल करण्याची धमकी

‘सेक्सी’ म्हणावं असं खरं सौंदर्य आणि समजूत माझ्या आयुष्यातल्या अनेक मैत्रिणींमध्ये आहे. ज्या माझ्या पत्नीलासुद्धा ओळखतात. त्या आजही आवर्जून आमच्याकडे येतात.’ दरम्यान सुदेश यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणात अनेक कलाकारांनी, नेटकऱ्यांनी सुदेश म्हशीलकर यांना पाठिंबा देत ‘सुदेश म्हशीलकर हे असं करणं शक्यचं नसल्याचं’ म्हटले आहे. तर प्राचीला देखील अनेक अभिनेत्रीनं सपोर्ट केलाय. (Latest Entertainment News)

Sudesh Mhashilkar

सुदेश म्हशीलकरांनी लांबलचक पोस्ट शेअर केल्यानंतर प्राची पिसाटने लगेच त्यांच्या पोस्टवर उत्तर देताना आणखी एक स्क्रिनशॉर्ट शेअर करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. प्राची पिसाट म्हणते की, “मुद्दा काय तुम्ही बोलता काय? नक्की माझा नंबर सेव्ह होता की नव्हता? हॅक झाल्यानंतरही फेसबुक अकाऊंट्सचा अॅक्सेस होता, तर गप्प का बसलात? अकाऊंट हॅक झालंय हे माहिती असतानाच, फेसबुकवर लगेच किंवा या पाच दिवसांत पोस्ट का शेअर केली नाही. चॅटमध्येच खाली लगेच मसेज का नाही केला की, अकाऊंट हॅक झाला आहे असं. (Social News / Updates)

==========

हे देखील वाचा : Ashok Saraf : पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर अशोक सराफ म्हणाले, “मला विसरले असते तर मी…”

Ashok Saraf : पद्मश्री मिळाल्यानंतर अशोक सराफ यांना पायलट भाची कडून मिळाले सरप्राइज

==========

राहिला प्रश्न हसणाऱ्या इमोजीचा तर ५० – ६० वर्षांच्या माणसाचा अपमान करण्याऐवजी प्रत्येक मुलगी असाच रिप्लाय करून दुर्लक्ष करते आणि विषय संपवते. दुसऱ्यांदा पण दुर्लक्ष करते, मी पण तेच केलं. तुम्ही अजूनही माफी मागू शकता आणि हा विषय संपवा…”. आता यावर सुदेश म्हशीलकरांचे काय उत्तर असेल हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.